horoscope  Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : वाटे वाटेवर अडचणीचा अनुभव यईल; ५ राशींच्या लोकांची देव परीक्षा घेणार, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Wednesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना अडचणीचा अनुभव येईल. तर काहींना आजचा दिवस जड जाण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

बुधवार,३ सप्टेंबर २०२५,भाद्रपद शुक्लपक्ष,

परिवर्तिनी एकादशी.

तिथी- एकादशी २८|२२

रास-धनु २९|२१ नं. मकर

नक्षत्र-पूर्वाषाढा

योग-आयुष्मान

करण-वणिज

दिनविशेष-१६ प.चांगल

मेष - आज परिवर्तनी एकादशी आहे. विष्णू उपासना आपल्याला उत्तम ठरेल. मोठे प्रवास होतील. नियोजित कामे मार्गी लागतील. दिवस चांगला आहे.

वृषभ - आपल्या राशीला विशेष पैशाचे आकर्षण आहे. पण चुकीच्या मार्गाने मिळालेला पैसा आज नको. विनाकारण अडचणीत अडकण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.

मिथुन - व्यवसायामध्ये नवनवीन कल्पना येतील. त्या सत्यात उतरवण्यासाठी विशेष मेहनतही घ्याल. जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. कोर्टाच्या कामात सुद्धा यश मिळेल. दिवस संमिश्र आहे.

कर्क - खराब पाणी पिण्यापासून स्वतःला जपा. काही आजार त्यापासून होण्याची शक्यता आहे. मनाची अवस्था थोडी उद्विग्न राहील. नाती जपणे हे नुसतेच सोपस्कार ठरतील.

सिंह - शेअर्समधील गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे. संततीच्या कडून काही चांगल्या बातम्या कानी येतील. दिवस आनंदाकडे झुकलेला असेल. उपासनेच्या मार्गातून मनोकामना पूर्ण होतील.

कन्या - व्यापार, व्यवसायामध्ये हिशोब नीट ठेवून कामे करावी लागतील. घरातील एखाद्या व्यक्तीची मदत आज होऊ शकेल. जनावरांपासून फायदा संभवतो आहे.

तूळ - "भाग्याला पराक्रमाची साथ" असा दिवस आहे. एक नवीन ऊर्जा आणि उमेद घेऊन आज कामे कराल. सर्वच बाबतीत सचोटीने व्यवहार राहतील. शेजारी सहकार्य मिळेल.

वृश्चिक- ज्येष्ठ व्यक्तींकडून मोलाची साथ आणि सल्ला मिळेल. धन आवक चांगली राहील. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. अनेक कामे करण्याची आणि ती पेलवण्याची ताकद आज तुमच्या राशीत आहे.

धनु - स्वतःमध्ये दंग रहाल. आरोग्य उत्तम राहील. आपली माणसे आणि आपले मन जपण्यासाठी आज वेगळीच खटपट कराल. आपला सकारात्मक प्रभाव इतरांवर पडेल. दिवस आनंदी आहे.

मकर - दिवसभरामध्ये वाटे वाटेवर अडचणी पेरल्या आहेत का असा काही अनुभव येईल. ठरवूनही सहज यश आज मिळणार नाही. जशा गोष्टी होतील तशा स्विकारण्या शिवाय आपल्याकडे विशेष काही राहणार नाही.

कुंभ - मैत्री दुगोचर होईल. स्नेहभाव वाढतील. धना योगाला दिवस चांगला आहे. जुन्या गुंतवणुकी मधून लाभ मिळतील. एखाद्या संशोधनात्मक कार्य आपल्या हातून घडेल. ज्याचा व्यवसायात फायदा होईल.

मीन - कर्म प्रधानाचा ठेवून आज वागावे लागेल. दान दानत चांगली राहिल. सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. प्रसिद्धी नको असली तरी सुद्धा आज वेगळ्या पद्धतीने माणसांना प्रसिध्दी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Big Boss 19: बिग बॉसच्या घरात पुन्हा नवा ड्रामा,अभिषेक बजाज आणि अमाल मलिक यांच्यात पेटला वाद, Promo आला समोर

Bhiwandi Crime : भक्षकच! चिमुरडीचे शोषण केल्यानंतर अटक, २ महिन्यांपूर्वी कोर्टातून पळाला अन् पुन्हा अत्याचार करुन लहान मुलीला संपवलं

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, अतिवृष्टीमुळे झाले मोठं नुकसान

Cyber Safety: ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी 'या' मसाल्याचं पाणी करेल तुमची मदत

SCROLL FOR NEXT