हिंदू धर्मात, सकाळी देवपूजा करण्याला विशेष महत्व आहे. अनेकजण आपल्या श्रद्धेप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करतात. रोज नित्यनियमाने देवाची पूजा करताना देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावतात. घर, मंदिर आणि पूजनीय ठिकाणी देवाच्या मूर्तीजवळ अगरबत्ती लावलेली असते. काहीजण एक तर काहीजण दोन तीन अश्या अगरबत्ती लावतात. परंतु देवपूजा करताना देवासमोर नेमक्या किती अगरबत्ती लावाव्यात असा प्रश्न अनेकांना पडतो.
देवपूजेत अगरबत्ती लावणे अत्यंत शुभ मानले जाते. फार पूर्वीपासून ही परंपरा मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, सकाळी आणि संध्याकाळी देवपूजेदरम्यान अगरबत्ती लावली जाते. अगरबत्ती लावल्याने वातावरण प्रसन्न आणि भक्तिपूर्ण होते. मात्र देवपूजेदरम्यान नेमके किती अगरबत्ती लावाव्यात याविषयी धार्मिक समजूती आहेत.
ज्योतिषशास्त्रानसार, घरातील देवपूजेदरम्यान एक किंवा तीन अगरबत्ती लावणे टाळले जाते. त्याऐवजी दोन, पाच, सात, नऊ किंवा अकरा अगरबत्ती लावण्याची प्रथा आहे यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते आणि सुख- समृद्धी वाढते.
देवपूजेदरम्यान अगरबत्ती लावण्यासाठी तुम्ही काही नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. अगरबत्ती भांडे नेहमी स्वच्छ ठेवावे. आधी जर तुम्ही अगरबत्ती लावली असेल तर स्वच्छ करा.
दिव्याच्या ज्योतीने अगरबत्ती लावू नका
पूजेच्या वेळी तुम्हाला जर अगरबत्ती पेटवायची असेल तर तुम्ही पेटलेल्या दिव्याच्या ज्योतीने अगरबत्ती पेटवू नका. धार्मिक श्रद्धेनुसार हे अयोग्य मानले जाते. अगरबत्ती स्वतंत्रपणे लावावी हे लक्षात ठेवा.
टिप
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.