Ambedkar Jayanti Speech  canva
लाईफस्टाईल

Ambedkar Jayanti 2025: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा; 14 एप्रिल भिम जयंती विशेष सोपे अन् शिक्षणाचे महत्व पटवून देणारे भाषण

Ambedkar Jayanti Speech: १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या शिक्षण, समता आणि संविधानातील योगदानाच्या प्रेरणादायी मुद्द्यांसह. विद्यार्थ्यांसाठी आदर्श विचार आणि भाषणाचे मुद्दे पुढील माहितीत तुम्हाला सहज मिळतील.

Saam Tv

Ambedkar Jayanti 2025: 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस भारतात मोठ्या धामधूमीत साजरा केला जातो. भीमराव रामजी आंबेडकर हे शिक्षणाने समृद्ध होते. तसेच त्यांनी ३२ हून अधिक पदव्या त्यांच्या शिक्षणाने प्राप्त केल्या होत्या. तसेच भारतीय संविधान सभेचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. तर महिलांसाठी वारसा हक्क, शिक्षण, आणि स्वातंत्र्य यासाठी अनेक कायदे तयार केले. अशाच थोर व्यक्तीच्या जयंती निमित्त समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देणारे भाषण आपण पुढील मुद्दयांद्वारे देऊ शकता.

भाषणाची सरुवात (Ambedkar Jayanti speech)

विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध. तसेच परमपुज्य भारतरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज या महापुरुषांना त्रिवार अभिवादन. आज १४ एप्रिल, एक असा दिवस आहे जो भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. आज शुन्यातून विश्व गाठणाऱ्या थोर महापुरुषाचा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 सावी जयंती आपण साजरी करत आहोत. (Ambedkar Jayanti 2025)

बाबासाहेबांचा जन्म १८९१ साली मध्य प्रदेशातील महू येथे झाला. जातीभेदाच्या, अपमानाच्या अंधकारमय काळात ते लहानाचे मोठे झाले. पण तरीही त्यांनी शिक्षण सोडलं नाही. त्यांनी तर त्यांनी जगातील काही श्रेष्ठ विद्यापीठांतून शिक्षण घेतले. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांचा त्यात समावेश आहे. बाबासाहेबांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार केला. जो आजही आपल्या लोकशाहीचा पाया आहे. ते संविधान समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि मानवी हक्कांवर आधारित आहे. इतकेच नाही तर त्यांनी सर्व भारतीयांना "एक माणूस, एक मत, एक हक्क" याचे अधिकार दिले.

डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणासोबत संपूर्ण आयुष्य दलित, गरीब आणि वंचित समाजासाठी समर्पित केलं. त्यांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, शिक्षणाचा प्रचार, आणि महिलांना समान हक्क मिळावा यासाठी अनेक संघर्ष केले अनेक खस्ता खाल्या. पुढे त्यांनी १९५६ साली नागपूरमध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. धम्म दीक्षेचा तो ऐतिहासिक क्षण आज लाखो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन आला आहे.

बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात समाजाला तीन गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." याची सुरुवात पुस्तकांपासून प्रेरणा देऊन केली. आज आपण जेव्हा त्यांची जयंती साजरी करतो, तेव्हा आपल्याला समानतेचा, प्रगतीचा आणि शिक्षणाचा विचार पुन्हा पुन्हा आठवतो.

चला तर मग, बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपणही समतेचा भारत घडवूया!

जय भीम!

धन्यवाद!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर, गोदिंया, गडचिरोलीला रेड अलर्ट

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

MS Dhoni : एमएस धोनी किती कोटींचा मालक?

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: आजपासून ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

SCROLL FOR NEXT