Tuesday Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : लाडक्या गणरायाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुद्धीचा देवता धन घेऊन येणार

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांवर गणरायाची कृपा होणार आहे. तर काहींना धनलाभ होणार आहे. वाचा आजचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

बुधवार,२७ ऑगस्ट२०२५,भाद्रपद शुक्लपक्ष,

श्री गणेश चतुर्थी.

तिथी-चतुर्थी १५|४५

रास- कन्या १९|२१ नं. कन्या

नक्षत्र-चित्रा (अहोरात्र)

योग-शुभ

करण-विष्टीकरण

दिनविशेष-आनंदी दिवस

मेष - आपल्या राशीला कायमच गणेश उपासना फलदायी असते. आज गणेश चतुर्थी आहे. काही गोष्टी आजच्या दिवसात सकारात्मक भर घालणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाला योग्य न्याय मिळेल. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ - गणेश चतुर्थी व्रतोत्सवाचा आरंभ आज होत आहे. बुद्धीची देवता तुमच्या आयुष्यात आज धन सुद्धा घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन शिक्षणासंदर्भात संकल्प होतील. एखादी जोरकस भूमिका आघाडीवर घेऊन कामे कराल.

मिथुन - घरातील सणाच्या धांदलीमध्ये आज तुम्ही व्यस्त रहाल .घरी पाहुण्यांची उठवस होईल. आनंद उत्सव साजरा कराल याचबरोबर काही नव्याने गोष्टी आपल्या राशीला आज आहेत. जसे की वाहन खरेदी, जमिनीची क्रयविक्रय इत्यादी.

कर्क - भावंड सौख्य उत्तम राहणार आहे. आज जवळचे प्रवास जसे की अष्टविनायक यात्रा, ११ मारुती आपल्याकडून घडणार आहेत. पत्रव्यवहार सुरळीत आणि मार्गी लागतील.

सिंह - पसा भरून असलेले सुख आज द्विगुणीत होणार आहे. गणेशाच्या आगमनामुळे आज कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक राहील. धनयोग चांगले आहेत. सुवर्ण खरेदी होईल. संसारात एकमेकांच्या समजूतदारपणामुळे अनेक कामे हातात हात घालून कराल. ज्यात तुम्हाला विशेष यश मिळेल.

कन्या - नेहमीच चोख कामे करणारी आणि बुद्धिमान अशी असणारी आपली रास. गणेश चतुर्थी निमित्त वेगळाच आनंद आज आपल्यामध्ये असेल. आपल्या इतरांवर प्रभाव कायम राहील. कदाचित चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण जी वैचारिक असेल, आज त्यामध्ये वृद्धी होण्याचा दिवस आहे.

तूळ - सणसमारंभ म्हटलं की काही गोष्टी खिशाला गोष्टी जड होतातच. आज खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कदाचित असे वाटेल की हा खर्च अनाठही झाला. पण गणेशाच्या कृपेने दिवस तुमचा सुलभ आणि मार्गी लागणार हे नक्की.

वृश्चिक - गणनायक असा असणारे गणपती आजच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक लाभ आणि वृद्धीचा मानस घेऊन आलेला आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. मेजवानीचे योग येतील. आनंदमय असा आजचा दिवस आहे.

धनु - कामे तर रोजचीच असतात,आज मात्र तुम्ही कामाच्या ठिकाणी धार्मिक गोष्टीत सामाजिक उपक्रमात विशेष सहभाग घ्याल. यामध्ये तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप नक्की पडणार आहे. अर्थातच गणेशाच्या आगमनाने आपल्या कर्माचा निश्चित उद्धार होणार आहे.

मकर - अनेक दिवस अपेक्षित असणाऱ्या घटना आज गणेशाच्या गणपतीच्या आगमनाने अचानक घडतील आणि एक वेगळाच उत्सवाचा आरंभ आपल्या भाग्यात सुरू होईल. मोठे प्रवास घडण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. यशाची दालने आज आपल्यासाठी खुली होतील.

कुंभ - अडचणींवर मात करण्याची शक्ती आणि ताकद आज गजानन आपल्याला सहज देणार आहे .ठरवलेल्या कामात कदाचित दिरंगाई होईल पण त्यामध्ये प्रत्यक्ष नंतर आलेले सुखही आज आहे. अचानक धनलाभ संभवत आहेत.

मीन - जोडीदाराबरोबर चांगले जमेल. गणेशोत्सवाच्या निमित्त काहीतरी खरेदी, नव्याने व्यवसायाच्या वाटा सापडणार आहेत. सुखमय जीवनाची पाऊलवाट आज सुरू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : अंतरवाली सराटी आंदोलन प्रकरणात गंभीर गुन्हे मागे घेणार?

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : उत्सव मंडपात दगडूशेठ गणपती बाप्पा दाखल

Nagpur : खेळत असताना खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा जीव; पाण्यात बुडून मृत्यू

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रवाना

Maharashtra Government : आता १० तासांची शिफ्ट होणार? फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मंत्रिमंडळ बैठकीत झाली चर्चा

SCROLL FOR NEXT