Sakshi Sunil Jadhav
चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात अनेक ठिकाणी संपत्तीचे योग्य नियोजन, बचत आणि पैशाची उधळपट्टी याबद्दल महत्वाचे विचार सांगितले आहेत. जर आपण काही चुकीच्या सवयी सोडल्या नाहीत तर आपला पैसा दुसऱ्यांच्या खिशात जाईल.
गरजेपेक्षा जास्त खर्च केल्याने पैसे लवकर खर्च होतात.
महागड्या व दिखाऊ गोष्टी जास्त विकत घेऊ नये. त्याने आयु्ष्यात फक्त दिखावाच उरतो पैसा नाही.
गरज नसताना वायफळ कर्ज घेतल्याने व्याजात पैसा अडकतो.
व्यसनामुळे पैसा दुसऱ्यांच्या हाती जातो. त्यामुळे प्रत्येक वस्तू हवीच अशी हट्टी वृत्ती तुमचा खिसा रिकामा करेल.
कष्ट न करता संपत्ती टिकत नाही, आळशी व्यक्तीचा पैसा हळूहळू संपतो.
चुकीच्या लोकांबरोबर राहिल्यास चुकीच्या सवयी लागतात आणि पैसा खर्च होतो.