Sakshi Sunil Jadhav
काकडी किसून तिचं पाणी अलगद पिळून काढा. पाणी काढले नाहीतर पोहे मऊ होऊन लगदा होऊ शकतो.
पोहे हलकेसे धुऊन 5 मिनिटं ठेवा. नंतर पोहे मऊ झाले की काकडीसोबत छान मिक्स होतात आणि चव वाढते.
ताजं खोबरं पोह्यांना नरमपणा आणि पारंपरिक कोकणी चव देते. पुढे चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. या तिन्ही गोष्टी काकडीच्या फ्रेशनेस वाढवतात आणि पोहे आणखी स्वादिष्ट बनवतात.
तेलात मोहरी तडतडू द्या, त्यात चणा डाळ, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरची घालून खमंग फोडणी द्या.
फोडणीत कढीपत्ता आणि हिंग मिक्स केल्यावर पोह्यांना खास दक्षिण कऱ्हाड कोकणी फ्लेवर मिळतो.
गरम फोडणी पोह्यांवर ओतल्याने सुगंध आणि चव दोन्ही खुलतात. ताजी कोथिंबीर पोह्यांना हिरवा, ताजा आणि आकर्षक टच देते.
काकडी पोहे लगेच खाल्ले तरच खमंग लागतात. जास्त वेळ ठेवल्यास पोहे नरम होण्याची शक्यता असते.