Horoscope in Marathi saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : प्रेमाला नवे पंख फुटतील, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचं स्वप्न पूर्ण होणार

Tuesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना दुप्पट प्रेम मिळेल. तर काही लोकांचं स्वप्न पूर्ण होईल. वाचा मंगळवारचं राशीभविष्य

Vishal Gangurde

आजचे पंचांग

मंगळवार,८ जुलै २०२५,आषाढ शुक्लपक्ष,

भौमप्रदोष.

तिथी-त्रयोदशी २४|३९

रास- वृश्चिक २७|१५ नं. धनु

नक्षत्र-ज्येष्ठा

योग-शुक्ल

करण-कौलव

दिनविशेष-ज्येष्ठा वर्ज्य

मेष - व्यवहार करताना जपून करणे आज गरजेचे आहे. मृत्युभय दाटेल. विनाकारण नको असलेल्या गोष्टींचा ताकादा आज मागे लागेल. डोके शांत ठेवून कामे करावी लागतील.

वृषभ - जोडीदाराशी कसे वागायला पाहिजे हे खरे तर आपल्याला सांगायला नको. आज प्रेमामध्ये दुपटीने वाढ होईल. एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. मनोरंजनात्मक कलाक्षेत्रात इत्यादी गोष्टींमध्ये दिवस व्यतीत होईल.

मिथुन - मामाचे विशेष प्रेम लाभेल. मनात ठरवलेल्या गोष्टी होताना दिसतील. भले अडचणी आल्या तरी त्यातून योग्य वेळी मार्ग काढणार आहात. दिवस संमिश्र आहे.

कर्क - कला क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती होईल. संततीवर विशेष जीव जडेल. विश्वासाने तेही तुमची कामे करतील. विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांना आजचा दिवस विशेष अभ्यासासाठी प्रगती देणारा आहे. कौतुकास्पद गोष्टी घडतील.

सिंह - घरामध्ये मोठा होऊन पुढील जबाबदारी घ्यावी लागेल. जमिनीचे व्यवहार मनासारखे पार पडतील. सरकारी कामांमध्ये मात्र दिरंगाई जाणवेल. दिवस चांगला आहे.

कन्या - भावंड सौख्यामध्ये भर पडेल. जवळच्या लोकांनी समजून घेतल्यामुळे कामासाठी वेगळा हुरूप येईल. एखादी गोष्ट ठरवली तर तशीच घडण्यासाठी पेटून उठाल.

तूळ - अडचणींचा सामना करत पुढे जावे लागेल. वारसा हक्काच्या संपत्तीमध्ये उगाचच जवळच्या व्यक्तींची ढवळाढवळ होईल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. धनाशी निगडित गोष्टी घडतील.

वृश्चिक - मी आणि माझा असा काहीसा आजचा दिवस आहे. स्वतःच्या आनंदासाठी दिवस खर्च कराल. सकारात्मक भावनेने भारलेला दिवस आहे. यश खेचून आणाल.

धनु - दोलायमान मनस्थिती राहील. काही वेळा निर्णय घेण्यासाठी कचराई होईल. अति धाडस धोक्याचे ठरेल. जसे चालू अशी आज कामे करावीत. दिवस संमिश्र आहे.

मकर - परिचितांकडून लाभ होईल. जुन्या मित्र-मैत्रिणी भेटतील. प्रेमाला नवे पंख फुटतील. नवीन स्वप्न आणि आशा घेऊन आलेला आजचा दिवस आहे.

कुंभ - समाजामध्ये आपली पद आणि प्रतिष्ठा वाढण्याचा दिवस आहे. करिअरच्या बाबतीत केलेल्या कामाचा योग्य मोबदला आज मिळेल. आपल्या बॉस कडून कौतुक झाल्यामुळे कॉलर ताठ होईल.

मीन - दत्तगुरूंची उपासना करावी. आलेल्या गोष्टीतून चांगल्या असो अथवा वाईट मार्गक्रमण करण्यासाठी त्याची साथ लाभेल. पौत्रसौख्यासाठी दिवस चांगला आहे. सुवर्ता कानी येतील. मोठे प्रवास घडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

eSakal नंबर-१, वाचकांचा भरभरून प्रतिसाद!

Maharashtra Live News Update : समृद्धीच्या इंटरचेंजवर 65 लाखांचा गुटखा पकडला

Kolhapur: रात्री भररस्त्यात गाठलं, तिघांनी तरुणावर सपासप वार करत संपवलं; कोल्हापूर हादरले

Sreeleela: किसिक गर्ल श्रीलीलाचा नवा एलिगन्ट लूक पाहिलात का?

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधानचं घर नेमकं आहे तरी कुठं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT