यकृताच्या आजारांचे 'हे' आहेत संकेत आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी काही टिप्स Google
लाईफस्टाईल

Liver Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं 'असे' संकेत, जाणून घ्या कोणती आहेत ती लक्षणं...

Liver Problem: लिव्हरच्या आजाराची सुरुवातीची 4 चिन्हे वेळेत ओळखणे महत्त्वाचे आहे. थकवा, भूक मंदावणे, वेदना व त्वचेतील बदल ही गंभीर लक्षणे दुर्लक्षित करू नका.

Sakshi Sunil Jadhav

लिव्हर हे शरीरातील सर्वात मोठा भाग असून तो रक्त स्वच्छ करण्याची, पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे आणि शरीरात ऊर्जा निर्माण करणे यांसारखी तब्बल 500 पेक्षा जास्त कामे करत असतो. मात्र लिव्हरमध्ये चुकीच्या गोष्टी गडबडी सुरू झाल्यातरी त्याची पहिली लक्षणे फारशी गंभीर वाटत नाहीत, त्यामुळे अनेकदा लोक ती साधी पचनाशी संबंधित समस्या आहे असे समजून दुर्लक्षित करतात. पण हीच सामान्य समस्या गंभीर आजाराचं रूप धारण करू शकते.

पहिले लक्षण

सुरुवातीला व्यक्तीला सतत थकवा व अशक्तपणा जाणवतो. आराम केल्यानंतरसुद्धा ही थकवा कमी होत नाही आणि दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होतो. लिव्हर जर योग्यरीत्या कार्य करत नसेल तर, शरीरातील ऊर्जा निर्माण होणे आणि रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया बिघडते. त्यामुळे व्यक्ती कायमच थकलेली जाणवते.

दुसरे लक्षण

दुसरे लक्षण म्हणजे उजव्या बाजूच्या बरगडीखाली हलका त्रास किंवा आत खेचल्यासारखे वाटते. अनेकदा हे स्नायू दुखणे किंवा अपचनामुळे झाले असे आपण समजतो. मात्र लिव्हरच्या सुजेमुळे आणि त्याच्या वाढलेल्या आकारामुळे हा त्रास होऊ शकतो. ही वेदना कायम राहिल्यास किंवा वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तिसरे लक्षण

याशिवाय, अचानक भूक मंदावणे आणि वजन कमी होणे हे लक्षणदेखील दुर्लक्षित करता कामा नये. यकृत पचन व चयापचय नियंत्रित करते. त्यात अडथळे निर्माण झाल्यास अन्नाचे योग्यरीत्या विघटन व पोषणशोषण होत नाही. त्यामुळे भूक न लागणे, अन्नाविषयी नकारात्मक भावना निर्माण होणे आणि स्नायूंचे वजन घटणे असे लक्षण दिसून येते.

चौथे लक्षण

त्वचेवर बदल दिसणे हे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. छाती किंवा खांद्यावर कोळीच्या जाळ्यासारख्या लालसर शिरा दिसणे, हाताच्या तळव्याला लालसरपणा येणे हे लक्षणे ‘स्पायडर अँजिओमा’ व ‘पल्मर एरिथेमा’ म्हणून ओळखले जातात. हे बदल हळूहळू दिसून येतात त्यामुळे रुग्ण बहुतेक वेळा ते गांभीर्याने घेत नाहीत. ही लक्षणे किरकोळ वाटली तरी ती लिव्हरवर ताण येत असल्याची ही लक्षणे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका, १० ते १२ नवीन लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान

Maharashtra Live News Update : न्या. सुर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

Kitchen Hacks : आल्याची पेस्ट अशा पद्धतीने बनवा, १ महिना खराब होणार नाही

Bigg Boss 19 : क्रिकेटपटूच्या बहिणीने तान्या मित्तलच्या कानाखाली मारली? बिग बॉसच्या घरात घडलं काय? पाहा VIDEO

Maharashtra Politics: फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा कायम? निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत धुसफूस

SCROLL FOR NEXT