horoscope  Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : बाहेरचे पाणी आणि खाण्यापासून राहा सावध, अन्यथा...; 'या' राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तर काहींना अचानक धनलाभ होईल.

Anjali Potdar

आजचं पचांग

बुधवार,९जुलै २०२५,आषाढ शुक्लपक्ष.

तिथी-चतुर्दशी २५|३७

रास-धनु

नक्षत्र-मूळ

योग-ब्रह्मा

करण-गरज

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - प्रेमामध्ये विशेष यश प्राप्त होईल. द्रुतगती प्रवास घडतील. अध्यात्मात विशेष करून राहील. क्रीडा क्षेत्रात आपला झेंडा लावाल. दिवस चांगला आहे. गणेश उपासना विशेष फलदायी ठरेल.

वृषभ - अचानक धनलाभ आहे. ठरवता मोठा पैसा मिळण्याचे आज योग आहेत. आव्हानात्मक कामे आज घ्यावी लागतील. शक्ती आणि युक्ती दोन्हीही वापरून टाळमेळ साधावा लागेल.

मिथुन - कोर्टामध्ये बाजी माराल . समोरच्या व्यक्तीला व्यवसायामध्ये बोलून आपले म्हणणे छानसे पटवून द्याल. व्यापार वाढीसाठी असणाऱ्या गोष्टी सहज मार्गी लागतील. दिवस चांगला आहे.

कर्क - बाहेरचे पाणी आणि खाण्यापासून सावध राहावे. पोटाचे निगडित आजार होण्याची आज दाट शक्यता आहे. मानसिकता सुद्धा तितकीच सांभाळावी लागेल. आपलेच लोक आपले वैरी आहेत अशी भावना होईल.

सिंह - नव्याने काही गोष्टी शिकायला मिळतील. कदाचित संततीकडूनच चांगल्या बातम्या येतील किंवा त्यांच्याकडूनच छानशी एखादी गोष्ट शिकाल. अनेक जणांच्या जबाबदाऱ्या घेऊन पुढे जावं लागेल. पण यश नक्की मिळेल.

कन्या - व्यापार व्यवसायामध्ये वृद्धी आहे. प्रॉपर्टीच्या कामामध्ये व्यवहार सहजगत्या पार पडतील. मातृसौख्य वाहनसौख्य या दृष्टीने दिवस चांगला आहे.

तूळ -जवळच्या प्रवासातून फायदा आहे. पैशाशी निगडित व्यवहार सहज पार पडतील. वैश्य प्रवृत्तीची आपली रास आहे जितके फिराल तेवढा फायदा पदरात पडेल. जिद्द आणि चिकाटी कायम ठेवावी लागेल.

वृश्चिक - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. तिखट, मसालेदार चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होईल. कुटुंबीयांच्या सहकार्याने आयुष्याचा एक नवा टप्पा पार पाडाल.

धनु - आपले म्हणणे आपल्याला कायमच रास्त वाटते. जे ठरवले आहे ते आज करालंच असाच आवेश दिवसभरामध्ये राहील. मी आणि माझा यामध्ये व्यस्त असलेला आजचा दिवस आहे.

मकर -कष्टिक असणारी आपली रास. आज विनाकारण भावनेचा कल्लोळ माजेल. मात्र मनोबल थोडे कमीच राहील. जवळच्या लोकांच्या मानसिक आधाराची आज गरज आहे. कदाचित तब्येतीच्या तक्रारीमुळे मन त्रस्त राहील.

कुंभ - मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आनंदाने न्हाल. जे ठरवलेले आहे त्या गोष्टी आज तशाच घडतील. प्रेमामध्ये थोडे तू तू मी मी झाले तरी सुद्धा एकमेकांना समजून घेऊन पुढे जाल. विविध प्रकारचे लाभ मिळतील.

मीन - कोणीतरी स्त्री व्यावसायिक हिच्या माध्यमातून प्रगतीचे योग आहेत. समाजासाठी वेगळे काहीतरी कार्य करण्यासाठी पेटून उठाल. धडाडीने पावले उचलाल. कामाबरोबर मनोरंजन आज सहज घडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajasthan Plane Crash: राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू; पाहा अपघाताचा थरारक VIDEO

Maharashtra Live News Update वर्धा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच

Mumbai Rain : गरज असल्यासच घराबाहेर पडा; मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज |VIDEO

Caffeine Skin Effects : कॉफी प्यायल्याने स्कीन खराब होते का?

Car Models: 'या' कार मॉडेल्स डोंगराळ रस्त्यांवरही देतात जबरदस्त परफॉर्मन्स, किंमत स्पोर्ट्स बाईकपेक्षा कमी

SCROLL FOR NEXT