Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : उत्सव मंडपात दगडूशेठ गणपती बाप्पा दाखल

Ganesh Chaturthi 2025 Festival LIVE Updates in Marathi : आनंद, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात आज आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. विघ्नहर्ता व सुखकर्ता गणरायाच्या आगमनामुळे राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. सर्वांची दुःखे, संकटे दूर व्हावीत व आपल्या जीवनात समृध्दी नांदावी हीच गणयाराच्या चरणी प्रार्थना. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात लाईव्ह अपडेट जाणून घेऊयात...
Ganesh Chaturthi 2025, Ganpati arrival, Ganeshotsav celebrations, Mumbai Ganpati, Pune Ganpati
GANESH CHATURTHI 2025 SHUBH MUHURAT | GANPATI ARRIVAL CELEBRATIONS MUMBAI PUNESaam TV Marathi News

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा

दगडूशेठ गणपती बाप्पा उत्सव मंडपात विराजमान

महिलांनी बाप्पाचे औक्षण करून स्वागत केल्यानंतर बाप्पा झाले विराजमान

केरळच्या पद्मनाभ मंदिराच्या प्रतिकृती मध्ये बाप्पा विराजमान

घनश्यामचार्य महाराज करणार प्राणप्रतिष्ठा

काही वेळातच सोहळा संपन्न होताच भाविकांसाठी दर्शन खुलं केलं जाणार

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : शेतकरी कर्जमाफी करण्याची गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी; जनशक्ती शेतकरी संघटनेची मागणी

कर्जाला कंटाळून राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. माय बाप सरकाराला शेतकर्यांची कर्ज माफी जाहिर करण्याची विघ्नहर्त्याने सुबुद्धी द्यावी अशी मागणी करणारे फलक जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी शेतात बॅनर लावून करण्यात आली आहे.

करमाळा येथे लावण्यात आलेल्या शेतकरी कर्ज माफी बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

सरकारने निवडणूकी पूर्वी शेतकरी कर्ज माफीचे आश्वासन दिले होते. एक वर्षा नंतर कर्ज माफी झाली नाही. सरकारने शेतकर्यांची घोर फसवणूक केली आहे.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : उत्सव मंडपात दगडूशेठ गणपती बाप्पा दाखल

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा सुरू

बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उसळला जनसागर

मंडळाकडून यंदा केरळचे पद्मनाभ मंदिर साकारण्यात आले आहे

प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यावर तात्काळ भाविकांसाठी दर्शन खुले केलं जाणार

Pune Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates :

पुण्यासह देशात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरवात करणारे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातील पाचवा मानाचा समजला जाणारा केसरी वाड़ा गणपतीची मिरवणुक आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास काढण्यात आली. या मिरवणुकीत लोकमान्य टिळक याचे वंशज रोहित टिळक आपल्या कुटुंबिया सोबत सहभागी झाले आहेत, अतिशय अतिशय पारंपरिक पद्धतीने ढोल - ताशाच्या गजरात ही मिरवणुक काढण्यात आली आहे. टिळक पंचाग प्रमाणे शास्त्रीय पद्धतीने केसरी वाड़ा गणपतीच्या मूर्तिची स्थापना केसरी हिंद वाडा येथे केली जाणार आहे.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : गणेशमुर्ती शाळेत भाविकांची लगबग

कोकणचं वातावरण बाप्पामय झालंय. रत्नागिरी जिल्ह्यात आज १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती तर ११६ सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दरम्यान मूर्तिशाळांमध्ये लाडक्या बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी भाविकांची लगबग दिसून येतेय.. गणेशचित्र शाळेत आलेल्या गणेशभक्तांकडून बाप्पाला उत्सव निर्विघ्न करण्याचे साकडं घातलं जातंय.. बाप्पाला घरी नेताना गणेशमुर्तीशाळेत पानाचा विडा, सुपारी, नारळ आणि दक्षिणा ठेवून गणपती बाप्पाचा जयघोष करुन आपल्या लाडका बाप्पाला भाविक घरी घेवून जाताहेत

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : चंद्रपुरात गणेशोत्सवाचा उत्साह

बाप्पाचे आगमन आज होत आहे, त्याचा उत्साह चंद्रपुरातही ओसंडून वाहत आहे. घरगुती मूर्तींची स्थापना करण्यासाठी भाविक आता मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत. गणेश मूर्तींची दुकाने सजली आहेत. गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कुटुंबावरील अरिष्ट दूर कर, सर्वांना निर्विघ्न ठेव, अशा भावनांसह बाप्पा आज स्थापित केला जात आहे.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates :  शेकडो विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहत गणपती बाप्पा साकारले 

राज्यभरात गणेशोत्वाची धामधूम सुरू झाली आहे, गणरायाच्या आगमनाची घराघरांमध्ये तयारी सुरू आहे तर तिकडे हिंगोली मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी अनोखे बाप्पा साकारले आहेत, हिंगोली शहरातील एबीएम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाप्पाचा जिवंत देखावा साकारला आहे, शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत रांगेत उभे राहून गणरायाची प्रतिमा साकारली होती

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : अकोला जिल्ह्यातील 356 ठिकाणी 'एक गाव एक गणपती'चा समावेश

वर्षभर ज्याच्या आगमनाची उत्सुकता अर्थातच आतुरता असते, तो क्षण आलाय. आज ठिकठिकाणी बाप्पाचे गणेशभक्तांकडून स्वागत होऊ लागले आहे. अकोल्यात देखील घरोघरी बाप्पांचे आज आगमन होणारेये.. अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर भरलेल्या गणेश मार्केटमध्ये बाप्पांची मूर्ती खरेदी करण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली आहे. अकोल्यात 1 लाख घरात आणि 1750 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पा विराजमान होणारेये. अन विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील 356 ठिकाणी 'एक गाव एक गणपती'चा समावेश आहे

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates :  सिद्धार्थ जाधव ढोल वाजवताना भक्तिरसात तल्लीन

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या आगमन मिरवणूक सोहळ्याला कलावंत ढोल पथकाकडून वादन

कलावंत ढोल पथकात अनेक अनेक मराठी अभिनेते आणि अभिनेत्री

अभिनेता सिद्धार्थ जाधव ढोल वाजवताना भक्तिरसात तल्लीन

सिद्धार्थ जाधवने ढोल वाजवत केलं बाप्पाचं स्वागत

nashik-yeola-स्वामी मुक्तानंद विद्यालयाची गणेश मिरवणूक

नाशिक येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालय तर्फे यंदाही विद्यालयात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे,दरवर्षी प्रमाणे सकाळी गणेशाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे,विद्यार्थ्यांचे झांज पथक,लाठी काठी,लेझीम पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले,शहरातील विविध भागातून मिरवणूक जल्लोषात निघून विद्यालयात श्रींची स्थापना करण्यात आली

Ganesh Chaturthi 2025 Festival LIVE Updates 

पुण्यातील ढोल पथकाकडून संबळ वादन

संबळ आणि शंखनादाने गणेशभक्त उत्साहात

ढोल ताशा पथकाकडून संबळ वादनाचा निनाद

पुण्यात आज सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन मिरवणूक सोहळा

Ganesh Chaturthi 2025 Festival LIVE Updates  नागपुरातील मानाचा संती गणपतीची स्थापना पूजन सुरू

गेल्या 68 वर्षापासून या मंडळात गणरायाची स्थापना विधिवत पूजा करून करण्यात येतेय....

यंदा जगन्नाथ पुरी मंदिरची प्रतिकृती संती गणेशोत्सव मंडळांन साकारली आहे..

या मंडळाकडून दरवर्षी देशातील विविध ठिकाणावरचे मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते...

यापूर्वी शेगावच गजानन महाराज मंदिर, शिर्डी साईबाबांचा मंदिर यांचबरोबर पंढरपूर, कोल्हापूर,तिरुपती अक्कलकोट, त्रंबकेश्वर आणि जेजुरी या येथील मंदिरांची प्रतिकृती साकारली होती...

हजारो गणेश भक्त पुढील दहा दिवस या मंडळात बाप्पाच्या दर्शनासाठी रीघ लावणार आहे. या मंडळामध्ये आता गणरायाची विधिवत स्थापना करण्यात येत आहेय..

बाप्पाचं साजेसं रुप, सोन्यानं सजला दगडूशेठचा गणराया | Dagdusheth Ganpati

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : सिंधुदुर्गात 75000 घरगुती तर 32 सार्वजनिक ठिकाणी होणार गणपती विराजमान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर भक्ताचा उत्साह शिगेला पोचला आहे. कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी सुमारे 75 हजार घरांमध्ये घरगुती गणपतीचे तर 32 ठिकाणी सार्वजनिक गणपतीचे पूजन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल आहे. बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी तसेच सार्वजनिक गणपतीच्या ठीकाणी होणारी गर्दीच्या अनुषंगाने पोलीसांकडून विषेश खबरदारी यावेळी घेण्यात आली आहे.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूतून श्रींची मिरवणूक सकाळी 9 वाजता निघणार आहे.

दरवर्षीप्रमाणे श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान होणार आहे.

रास्ता पेठ पॉवर हाउस, अपोलो थिएटर चौक, दारूवाला पूल, देवाजी बाबा चौक, फडके हौदमार्गे उत्सव मंडपात आगमन होणार.

या मिरवणुकीत संघर्ष ढोल ताशा पथक, श्रीराम ढोल ताशा पथक, अभेद्य ढोल ताशा पथक सहभागी होणार असून, मूर्तीची प्रतिष्ठापना सवितानंद महाराज यांच्या हस्ते ११ वाजून ३७ मिनिटांनी करण्यात येणार आहे.

मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती

Ganesh Chaturthi 2025 Festival LIVE Updates : कोकणात गणेशोत्सवाला सुरवात,  संगमेश्वरमध्ये बाप्पाचा चक्क होडीतून प्रवास

संगमेश्वर तालुक्यातील भातगाव खाडीतून चक्क होडीतून आणले जातात गणराय

खाडीच्या विशाल पात्रामधून आणले जातात गणपती

भातगाव आणि करजुवे गावाला जोडणारी हि खाडी

ढोल ताशांच्या गजरात गणराय चक्क होडीतून होतं गणरायचं आगमन

त्यावेळी दणळवळणाची साधने नव्हती त्यामुळे गणपती कसे घरी आणले जायचे हे पुढच्या पिढीला कळण्यासाठी परंपरा कायम

आजही काही ठिकाणी नदीवर पूल नसल्याने गणपती घरी आणण्यासाठी होडीचा पर्याय असतो

Ganesh Chaturthi 2025 Festival LIVE Updates गणेश चतुर्थीच्या दिवशीच भामरागडात पुराचे संकट: शंभर गावांचा संपर्क तुटला

भामरागड तालुक्यातील पामुलगौतम नदीपलीकडील हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसुतीच्या वेदना झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र परलकोटासह पामुलगौतम नदी देखील तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे झाले होते. आज 27 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता च्या सुमारास एसडीआरएफ टीमच्या मदतीने बोटीद्वारे पामुल गौतम नदीतून रेस्क्यू करत त्या गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सौ अर्चना विकास तिम्मा असे त्या गर्भवती महिलेचे नाव असून सध्या तिला भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात प्रसुती करिता दाखल करण्यात आले आहे.

Ganesh Chaturthi 2025 Festival LIVE Updates मलकापूरला मानवी साखळीद्वारे गणराया

कराड तालुक्यातील मलकापूरच्या मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या 501 विद्यार्थ्यांनी मानवी साखळी द्वारे श्री गणेशाची सुंदर प्रतीकृती तयार केली. या प्रतिकृतीत आनंदराव चव्हाण विद्यालयाच्या मुले आणि मुलींनी सहभाग घेतला.

nashik-manmad-बाप्पाच्या आगमनासाठी मनमाडकर सज्ज,यंदा अनेक मंडळांच्या ५० फुट उंचीच्या गणेशमूर्ती चे आगमन

ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पहात होते त्या गणरायाचे काल रात्री पासूनच आगमन झाले असून वाजत गाजत जल्लोष करत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाचे जोरदार स्वागत केले.यंदा अनेक ठिकठिकाणच्या मंडळांनी ५० फुट उंचीच्या गणेश मुर्ती बाहेरगावाहून मागविल्या आहेत.आगमना नंतर त्यांची आज प्रतीष्ठापणा करण्यात येणार असून,आगमना प्रसंगी मोठ्या संख्येने मंडाळाचे महिला पुरुष जल्लोष करतांना पहावयास मिळाले.

pune Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात

दगडूशेठ गणपती उत्सव मंडपाच्या मार्गस्थ होण्यासाठीची तयारी पूर्ण

मोरया मोरयाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमला

आकर्षक फुलांच्या रथातून दगडूशेठ गणपती ची मिरवणूक

मंडळाकडून यंदा केरळच्या पद्नाभ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे

मुख्य मंदिरातून उत्सव मंडपात मूर्ती विराजमान होणार

मूर्ती उत्सव मंडपात विराजमान झाल्यावर केली जाणार प्राणप्रतिष्ठा

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : भंडाऱ्यात वाजत गाजत गणरायाच आगमन

भंडारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. पारंपारीक वाद्य आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला आणताना दिसत आहेत. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस असून आज विधीवत पुजनाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला काल संध्याकाळ पासून सुरुवात झाली असून आज दुपार पर्यंत आगमन सोहळा पार पडणार आहे.

Q

गणेश चतुर्थी २०२५ मध्ये स्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे?

A

बुधवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०५ ते दुपारी ०१:४० वाजेपर्यंत बाप्पा स्थापनेसाठी शुभ वेळ आहे.

Raigad Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates :  रायगडमध्ये 286 सार्वजनिक तर 1 लाख 2 हजार 198 खाजगी गणपती मुर्तींची होणार स्थापना

कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवाला आज पासून प्रारंभ होत आहे. रायगडमध्ये दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक तर कालपासूनच खाजगी गणपतींची आगमन घरोघरी होत आहे. पोलिस दलाच्या माहिती नुसार रायगडमध्ये साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात 286 सार्वजनिक आणि 1 लाख 2 हजार 198 खाजगी गणपती मुर्तींची तर 16 हजार 175 गौरींची देखील स्थापना होणार आहे. दिड दिवसांपासून पुढे टप्प्या टप्प्याने 21 दिवसांपर्यंत पारंपारीक रितीरिवाजाप्रमाणे विसर्जन सोहळे पार पडणार आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Nanded Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates :  महानगरपालिकेच्या शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरण पूरक गणेश मुर्त्या

गणरायाचे आगमन घरोघरी होणार आहे. बाप्पा दहा दिवस विराजमान असणार आहेत. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान नांदेड शहरातील वजीराबाद येथील महानगरपालिकेच्या शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेश मुर्त्या बनविल्या आहेत. दरवर्षी या शाळेत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्यासंदर्भात कार्यशाळा घेतली जाते. यावर्षी देखील वजीराबाद येथील महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी माती पासून सुंदर अशा गणेश मुर्त्या तयार केल्या. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : यवतमाळ जिल्ह्यात 14 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश

यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत.यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये सर्व सण, उत्सव शांततेत साजरे व्हावे यासाठी येत्या 10 सप्टेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यात आज पासून वेगवेगळ्या उत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव 5 सप्टेंबर रोजी ईद-ए मिलाद हे उत्सव साजरे करण्यात येणार आहे या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे यासाठी 10 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे.

Amrawati Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : अमरावती जिल्ह्यात 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे; 384 ठिकाणी ‘एक गाव-एक गणपती’

अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी झाली असून यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नोंदणीकृत झाली आहेत. त्यापैकी 384 ठिकाणी ‘एक गाव-एक गणपती’ ही अभिनव संकल्पना राबवली जाणार आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात ‘एक गाव-एक गणपती’ या उपक्रमाने वेग घेतला होता. 2024 मध्ये 347 गावांनी हा प्रयोग यशस्वी केला होता. या संकल्पनेमुळे गावांतील वैमनस्य, राजकीय भेद मिटवून सामाजिक ऐक्याचा संदेश मिळाला. तसेच अनावश्यक स्पर्धा, पैशांचा दुरुपयोग आणि ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळाले. त्यामुळे यंदा या संकल्पनेचा अधिकाधिक विस्तार होईल, अशी अपेक्षा प्रशासन व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Raigad Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : रायगडमध्ये वाजत गाजत घरोघरी गणरायाच आगमन

रायगडमध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. पारंपारीक वाद्य आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणताना दिसत आहेत. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस असून आज विधीवत पुजनाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणपती बाप्पाच्या घरोघरी आगमनाला काल संध्याकाळ पासून सुरुवात झाली असून आज दुपार पर्यंत आगमन सोहळा पार पडणार आहे.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : कळंब येथील श्रीचिंतामणी मंदिरात दर बारा वर्षांनी अवतरते गंगा

कापसाचा शोध कळंब येथूनच लागल्याचे जाणकारांचे मत

विदर्भाचे अष्टविनायक श्रीचिंतामणी,भगवान इंद्राने चिंतामणीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे गणेशपुराणात दाखले

चिंतामणीचे मंदिर एका सरोवरात स्थापना करण्यात आले असून जमिनीपासून तीस फूट खोल आहे मंदिर

हेमाडपंथीच्या काळातील मंदिर असून तीनही बाजूनी प्रवेशद्वार,प्रमुख प्रवेशद्वारावर चौमुखी गणेशमूर्ती

एकाच दगडात गणेश मूर्ती कोरलेली असून मूर्तीचे हात एकमेकांत मिळालेले आहेत संपूर्ण भारतात येथील एकमेव गणेशमूर्ती दक्षिणाभिमुख आहे असे जाणकार सांगतात

कळंबच्या मंदिराचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दर बारा वर्षांनी गंगा अवतरते या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे देवाचा राजा इंद्राने गौतम ऋषीच्या पत्नीसोबत व्यभिचार केला त्यामुळे ऋषींनी त्याला शाप दिला भयभीत होऊन इंद्र कमळाच्या देतात लपून बसला हे कळतात सर्व देव गौतमा जवळ येऊन पार्थना करू लागले व इंद्राला क्षमा करण्याची मागणी केली

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : वाजत गाजत लाडक्या बाप्पाचं आगमन, भक्तांचा उत्साह शिगेला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती गणपतींच्या पूजनास आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. विधीवत पूजा करत आजपासून तब्बल अकरा ते एकवीस दिवसांसाठी घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. आज पहाटेपासूनच बाप्पचे आगमन सुरू झाले आहे. घरोघरी गणपती वाजत गाजत आणले जात आहेत. यानंतर पुरोहितांकडून गणपतीची विधीवत पुजा करण्यात येत आहे. कोकणात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गणेशभक्तामध्ये मोठ्याउत्साहाचे आणी आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com