Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२५, गणरायाचे आज आगमन, मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच, पहिला मुक्काम जुन्नरमध्ये, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Ahilyaagar: नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद...

ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी भटक्या कुत्र्यांचा महिलेवर हल्ला...

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी कुत्र्यांनी तोडले हाताने पायाची लचके...

गंभीर महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल...

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा भटकी कुत्री आयुक्तांच्या जालना सोडणार माजी नगरसेवक निखिल वारे यांचा इशारा

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.

वडीगोद्री या ठिकाणी त्यांचा स्वागत करण्यात येणार

मनोज जरांगे पाटील आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. अटी-शर्थीवर मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळू शकते. मुंबईकडे कूच करण्याआधीच मनोज जरांगे पाटील यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाला परवानगी देण्याबाबत विचार सूरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Manoj Jarange Patil: एकानेही दगडफेक-जाळपोळ करायची नाही, मनोज जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन

मराठ्यांचा संयम ढळू देऊ नका. मला गोळ्या घाला. मी मागे हटणार नाही. देवेंद्र फडणवीस तुमच्या आडमुठ्या धोरणुळे झाले आहे. आपण डाव टाकून रस्ता सर करणार. मुंबईपर्यंत पोहचणार. शांततेचे आंदोलन कोणही अडवणूक करणार नाही. सात आठ टप्पे ठरले आहेत त्यानुसार येत जात राहतील. एकानेही दगडफेक जाळपोळ करायची नाही. निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. मुंबईत त्रास देईल कोणी तर साथ द्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मुंबईत मला गोळ्या घाला, मी बलिदान द्यायला तयार - मनोज जरांगे पाटील

काल एका तरूणाने आत्महत्या केली. ते करू नका.. मराठ्यांना तुम्ही आडवले, गॅझेट असून देत नाही. मराठा आणि कुणबी एक आहेत. ५८ लाख एक असून एकाने लातूरमध्ये आत्महत्याचा प्रयत्न केला. फडणवीस साहेब मराठ्यांचा संयम ढासळू देऊ नका. मी बलीदान द्यायला तयार आहे. मुंबईमध्ये आल्यावर मला गोळ्या झाडा. आमच्या शेकडो आत्महत्या तुमच्यामुळे झाल्या आहेत. त्याला जबाबदार तुम्ही आहे.

कोर्ट आम्हाला १०० टक्के न्याय देणार- मनोज जरांगे पाटील

कोर्ट आम्हाला १०० टक्के न्याय देणार. आमचेही वकील न्यायदेवतेसमोर उभे राहणार आहेत. कोर्ट आम्हाला न्याय देणार आहे. आपण रितसर अर्ज दिला.. पण त्यांनी नवा कायदा केला अन् अडवणूक केली. त्या कार्यालयच दिसत नाही. इतका मोठा कायदा केला, पण त्याचं ऑफिस कुठे नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

दहशतवाद्यासारखे डाव टाकले जातात- मनोज जरांगे पाटील

गणेशोत्सवाला गालबोल लागेल, असे आम्ही कधीही काही करणार नाही. चूक झाकण्यासाठी देव-देवतांना पुढे केले जातेय. हिंदूंना अडवण्याचा प्रयत्न का केला जातोय. कितीही दिवस लागले तरी संयमाने संघर्ष केला जातोय. फडणवीस सरकारने दहशतवाद्यासारखे डाव टाकले नाही पाहिजे. इंग्रजांच्या काळातही उपोषण रोखले जात नाही. ते फडणवीस यांच्या काळात रोखले जात आहेत.

सयंम ढळू द्यायचा नाही- मनोज जरांगे पाटील

आपल्या न्यायासाठी मुंबईला सर्वांना जायचे आहे. आपण पत्रकार परिषद संपली की आपण थांबायचे नाही, शेवटी आपल्यासाठी लढायचे आहे. २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू होईल.

समजाची मान खाली जाईल असे एकानेही वागायचे नाही. शांत डोक्याने राहायचे. आता आरपाराची लढायची शेवटची खेळायची आहे.

घाईगडबड करू नका. सयंम ढळू द्यायचा नाही- मनोज जरांगे पाटील

आम्ही हिंदू असून आम्हाला रोखलं जाते- मनोज जरांगे पाटील

देव-देवताच्या नावाखाली आपली, अडवणूक केली जाते, त्रास दिला जातो. आम्ही हिंदू असून आम्हाला रोखलं जाते. गणपती उत्सव, महादेव सर्व देवांची पूजा करतो. ज्यांना हिंदुत्वाची, देवाचं देणंघेणं नाही. ते आम्हाला आडवता. आम्ही पिढ्यापरंरपरेने सेवा करतो. पण हिंदू देवाच्या नावाखाली आमचीच आडवणूक का.. याचे उत्तर मोदी शाह यांनी द्यावे.- मनोज जरांगे पाटील

मुंबईकडे कूच करण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी केली बाप्पाची आरती

आज लाखो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना होणार आहे. मनोज जरांगे पाटील आज आंतरवाली सराटीतून निघणार आहेत. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी बाप्पाची आरती केली आहे. मुंबईकडे कूच करण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी बाप्पाची आरती केली. लाखो मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेतल्यानंतर मंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

धाराशिव जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव अंतरवली सराटी कडे रवाना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर राज्यभरातुन मराठा समाज आंतरवली सराटीकडे निघाले असुन जरांगे पाटील यांच्यासह ते मुंबईकडे निघणार आहे. धाराशिव जिल्ह्यातुन हजारो बांधव राञी पासुन गावा गावातुन मराठा बांधव अंतरवली सराटीकडे कुच करताना पाहायला मिळत आहेत.जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही.

बीड जिल्ह्यातून मराठा मावळे आंतरवलीच्या दिशेने रवाना ' मुंबईला जाणार

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमी वरती मनोज जरांगे पाटील आज अंतर्वली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत याच पार्श्वभूमी वरती बीड जिल्ह्यातून मराठा मावळे आता अंतरवालीच्या दिशेने रवाना होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा असून मुंबईला जाणार आणि आरक्षणाचा गुलाल घेऊनच वापस येणार असा निर्धार मराठा आंदोलकांनी आणि मावळ्यांनी केला आहे आझाद मैदानावरील परवानगी नाकारली म्हणजे सरकारचं हे अपयश आहे मनोज जरांगे पाटलांनी तीन महिन्यापूर्वी सरकारला आझाद मैदानावर आंदोलन करणार

यावल-चोपडा रस्त्यावर लाखाचा गांजा पकडला

यावल, चोपडा रस्त्यावर वन विभागाच्या कार्यालयासमोर ४ किलो गांजा नेताना दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांनी वाघझिरा येथून गांजा आणल्याची कबुली दिली असून, पोलिसांना या प्रकरणी तिघांना अटक केली व त्यांच्याकडून १ लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.वाघझिरा यावल येथून गांजाची खरेदी करून दोन जण भुसावळकडे जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक यांनी यावल-चोपडा मार्गावर सापळा लावण्याच्या सूचना केल्या. वाघझिराकडून वरून युसूफ शहा मुलजार शहा आणि युनूस सुलतान शेख या दोघांना पथकाने वन विभाग कार्यालयासमोर पकडले. त्यांच्याकडून ४ किलो ६० ग्रॅम गांज जप्त केला. गांजासह इतर साहित्य, असा एकूण १ लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांना गांजा कुठून आणला, यासंर्दभात विचारण केली

भामरागड पर्ल कोटा नदीला पूर आल्यामुळे शंभर गावांचा गडचिरोली जिल्ह्याची संपर्क तुटला

छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुलगौतम या तिन्ही नद्यांची पाण्याची पातळी 26 ऑगस्ट रोजी अचानक वाढली. काल रात्रीच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आणि अचानक पाणी वाढल्याने भामरागड तालुका मुख्यालयात पाणी शिरला. मध्यरात्री अचानक पाणी वाढल्याने व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. प्रशासनाने सर्वांना सतर्क करत तालुका मुख्यालयातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दोन दिवस लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे हे, अमरण उपोषण करणार आहेत, दरम्यान त्यांचे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने आजपासून कुच करत आहे.,तर तिकडे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आज पासून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय, आडत असोसिएशन आणि हमाल माथाडी कामगार संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे मोठा आर्थिक फटका लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला बसणार आहे.

Jalna: जालना पोलिसांची मराठा आंदोलकांना नोटीस

जालन्यातील गोंदी पोलिसांकडून मराठा आयोजकांना नोटीसा....

तर मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत अटी शर्तीसह परवानगी...

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 प्रमाणे नोटीसा

वाहतूक नियम पाळण्यासह शांततेत मोर्चा करण्याच्या सूचना.

मोर्चामध्ये आक्षेपार्ह घोषणा होणार नाही याची आंदोलकांनी काळजी घेण्याच्या सूचना...

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वर्तन न करण्याच्या सूचना...

वाहतूक मार्गाचे पालन करण्याच्या देखील सूचना...

न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना

कळंब येथील श्रीचिंतामणी मंदिरात दर बारा वर्षांनी अवतरते गंगा

कापसाचा शोध कळंब येथूनच लागल्याचे जाणकारांचे मत

विदर्भाचे अष्टविनायक श्रीचिंतामणी,भगवान इंद्राने चिंतामणीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे गणेशपुराणात दाखले

चिंतामणीचे मंदिर एका सरोवरात स्थापना करण्यात आले असून जमिनीपासून तीस फूट खोल आहे मंदिर

हेमाडपंथीच्या काळातील मंदिर असून तीनही बाजूनी प्रवेशद्वार,प्रमुख प्रवेशद्वारावर चौमुखी गणेशमूर्ती

एकाच दगडात गणेश मूर्ती कोरलेली असून मूर्तीचे हात एकमेकांत मिळालेले आहेत संपूर्ण भारतात येथील एकमेव गणेशमूर्ती दक्षिणाभिमुख आहे असे जाणकार सांगतात

तळेगाव स्टेशन जवळील तळ्यात आढळला युवकाचा मृतदेह, दोन दिवसांत दुसरी घटना, परिसरात चर्चांना उधाण

मावळच्या तळेगाव दाभाडे स्टेशन जवळील तळ्यात पुन्हा एक मृतदेह आढळून आला असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आदेश बोराटे वय सत्तावीस वर्षे असे मृत तरुणाचे नाव असून, दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका बावीस वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना घडली होती....सलग दोन दिवसांत एकाच ठिकाणी दोन मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ही फक्त योगायोगाची घटना आहे, की यामागे काही गंभीर गुन्हा दडलेला आहे, याबाबत पोलीस यंत्रणा तपास करत आहे. मृत तरुण आणि दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीचे परस्पर संबंध काय होते, ते एकमेकांना ओळखत होते का, याचा शोध घेतला जात आहे. मृत्यूचे कारण आत्महत्या आहे की काही वेगळा गुन्हा यामागे दडलेला आहे, याचा तपास तळेगाव पोलीस करीत आहे..

उल्हासनगर पवई चौकात ट्रकवरील कंटेनर कोसळला, जीवितहानी टळली

उल्हासनगर मधील पवई चौकात पहाटेच्या वेळी एका ट्रकवरील कंटेनर अचानक खाली कोसळला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पवई चौक हा उल्हासनगर शहरातील महत्त्वाचा चौक असून येथून कल्याण आणि अंबरनाथकडे जाणाऱ्या गाड्यांची सतत वर्दळ असते. दिवसा ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र घटनेची वेळ पहाटेची असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

धाराशिव जिल्ह्यात 4 दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

धाराशिव जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक सुरज जाधव यांच्यासह हवामान विभागाने व्यक्त केला आहे.धारशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.गत 4 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला होता माञ आता पुन्हा एखदा पावसाला सुरुवात होणार आहे.त्यामूळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या फवराणीसह अन्य शेतातील कामे उरकुन घ्यावीत अस हवामान अभ्यासक जाधव यांनी सांगितले.

उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत चोरी

धाराशिव च्या उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरच्या साह्याने दरवाजा तोडुन 19 लाख 39 हजार 349 रोख रक्कम लंपास केली आहे.चोरी करताना चोरट्यांनी तोंडाला मास्क लावल्याने बॉकेतील सिसिटिव्ही कॅमेऱ्यात चेहरा दिसत नाही,कॅमेऱ्यावर स्प्रे मारुन गॅस कटरच्या साह्याने तिजोरी तोडुन रोकड लंपास केली हे चोरटे जवळपास दोन ते अडीच तास बॅंकेत होते.या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असुन पोलिस अधिक तपास करत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक, नांदेड जिल्ह्यातून मराठा बांधव मुंबईसाठी रवाना

मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. त्यांना नांदेड जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. नांदेड जिल्ह्यातून असंख्य मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील 200 ते 250 मराठा बांधव टेम्पो आणि वाहनाच्या साह्याने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. 15 ते 20 दिवस पुरेल एवढं अन्नधान्य सोबत घेऊन हे मराठा बांधव निघाले आहेत.जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार फिरणार नाही अशी भूमिका या मराठा बांधवांनी घेतली आहे

अति पावसानंतर सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचं संकट

वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर आता सोयाबीन पिकावर येल्लो मोझॅक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असून, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहलय. मोझॅकमुळं सोयाबीनची पानं पिवळी पडत असून, पीक सुकतंय त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त,

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सकाळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांची तयारी देखील पूर्ण झाली असून जवळपास 450 कर्मचारी अधिकारी मनोज जरांगे यांच्या मोर्चासाठी बंदोबस्तात तैनात असणार आहे.दोन एसआरपीएफच्या कंपन्यासह बॉम्ब शोधक पथक देखील असणार आहे तर मनोज जारंगे पाटील यांच्या मोर्चावर पोलिसांच्या ड्रोनची नजर असणार आहे. दरम्यान मराठा आंदोलकांना पोलिसांनी शांततेच आवाहन केलं आहे.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार, जालन्यात तगडा पोलीस बंदोबस्त

मनोज जरंग यांना मराठा समाजाचाच नाही तर धनगर समाजाने पाठिंबा दर्शवला आहे

धनगर समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आंतरली मध्ये दाखल झाले.

ओबीसी मराठावाद सुरू असतानाच धनगर समाज जरंगें बरोबर पाहायला मिळतो.

यशवंत सेनेचे पदाधिकारी राज्यभरातून अंतरवलीत दाखल

वडगावशेरी पाणीटंचाईा तीव्र

पुण्यातील वडगावशेरी भागातील नागरिकांना मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत असल्याचा आरोप आज स्थानिक आमदार बापू पठारे यांनी करत थेट महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला.

वडगावशेरी मतदारसंघामध्ये पुणे महानगरपालिकेमार्फत भामा आसखेड, लष्कर पाणीपुरवठा, होळकर पाणीपुरवठा तसेच रावेत जलशुद्धीकरण केंद्र येथून पाणी पुरवले जाते. या उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे विमाननगर, खराडी, चंदननगर व वडगावशेरी या परिसरात दररोज २.५० ते ३ तास पाणीपुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. नागरिकांच्या मुलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचं आमदार बापू पठारे यांनी यावेळी सांगितलं

शिरूर येथे यशवंत संघर्ष सेनेचा मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिरूर तालुक्यातील आळंदी-शिरूर परिसरातील शेकडो तरुण आज उत्साहाने रवाना झाले.

हातात भगवे झेंडे, तोंडावर घोषणाबाजी आणि डोळ्यांत लढाऊ जोश घेऊन निघालेल्या या युवकांनी परिसर दणाणून टाकला.या मोर्चाला यशवंत संघर्ष सेनेचा विशेष पाठिंबा मिळाला असून संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा काफिला अंतरवली सराटीकडे गेला. यावेळी तालुका अध्यक्ष शिवाजी गडदरे, उपाध्यक्ष संतोष कर्डिले, तसेच संपर्कप्रमुख सतीश सोनलकर उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मराठा आरक्षण चळवळ ऐतिहासिक टप्प्यात असताना, शिरूर तालुक्यातील तरुणांचा हा सहभाग चळवळीला अधिक बळ देणारा ठरला आहे

- मुकबधीर 12 वर्षीय मुलाचा पाण्याचा खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू.

- नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेडयावरील राहणाऱ्या मुकबधीर 12 वर्षीय मुलाचा पाण्याचा खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू.

- विराट राणा अस 12 वर्षीय मूकबधिर मुलांचं नाव आहे.

- काटोल नगरपरिषदेच्या कचरा डम्पिंग साइटवर जेसीबीद्वारे मोठे खड्डे खोदले असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

- विराट हा सकाळी खेळत असताना या खड्ड्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. विराटची आई माधुरी राणा पवार यांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे.

शेतातील वादावरून कार चालकाने दुचाकीस धडक, नंतर हल्ला

- नागपूर जिल्ह्याच्या पारशवीनीतील शेतातील वादावरून कार चालकाने दुचाकीस धडक देत नंतर तलवारीने केला जीवघेणा हल्ला

- यात दुचकीचालक जखमी झाली असून ही घटना पारशीवनीच्या ग्रामीण रुग्णालय जवळ घडलीय...

- लालू आसाराम एकनाथ (४६) असे जखमीचे नाव आहे, तर लालू राणु भोयर (३५) अस आरोपीच नाव आहेय.

- लालू एकनाथ आणि लालू भोयर यांचे शेतातील पाणी अडवण्यावरून एक महिन्यापूर्वी भांडण झाले होत.

- मंगळवारी लालू एकनाथ हा आपल्या दुचाकी जातांना पारशिवनी ते सावनेर मार्गाने आपल्या घरी जात होता.

- यातच अचानक लालू भोयर ह्याने आपली कारने मागून दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार लालू एकनाथ खाली पडला. त्यानंतर लालू भोयरने गाडीतील तलवारीने लालुवर एकनाथवर सपासप वार केले.

- यात लालू एकनाथ गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी पोहचले

स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण.

स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.नांदेडच्या नायगाव येथे हा पुतळा अनावरण सोहळा पार पडला. छत्रपती शाहू महाराज आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण,आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजीत कदम, माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

श्री तुळजाभवानी मंदीरात पहील्या महीन्यात 38 हजार लाडूंची विक्री

तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील लाडु प्रसादाला भाविकांकडून प्रतिसाद मिळत आहे.श्रावण महीन्यात भाविकांनी तब्बल 38 हजार लाडु प्रसाद खरेदी केले आहेत. लाडुप्रसाद विक्रीतून कंञाटदाराला 11 लाख 46 हजार रुपये मिळाले आहे तर प्रत्येक लाडु मागे संस्थानला केवळ दिड रुपया मिळणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून रखडरेल्या लाडु प्रसाद सेवेला मागील महील्यात 25 जुलै ला पुन्हा सुरूवात झाली आहे.मंदीरात तीन ठिकाणी या लाडु विक्रीचे काउंटर सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com