Diabetic Patients In India Saam tv
लाईफस्टाईल

Diabetic Patients In India : भारतात 11 पैकी 1 व्यक्ती मधुमेहांने ग्रस्त; TIR च्या मदतीने ICU चा धोका कमी, संशोधनातून सिद्ध

कोमल दामुद्रे

Sugar Control : अलीकडे संपूर्ण भारतात मधुमेहग्रस्तांचा विळखा अधिक प्रमाणात आढळून आले. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, तणावामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, ग्लुकोजसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमधून टाइम-इन-रेंज (TIR) डेटावरुन मधुमेहांची (Diabetes) आकडेवारी गोळा करण्यात आली. ज्यामुळे मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींना आपल्या शरीरातील ग्लुकोज नियंत्रणाची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते.

आज, मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींसाठी ग्लुकोजच्या पातळीवर देखरेख करणारी नवनवी तंत्रज्ञाने कधी नव्हे इतक्या संख्येने उपलब्ध आहेत. कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) उपकरणे बाजारात आल्यापासून आपल्या ग्लुकोजच्या पातळीचा आलेख चढता आहे की उतरता आहे हे पाहता येते आणि हा कल पाहता त्यांना आपल्या आहार (Food) व व्यायामाविषयीचे निर्णय संपूर्ण माहितीनिशी घेता येतात.

CGM उपकरणाचा वापर केल्यास तपासणीसाठी अनेकदा बोटाला सुई टोचून घेण्याचा प्रकार टळत असल्याने एखाद्या व्यक्तीचे आपल्या मधुमेहावर किती नियंत्रण आहे हे निश्चितपणे कळण्यासही मदत होते.

७० mg/dL आणि १८० mg/dL या स्वीट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाइम इन रेंज' (TIR) मध्ये एखादी व्यक्ती किती वेळ आहे यावरून त्या व्यक्तीचा आहार, अन्न आणि औषधांचा (Medicine) ग्लुकोजच्या नियंत्रणावर कसा परिणाम होतो हे समजून घेता येते. सर्वसाधारणपणे दर दिवशी १७ तास किंवा ७० टक्के इतक्या कालावधीसाठी ही सातत्यपूर्ण तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवले गेले पाहिजे.

भारत, अॅबॉट डायबेटिस केअरचे डॉ. प्रशांत सुब्रमण्यन सांगतात, जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान आणि संकल्पना यांच्यामुळे मधुमेहाच्या देखभालीमध्ये मोठी उत्क्रांती घडून आली आहे. ग्लुकोजची पातळी सातत्याने तपासणाऱ्या उपकरणांमुळे भारतात मधुमेहाचे अधिक प्रगत पद्धतीने व्यवस्थापन करता येऊ शकते, ज्यामुळे ग्लुकोजच्या पातळीची आकडेवारी लोकांच्या हाती येते, ज्यात टाइम इन रेंजसारख्या आलेखांमुळे रुग्णाच्या स्थितीची व्यक्तीविशिष्ट सखोल माहिती प्राप्त होते. यामुळे लोक ग्लुकोज पातळीचा कल कसा आहे याबद्दल सक्रीय होतात व त्यानुसार जीवनशैली किंवा उपचारांशी निगडित निर्णय घेत आपल्या ग्लुकोज पातळीवर अधिक चांगले नियंत्रण मिळवू शकतात.

मुंबईतील ब्लिस टोटल डायबेटिस केअर येथील मधुमेहतज्ज्ञ डॉ. बेन्स्ले एल गोन्साल्व्हीस म्हणाले, भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांमधील दुसऱ्या क्रमांकाचा देश असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्ती आपली स्थिती समजून ती अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी उपलब्ध साधनांचा वापर कसा करू शकतात हे माहीत करून घेणे महत्त्वाचे आहे.

कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगसारख्या उपकरणांचे पर्याय आज उपलब्ध आहेत, जे या आजाराच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनात मदत करतात. अशा उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. कारण त्यामुळे लोकांना व्यक्तीगत आणि वापरात आणण्याजोग्या माहितीच्या आधारे आपल्या ग्लुकोजच्या पातळीवर अधिक चांगले नियंत्रण ठेवता येते, जेणेकरून त्यांना अधिक चांगल्या दर्जाचे आयुष्य जगता यावे.

टाइम इन रेंज सांभाळत मधुमेहग्रस्त वक्ती या आजाराशी संबंधित इतर अनेक गुंतागूंतींचा धोका कमी करू शकतात हे तज्ज्ञांकडून अधोरेखित करण्यात आले आहे. ८० टक्क्यांहून अधिक TIR असणाऱ्या मधुमेहग्रस्त व्यक्ती कशाप्रकारे जखमांमुळे होणाऱ्या जंतुसंसर्गाचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकतात आणि कशाप्रकारे त्यांना ICU मध्ये फार काळ राहावे लागत नाही हे सर्वसहमत संशोधनातून ठळकपणे मांडण्यात आले आहे.

त्याचबरोबर TIR चा कालावधी अवघ्या १० टक्क्यांनीही कमी झाल्यास मधुमेहाशी निगडित नेत्रविकारांचा (रेटिनोपॅथी) धोका ६४ टक्क्यांनी वाढू शकतो व व्यक्तीच्या लघवीतील अल्बुमीन प्रोटीनची पातळी(मायक्रोअल्बुमिनयुरिया) ४० टक्क्यांनी वाढू शकते, जे किडनीच्या आजाराचे धोका असू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT