ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला असे वाटते की, त्यांच्या आयुष्यातील दुःख दूर व्हावे आणि चांगल्या गोष्टी घडाव्यात. परंतु,चांगले दिवस येण्याआधी कोणते संकेत दिसतात, जाणून घ्या.
हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला पांढरी गाय दिसली तर ती तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकते.
जर एखाद्या व्यक्तीला पहाटे मंदिरातील घंटा किंवा शंखाचा आवाज ऐकू आला तर त्याच्या आयुष्यातील वाईट दिवस संपू शकतात.
जर अचानक एखादा पक्षी तुमच्या समोरून गेला तर याचा अर्थ असा की तुमच्या घरात पैसा येऊ शकतो.
झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला कोणी घर झाडताना दिसले तर ते शुभ मानले जाते.
जर एखाद्या पुरूषाच्या उजव्या हाताला आणि महिलेच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असल्याचे संकेत आहे.
घरात काळ्या मुंग्यांचे आगमन हे सांगते की तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते.