
प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १० करण्याची शक्यता आहे. ९ ऐवजी कर्मचाऱ्यांना १० तास काम करावे लागू शकते. महाराष्ट्र सरकार याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यावर बरीच चर्चादेखील झाले.
खाजगी कर्मचाऱ्यांना १० तास काम
सरकार महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायदा, २०१७ मध्ये महत्त्वपूर्व बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये खाजगी कर्मचाऱ्यांचे कमाल कामाचा वेळ १० तास करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. हा कायदा राज्यातील दुकाने, हॉटेलस आणि मनोरंजन स्थळे यासाठी असणार आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० तास काम करावे लागेल.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राज्याच्या कामगावर विभागाने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत बदल करण्यासाठी काही प्रस्ताव ठेवले आहेत. अहवालात म्हटले आहे की, कामगार विभाग २०१७ च्या कायद्यात पाच मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे खाजगी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात वाढ.
एकाच वेळ जास्तीत जास्त ६ तास काम
कामगार कायद्याच्या कलम १२ मध्ये प्रस्तावित दुरुस्तीमध्ये म्हटले आहे की, प्रौढ कर्मचाऱ्यांना दिवसाला १० पेक्षा जास्त वेळ काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.सलग सहा तासांपेक्षा जास्त काम करण्याचीही परवानगी नसणार आहे.त्यांना अर्धा तास ब्रेक दिला जाणार आहे.
ओव्हरटाइमचा प्रस्ताव
श्रम विभागाने प्रायव्हेट सेक्टरमधील ओव्हरटाइमचा कालावधी वाढवला आहे. तीन महिन्यात १२५ तासांचा ओव्हरटाइमचा कालावधी १४४ तास करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एका दिवासाला तुम्ही एकूण १०.५ तास काम करत होता. हा वेळ वाढवून १२ तास करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.