heart attack in women google
लाईफस्टाईल

Heart Attack Women: महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला; वेळीच जाणून घ्या हे Facts, अन्यथा...

Heart Attack Symptoms: स्त्रियांमध्ये हृदयविकाराची शक्यता अधिक आहे. हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी असतात. वेळेत ओळख आणि उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

अमेरिकेच्या तज्ज्ञांच्या संशोधनानुसार दर ४० सेंकदाला हार्ट अटॅकमुळे अनेकांचा मृत्यू होतो.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात.

वेळेत उपचार घेतल्यास जीव वाचवता येतो.

संतुलित आहार, व्यायाम, तणाव नियंत्रण आणि हृदय तपासणी अत्यंत आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या संशोधनानुसार दर ४० सेंकदाला जगभरात Heart Attack मुळे लोक जीव गमावतायेत. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हार्ट अटॅकची लक्षणे ही काही काळ अगोदरच जाणवायला लागतात. विशेषत: महिलांना Heart Attack या आजाराचा धोका जास्त प्रमाणात जाणवतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जाणून घ्या महत्त्वाची याची मुख्य कारणे.

महिलांमध्ये ह्रदयविकार हा प्रमुख आरोग्याचा धोका असूनही, त्याकडे बर्‍याचदा दुर्लक्ष केलं जातं. मेम्फिस, यूएस येथील हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी स्त्रियांसाठी हृदयविकाराबद्दल काही महत्त्वाचे तथ्ये स्पष्ट केली आहेत. Heart Attack फक्त पुरुषांच्या आजारापुरताच मर्यादित नाही. अमेरिकेत ६ कोटींपेक्षा अधिक स्त्रिया काही ना काही प्रकारच्या Heart Attack च्या समस्यांना सामोरं जावं लागतं. हार्ट अटॅक हा अमेरिकेतल्या स्त्रियांसाठी मृत्यूचे कारण आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो.

स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे लक्षणे पुरुषांपेक्षा वेगवेगळी असू शकतात. या कारणामुळे अनेकदा लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि हृदयावर गंभीर नुकसान होतं. स्त्रियांमध्ये नेहमी क्लासिक हार्ट अटॅकची लक्षणे दिसत नाहीत. छातीतील दाबासारखा वेदना ऐवजी, बहुतेक स्त्रिया उलट्या, थकवा, dizziness किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे जाणवतात. ज्यामुळे चुकीचे निदान होऊ शकते.

हार्ट अटॅक स्त्रियांमध्ये अधिक घातक ठरू शकतो. कारण स्त्रिया लक्षणे ओळखण्यात किंवा उपचार घेण्यात उशीर करतात. स्त्रियांमध्ये हृदयविकार अधिक घातक ठरतो. पहिल्या वर्षात मृत्यू होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते, कारण लक्षणे वेळेत ओळखली किंवा उपचार घेतले जात नाहीत.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी का असतात?

हो, स्त्रियांमध्ये छातीतील वेदना कमी, उलट्या, थकवा, dizziness किंवा श्वास घेण्यास त्रास हे सामान्य लक्षणे असतात.

हार्ट अटॅक होण्याची जोखीम स्त्रियांमध्ये का जास्त आहे?

कारण स्त्रिया लक्षणे वेळीच ओळखत नाहीत.

हार्ट अटॅकपासून स्वतःचा बचाव कसा करावा?

हृदय तपासणी, संतुलित आहार, व्यायाम, तणाव कमी करणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हार्ट अटॅकचे प्रमुख कारणे कोणती आहेत?

उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, तणाव, अनियमित जीवनशैली आणि कुटुंबातील इतिहास हृदयविकाराचे मुख्य कारणे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

SCROLL FOR NEXT