Saam Tv
हॉटेलमध्ये मिळणारे छोले भटूरे तुम्ही आता घरच्या घरी खाऊ शकता.
याची रेसिपी अगदी साधी सोपी आणि १५ मिनिटांत बनणारी अशी आहे.
मीठ, मैदा, पाणी, दूध, रवा, तेल,साखर, तळण्यासाठी तेल, सोडा वॉटर इ.
अर्धा कप पाण्यात साखर मिसळा आणि विरघळेपर्यंत ढवळा.
एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या आणि त्यात रवा मिसळा.
मीठ साखरेचे पाणी आणि तेल एकत्र करा.
सोडा पाणी घ्या आणि पीठ मळायला सुरुवात करा.
जेव्हा पीठ अर्धवट कोरडं होईल तेव्हा त्यात दूध घावा आणि पीठ मळून ठेवा.
आता तेल गरम करा. मग त्यात तुम्हाला हव्या त्या आकाराची पोळी लाटून सोडा.
आता तुम्ही छोले भटूरे सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आणि भाजीसह जेवणावर ताव मारा.