Maharashtra Government: शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज: बळीराजासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Farmers Loan Waiver: मंत्री संजय राठोड यांनी कर्जमाफीचे संकेत दिल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो. शेतकऱ्यांकडून बऱ्याच काळापासून कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे.
Maharashtra Farmers Loan Waiver
Minister Sanjay Rathod hints at loan waiver, farmers across Maharashtra hopeful for reliefsaamtv
Published On
Summary
  • राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत.

  • शेतकरी व नेत्यांकडून वारंवार कर्जमाफीची मागणी.

  • मंत्री संजय राठोड यांनी दिलासा देणारे विधान केलं.

  • लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वसान देत महायुती सरकार सत्तेत आले. मात्र अद्याप सरकारने बळीराजाची कर्जमाफीची मागणी पूर्ण केली नाहीये. कर्जमाफी करण्यात यावी ही मागणी शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांनी वारंवार केलीय. पण त्याबाबत समिती नेमली जाणार मग घोषणा केली जाईल असं बतावणी करत मंत्री शेतकऱ्यांना चकवा देत आहेत. मात्र आता कर्जमाफी प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय.

Maharashtra Farmers Loan Waiver
Property Rules: 'कुलमुखत्यारपत्र' म्हणजे काय रं तात्या? जमीन,मालमत्तेच्या व्यवहारात कसा होतो फायदा?

महायुतीमधील मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केलीय. मुख्यमंत्री लवकरच राज्यातील बळीराजाची मागणी पूर्ण करणार आहेत, असे सुतोवाच मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. पुसद येथे एका पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विधान केलंय. यवतमाळच्या पुसद येथे हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी कृषी गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री संजय राठोड हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विधान केलं.

Maharashtra Farmers Loan Waiver
Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना संजय राठोड म्हणाले, हा पुरस्कार नसून नव्या पिढीला दिलेला ठेवा आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरूय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील. महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख आहे. राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याची घोषणा केली जाईल.

Maharashtra Farmers Loan Waiver
Agriculture Scheme: शेतात सिंचन व्यवस्था करायचीय? मग तयार करा शेततळं; सरकार देणार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही दिले संकेत

दरम्यान मंत्री राठोड यांच्याआधी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं. मीही शेतकरी पुत्र आहे. शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला आहे. सकाळी उठलो तरी मला शेती दिसते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहितीयेत. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असं कृषीमंत्री म्हणाले होते.

कर्जमाफीबाबत समितीकडून काम केलं जात आहे. योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समिती नेमण्यात आलीय, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवसापूर्वी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com