

महाराष्ट्रभर खाद्यप्रेमी विविध पदार्थांची चव चाखण्यासाठी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जात असतात. त्यात मुंबईतले काही खास पदार्थ आवर्जून चाखतात. त्यामध्ये पाव भाजी, मिसळ पाव, वडापाव, छोलेभटूरे अशा चमचमीत पदार्थांचा समावेश त्यामध्ये होतो. पण बाहेरचं खाणं अनेकांना पसंत पडत नाही. अशावेळेस तुम्हाला घरी तयार करुन पदार्थांचा आस्वाद घेणं फायदेशीर ठरतं.
पुढे आपण मुंबईतले असे काही पदार्थांची रेसिपी जाणून घेणार आहोत की त्यांचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. पुढील रेसिपी चवीला अप्रतिम असतातच पण बनवायलाही सोप्या असतात. चला जाणून घेऊयात.
पाव भाजी (Pav Bhaji Recipe)
पाव भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेल्या भाज्या कांदा, टोमॅटो आणि पाव भाजी मसाल्यासोबत परतून घ्या. त्यात बटर घालून भाजी व्यवस्थित मॅश करा. मग लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून भाजी तयार होते. बटर लावलेल्या गरम पावसोबत भाजी सर्व्ह करा.
वडा पाव (Vada Pav)
वडा पाव बनवण्यासाठी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण आणि मसाले मिक्स करा. या मिश्रणाचे गोळे करून बेसनाच्या पिठात बुडवून गरम तेलात तळा. तळलेले गरम वडे काढून घ्या. पाव कापून त्यात चटणी लावा. पावात वडा ठेवून गरमागरम वडा पाव सर्व्ह करा.
मिसळ पाव (Misal Pav)
मिसळ पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम मुग मटकीची उसळ तयार करा. मग त्याचा तिखट रस्सा आणि फरसाण व्यवस्थित मिक्स करा. त्यात कांदा, लिंबू आणि कोथिंबीर बारिक चिरुन मिसळ तयार करा. गरमागरम मिसळ पाव पाव किंवा ब्रेडसोबत खाल्ली जाते. चवीनुसार ती कमी, मध्यम किंवा जास्त तिखट करता येते.
मिर्ची वडा (Mirchi Vada)
मिर्ची वडा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. यासाठी एका भांड्यात बेसन, लाल तिखट, मीठ आणि खायचा सोडा मिक्स करा. मग मोठ्या हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्यातील बिया काढून घ्या. घट्ट पीठ तयार झालं असेल तर मिरच्यांत बटाटा भाजी किंवा कांदा भरून बेसनात बुडवा. गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम मिर्ची वडा चटणीसोबत सर्व्ह करा.
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe)
मुंबईत चायनीज भेळही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. ही तरुणांसाठी आवडीची स्ट्रीट फूड डीश आहे. उकडलेले नूडल्स, कोबी, गाजर, कांदा व शिमला मिरची बारीक चिरून घ्या. पॅनमध्ये थोडं तेल गरम करून लसूण-आलं परतून भाज्या हलक्या शिजवा. त्यात सोया सॉस, लाल तिखट, मीठ, व्हिनेगर घालून नूडल्स मिसळा. चटणीसाठी टोमॅटो सॉस, चिली सॉस, व्हिनेगर व थोडं साखर एकत्र करा. भेळ सर्व्ह करताना वरून तयार चटणी घालून गरमागरम सर्व्ह करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.