blood pressure control drinks google
लाईफस्टाईल

BP Control Juices: बीपीचा त्रास वाढलाय? हे ४ ज्यूस देतील आराम, वाचा फायदे

Healthy Lifestyle: रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी जास्वंदाचा चहा, बीटाचा रस, टोमॅटो ज्यूस आणि डाळिंबाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतात. हे पेय हृदयाचे आरोग्य सुधारून बीपी संतुलित ठेवण्यास मदत करतात.

Sakshi Sunil Jadhav

  • जास्वंदाचा चहा नैसर्गिक ACE इनहिबिटरप्रमाणे काम करून रक्तदाब हळूहळू कमी करतो.

  • बीटाचा रस नायट्रेट्समुळे ३० मिनिटांत बीपी कमी करतो आणि प्रभाव २४ तास टिकतो.

  • टोमॅटो ज्यूस मधील पोटॅशियम आणि लाइकोपीन हृदयाचे आरोग्य सुधारून रक्तदाब संतुलित ठेवतात.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ब्लड प्रेशरवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. या समस्येमध्ये बऱ्याचदा आधी लक्षणे दिसत नाहीत. मात्र यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी पौष्टीक आहार, रोजच्या रोज व्यायाम आणि संतुलित जीवनशैली यांसोबत काही नैसर्गिक पेयांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ही पेये औषधांच्या ऐवजी वापरायची नसून, त्यांच्या जोडीने घेतल्यास रक्तदाब व्यवस्थापन जास्त प्रभावीपणे करता येते.

जास्वंदाचा चहा

जास्वंदाचा चहा हे सकाळी घेण्यास उत्तम पेय मानले जाते. जास्वंदातला बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड नैसर्गिक ACE इनहिबिटरप्रमाणे कार्य करतो आणि रक्तदाब हळूहळू कमी करण्यात मदत करतात. काही अभ्यासांनुसार दिवसातून साधारण तीन कप जास्वंदाचा चहा घेतल्यास सिस्टोलिक रक्तदाबात ७ पॉइंटपर्यंत घट दिसते.

बीटाचा रस

बीटाचा रस हा रक्तदाब नियंत्रणासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला आणखी एक प्रभावी पर्याय आहे. बीटामधील नायट्रेट्स शरीरात जाऊन नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात, जे रक्तवाहिन्या रुंद करून त्यातील दाब कमी करतात. संशोधनानुसार बीटाचा रस घेतल्यानंतर फक्त ३० मिनिटांत रक्तदाबात घट दिसून येते आणि हा परिणाम पुढील २४ तास टिकू शकतो.

टोमॅटो ज्यूस

अनसॉल्टेड टोमॅटो ज्यूस सुद्धा रक्तदाबासाठी उपयुक्त मानला जातो. यात असलेले पोटॅशियम आणि लाइकोपीन हे घटक हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित करते, तर लाइकोपीन अँटिऑक्सिडंट म्हणून दाह कमी करून कोलेस्टेरॉलवरही चांगला परिणाम करतो.

डाळिंबाचा रस

डाळिंबाचा रस, ग्रीन टी यांसारखी इतर पेयेही रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. डाळिंब रसातील अँटिऑक्सिडंट्स सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाबावर सकारात्मक परिणाम करतात. ग्रीन टीमधील संयुगे रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवतात आणि शरीरातील दाह कमी करतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

BMC Election: मुंबईत ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या महिला नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Health Tips : सावधान! जेवणानंतरची एक चूक पडेल महागात,आताच सोडा 'ही' सवय

Rent Agreement: घरमालक-भाडेकरुंसाठी ५ नवे नियम, एकही मोडला तर होणार दंड, आताच नोट करा

CNG-PNG Price Drop: नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त; आजचे पेट्रोलचे दर काय?

SCROLL FOR NEXT