Honeymoon Destination Saam TV
Image Story

Honeymoon Destination: हनिमूनसाठी परदेशात जायचंय? अवघ्या 40 हजार रुपयांमध्ये 'या' ठिकाणांना ह्या भेट , जाणून घ्या...

बहुतेक भारतीय जोडप्यांना हनिमूनला देशाबाहेर कुठल्यातरी रोमँटिक ठिकाणी जायचे असते, पण परदेश प्रवासाचा खर्च आणि व्हिसाच्या समस्येमुळे परदेशात हनिमून साजरा करण्याची इच्छा स्वप्नच बनते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल लग्नानंतर हनिमूनला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. नवविवाहित जोडपे त्यांच्या जोडीदारांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाची अविस्मरणीय सुरुवात करण्यासाठी लग्नानंतर हनिमूनला जातात. बहुतेक भारतीय जोडप्यांना हनिमूनला देशाबाहेर कुठल्यातरी रोमँटिक ठिकाणी जायचे असते, पण परदेश प्रवासाचा खर्च आणि व्हिसाच्या समस्येमुळे परदेशात हनिमून साजरा करण्याची इच्छा स्वप्नच बनते. तथापि, परदेशात हनीमूनला जाणे तितके महाग नाही.

honeymoon places

जर तुम्हाला कमी पैशात परदेशात जायचे असेल तर असा देश निवडा ज्याचे विमान तिकीट स्वस्त आहे. सर्वात मोठा खर्च फ्लाइट तिकिटांमध्ये होतो, त्यामुळे तुम्ही भारतातून स्वस्त उड्डाणे असलेल्या देशांमध्ये प्रवास करू शकता. याशिवाय, आजकाल जोडप्यांसाठी अनेक हनिमून टूर पॅकेज देखील उपलब्ध आहेत, जे स्वस्त दरात प्रवास करण्याची संधी देतात. भारतीयांसाठी परदेशातील स्वस्त हनिमून ठिकाणे जाणून घेऊ या, जिथे तुम्ही 40,000 ते 50,000 रुपयांमध्ये प्रवास करू शकता.

sri lanka

श्रीलंका

भारतातून श्रीलंकेला जाणे स्वस्त आहे. भारत ते श्रीलंकेच्या फ्लाइटची तिकिटे 9000 ते 10000 रुपयांपर्यंत उपलब्ध असतील. तसेच, श्रीलंका हा भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा मुक्त देश आहे. यामुळे व्हिसासाठीही खर्च नाही. श्रीलंकेत 1500 ते 2000 रुपयांमध्ये तुम्हाला हॉटेल रूम मिळू शकते. दोन लोकांसाठी एका दिवसाच्या जेवणाची किंमत 1000 ते 1500 रुपये असू शकते. तुम्ही फक्त 40,000 रुपयांमध्ये भारत ते श्रीलंकेच्या बजेट ट्रिपला जाऊ शकता.

maldives

मालदीव

मालदीव हे खूप भारतीयांचे आवडते ठिकाण आहे. इंडिया ते मालदीवपर्यंतच्या फ्लाईट्स तिकीट खूप स्वस्त आहे. एकेरी तिकीट 8000 ते 9000 रुपयांना मिळेल. येथे तुम्ही 2000 रुपयांपर्यंत हॉटेल रुम बुक करु शकता. येथे जेवणाची किंमत दररोज 1500 ते 2000 रुपये असू शकते. हा देश भारतीयांसाठी व्हिसा-फ्रि देश आहे. दोन जणांसाठी किमान 400000 खर्च येतो.

malaysia

मलेशिया

हनिमूनसाठी मलेशिया हे सर्वोत्तम ठिकाण आहे. इंडिया ते मलेशियापर्यंत फ्लाईट्सच्या तिकीटाची किंमत 9000 ते 10000 पर्यंत उपलब्ध असू शकते. दोन जणांसाठी फ्लाईटच्या तिकीटाची किंमत 36000 रुपयांपर्यंत असू शकते. येथे हॉटोल बुकिंग 2000 रुपयांपर्यंत आहेत.

Written By: Dhanshri Shintre.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अकोल्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा गर्दीत अडकला

MNS vs Thackeray Group : ठाकरे गटात जाताच अखिल चित्रेंचा राज ठाकरेंवरच हल्लाबोल, VIDEO

MNS - Shinde Group : मनसे - शिंदेसेना संघर्षाचं कारण आलं समोर, एकनाथ शिंदेंनी केला गौप्यस्पोट | VIDEO

Anil Ambani: अनिल अंबानीचं रोजा पॉवर शेअर्सनं बदललं नशीब; फेडलं सारं कर्ज

IPL 2025 New Rule:Ben Stokes आयपीएलचे पुढील २ हंगाम खेळू शकणार नाही! काय आहे BCCI चा नवीन नियम?

SCROLL FOR NEXT