

सुमारे 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचा दावा
ई-केवायसी प्रक्रियेमुळे योजनेतील पात्रता आणि लाभार्थ्यांच्या नोंदींची मोठ्या प्रमाणावर छाननी
अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची निकषानुसार काटेकोर पडताळणी आणि ई-केवायसीची अट यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मात्र यातही सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल साडेचार लाख सरकारी कर्मचा-यांनी लाडकीचा बेकायदा लाभ घेतल्याचं उघड झालंय. माहिती अधिकारामधून हे वास्तव समोर आलंय. य़ा अपात्र लाडक्यांनी सरकारच्या तिजोरीतले सुमारे 30 हजार कोटी रुपये लाटले आहेत. आतापर्यंत कोणत्या कारणांसाठी किती लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय ते पाहुयात.
92 लाख लाडक्यांना वगळलं
ई-केवायसी पूर्ण न केलेले - 62 लाख
वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त - 16 लाख
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे - 3 लाख 60 हजार
एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी - 2 लाख 50 हजार
65 वर्षांपेक्षा अधिक वय - 1 लाख 80 हजार
जिल्हा पातळीवरील पडताळणीत वगळलेले - 1 लाख 70 हजार
या योजनेसाठी राज्य सरकारने २६,५०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. मात्र सुमारे दोन वर्षांत अपात्र लाभार्थ्यांनी सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटींचा डल्ला मारला आहे. संतापजनक बाब म्हणजे तब्बल 29 हजार पुरुषांनीही महिलांसाठीच्या या योजनेत घुसखोरी करुन निधी लाटला आहे. त्यामुळे आता या सरकारी लाडकींकडून लाटलेले पैसे वसूल करणार का? या सर्व साडे चार लाख लाडकींवर गुन्हा दाखल करणार का? हाच खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.