Panchgrahi Yog saam tv
राशिभविष्य

Panchgrahi Yog: कर्मदाता शनी बनवणार पाॉवरफुल पंचग्रही राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा; प्रमोशनही मिळणार

Panchgrahi Yog 2025: ग्रहांच्या गोचरमुळे अनेक राजयोग निर्माण होतात. येत्या काळात मीन राशीमध्ये पंचग्रही राजयोगांची निर्मिती होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती ही महत्त्वाची मानली जाते. यंदाच्या वर्षी ग्रहांच्या स्थितीमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत किंवा होणार आहेत. येत्या काळात होणाऱ्या मोठ्या ग्रहांच्या बदलांचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. यंदाच्या वर्षी मंगळाचं राज्य असून शनीने देखील गोचर केलं आहे.

येत्या काळात मीन राशीत अनेक मोठ्या ग्रहांचा मेळावा भरणार असून शनीसोबत राहू, बुध आणि शुक्र हे मोठे ग्रह देखील मीन राशीत आहेत. उद्या म्हणजेच २५ एप्रिल रोजी चंद्र देखील या राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे पंचग्रही राजयोग तयार होणार आहे. जवळपास ५४ तास हा राजयोग तयार होणार आहे.

या ग्रहांच्या एकत्र येण्याने तयार होणार पंचग्रही राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता आहे ते पाहूयात.

मीन रास

या राशीच्या लग्न घरात हा राजयोग तयार होत असल्याने या व्यक्तींना चांगलाच फायदा होणार आहे. समाजातील तुमचं स्थान मजबूत होणार आहे. तुम्हाला यावेळी मानसिक शांतता मिळणार असून तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे. भविष्याशी संबंधीत काही चांगे निर्णय तुम्ही घेऊ शकता.

कर्क रास

या राशींच्या व्यक्तींसाठी पंचग्रही राजयोग लकी ठरणार आहे. या काळात तुम्हाला जोडीदाराची संपूर्ण साथ मिळणार आहे. आयुष्यात नवे धडेही शिकायला मिळतील. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या व्यक्तींना पंचग्रही योगामुळे चांगले फायदे मिळणार आहेत. करियरमध्ये तुमची प्रगती होणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या पगारात वाढ होणार आहे. शारीरिक समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT