Horoscope Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : श्रीगणेशाची उपासना वैचारिक परिवर्तन घडवणार; ५ राशींच्या लोकांचा आजचा दिवस जाणार शुभ

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ जाणार आहे. तर काहींसाठी वैचारिक परिवर्तन घडवणारा असणार आहे.

Vishal Gangurde

आजचे पंचांग

मंगळवार,१ जुलै २०२५,आषाढ शुक्लपक्ष.

तिथी- षष्ठी १०|२१

रास- सिंह १५|२४ नं कन्या

नक्षत्र- पूर्वा

योग- व्यतिपात

करण-तैतिल

दिनविशेष- १७ नं. चांगला

मेष - बौद्धिक क्षेत्रात प्रगती राहील. गणेशाची विशेष उपासना आज आपले वैचारिक परिवर्तन घडवेल. धनयोग, शेअर्स आणि लॉटरी याच्यामध्ये विशेष लाभ होण्याचा दिवस आहे.

वृषभ - प्रॉपर्टीशी निगडीत सौख्य लाभेल. व्यवहार सुकर पार पडतील. प्रवासाचे योग सुद्धा आहेत. स्वतःच्या आनंदासाठी अनेक गोष्टी कराल. कुटुंबीयांनासुद्धा यामुळे समाधान वाटेल.

मिथुन - बोलून समोरच्याला आपलेसे करणारी आपली रास अशी खासियत आहे. आज मात्र एखादी महत्त्वाची जबाबदारी शिरावर येईल, मात्र हाती घेतलेल्या कामास सुयश मिळण्याचा दिवस आहे.

कर्क - कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधण्याचा आजचा दिवस आहे. पाहुण्यांची रेलचेल राहील. जीवनात कशाची तूट नाही अशी भावना येईल. दिवस आनंदी आहे.

सिंह - रवी प्रधान असणारी आपली रास. आज आरोग्याच्या तक्रारीही राहणार नाहीत. कलाक्षेत्रामध्ये, राजकारण, समाजक्षेत्रात विशेष प्रगती घेऊन आलेला आजचा दिवस आहे.

कन्या - पैसा आणि तुमची रास याची एक वेगळीच सांगड आहे. आज मात्र मिळवण्यापेक्षा खर्च करण्याकडे कल वाढेल. काही लोकांचा ओढा अध्यात्माकडे विशेष राहील.

तूळ -सातत्याने कार्यरत राहणे ही आपली खासियत आहे. आज काही महत्त्वाचे निर्णय मार्गी लागणार आहेत. जवळच्या लोकांच्या सहवासामुळे दिवस भारलेला असेल.

वृश्चिक - ठरवाल ते करालच अशी आपली रास आहे. काही निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणार आहेत. एकूणच असणारी दैनंदिन कामे सहज मार्गी लागतील असे दिसते आहे.

धनु - कोणी आपल्याजवळ नसेल तरी भगवंत आहे ही भावना आपल्याला कायमच आहे. धार्मिक कार्यामध्ये आपला विशेष सहभाग राहील. गुरुकृपा लाभेल. दिवस आनंदी आहे.

मकर - ठरवून काही गोष्टी होत नसतात काही गोष्टी स्वतःला पुढाकार घेऊन कराव्या लागतात. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न करता आज कामे करा. विनाकारण अबोलाही नको आणि विनाकारण कोणाशी वादविवाद नको. काळजी घ्या.

कुंभ - मनाला एक वेगळी उभारी येईल. रखडलेली कामे मार्गी लावाल. मन आनंदी आणि आशावादी राहिल्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.

मीन - वेळ आणि पैसा आजकाल खूप महत्त्वाचा आहे. पण काही वेळेला दिवस तशी सकारात्मकता घेऊन येत नाही. आज दोन्हीही वाया जाण्याची शक्यता आहे. मनोबल एकूणच कमी राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT