Maharashtra Live News Update : मीरा भाईंदरमधील मराठी भाषिकांचा मोर्चाला परवानगी नाकारल्याचे पडसाद कोकणात

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ०८ जून २०२५, मीरा भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

बोगस बियाण्यांच्या विरोधात , छावा संघटना आक्रमक

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. दरम्यान वारंवार तक्रार देऊनही बोगस बियाणे वितरण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत,छावा संघटनेचे कार्यकर्ते प्रमुख झाले आहेत.. लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत, अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे...

Mira Bhayandar: मीरा भाईंदर मधील मराठी भाषिकांचा मोर्चाला परवानगी नाकारल्याचे पडसाद कोकणात

मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडून निषेध व्यक्त

काळ्याफिती घालून मनसे नेते अविनाश जाधव यांच्या अटकेचा निषेध

खेडच्या शिवाजी चौकात व्यक्त केला जातोय निषेध

काळ्याफिती लावून केले जाते आंदोलन

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून भर पावसात अतिक्रमण कारवाई सुरू 

आज जळगाव महामार्गावरील हर्सूल टी पॉइंट ते सिडकोपर्यंत होणार कारवाई

16 जेसीबी, 4 पोकलेन, 15 टिप्परसह पोलीस दंगा काबू पथक यांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमण कारवाई सुरू

मागील पंधरा दिवसापासून शहरात महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधात धडक मोहीम

अनेक वर्षानंतर जळगाव महामार्ग घेणार मोकळा श्वास

Pandharpur: पंढरपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

एंकर - महाराष्ट्रातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढीच्या दिवशी करण्यात आले.

सावरकर चौकातील 20 गुठे जागेत हे भवन उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. धनगर समाजातील मुला मुलींसाठी अभ्यासिक व वस्तीगृहाची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमासाठी अद्यावत सभागृह तयार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार गोपीचंद पडळकर,धनगर समाजाचे नेते माऊली हळणवर आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

आषाढीच्या पर्वकाळात आज पंढरपूरमध्ये अनोखी भाऊबीज संपन्न झाली. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांकडून संत मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट देण्यात आला. ज्ञानेश्वर महाराजांकडून देण्यात आलेली साडी संत मुक्ताई यांना दिवाळीच्या भाऊबीजेला परिधान केली जाते. माऊली आणि मुक्ताई यांची पंढरपुरातच भेट होत असते. त्यामुळे वारीच्या पर्वकाळातच भाऊबीज संपन्न होते. शेकडो वर्षापासून बहिण भावाच्या भेटीचा आणि साडी चोळीआहेर देण्याची परंपरा आजही कायम आहे . आळंदी संस्थानच्या वतीने विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी संत मुक्ताई यांची विधिवत पूजा करून त्यांच्या पादुकांवर साडी चोळीचा आहेर भेट दिला. या निमित्ताने संता मधील असणाऱ्या बहीण भावाच्या नात्यातील गोडवा आषाढी वारीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याविरोधात भाजपची आंदोलनाची तयारी...

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेल्या इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे बिले अद्याप न दिल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या थकीत बिलांच्या प्रश्नावर भाजप पक्षाने लक्ष घातले असून लवकरात लवकर जर शेतकऱ्यांचे उसाचे बिले नाही दिले तर भाजप ने या संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे..

पुणे जिल्हा भाजप अध्यक्षांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकऱ्यांचे बिले तात्काळ दिली नाहीत, तर आम्ही तीव्र आंदोलन करू..” यामुळे आता इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

तीन दिवसांपासून गायब असलेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा अखेर लागला शोध..

सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या पाडळी येथून बेपत्ता झालेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा अखेर तीन दिवसानंतर शोध लागला आहे. शंभूराजे शशिकांत पाटील असे या बालकाचे नाव असून तो आपल्या वडिलांसोबत दोन दिवसांपूर्वी शेतामध्ये गेला होता.मात्र त्या ठिकाणाहून तो बेपत्ता झाला दरम्यान शशीकांत पाटील यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार तासगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली होती.यानंतर सलग दोन दिवस शंभूराज याचा पोलीस,पाडळी ग्रामस्थ, रेस्क्यू टीम आणि शंभूराजच्या नातेवाईकांकडुन शोध घेण्यात येत होता.शंभुराज याचे अपहरण झाले की अन्य काही घटना घडली आहे,याबाबत तर्कवितर्क सुरू होते.मात्र दिवसानंतर तो ज्या ठिकाणाहून तो गायब झाला होता,तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या म्हसोबा देवाच्या मंदिरामध्ये तो खेळत असताना सुखरूप आढळला आहे,त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.

महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता द्या; कोल्हापुरात इंडिया आघाडीचा लक्षवेधी आंदोलन

एकीकडे राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता द्या या मागणीसाठी कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नर्सरी बागेतील समाधीस्थळी इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. तर यावेळी विधानसभेला विरोधी पक्षनेता द्या... या आशयाचे कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले फलक हे लक्षवेधी होते...

मालवण समुद्रात मासेमारी नौका बुडाली एक मच्छीमार बेपत्ता

मालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका बुडाली आहे. नौकेतील दोघेजण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता झाला आहे. वारा आणि लाटांच्या माऱ्यात ही नौका पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेले होते. यातील एक जण बेपत्ता आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. अपघातातील मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. मेढा जोशीवाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी , सचिन सुभाष केळुसकर , जितेश विजय वाघ हे तीन मच्छीमार होते. यापैकी जितेश वाघ हा बेपत्ता आहे. मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली.

नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू

शहरात काल झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर ९ जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा..

सततधार सुरू पावसामुळे 69 मिमी पावसाची नोंद झाली...

पावसाची तीव्रता लक्षात घेऊन महापालिकेचे पथक तैनात, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहे..

 बुलढाण्यातील रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषणाचा सहावा दिवस

बुलढाणा जिल्ह्याच्या धोत्रा भनगोजी येथील आठ शेतकरी मागील सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतरस्त्या साठी आमरण उपोषणाला बसलेले असून या शेतकऱ्यांचे उपोषण प्रशासनाकडून अद्याप दुर्लक्षित आहे. . शेताला रस्ता नसल्याने आणि तहसीलदार यांनी दिलेला रस्ता शेजारील शेतकऱ्याने अडवल्याने उपोषणकर्ता शेतकऱ्यांची जवळपास 50 एकर शेती अद्याप पडीक असून पेरणी करायची बाकी आहे .. वारंवार महसूल प्रशासनाकडे रस्त्याच्या साठी मागणी करून सुद्धा रस्ता खुला करून दिल्या जात नाही .. महसूल मंत्री फक्त रस्त्याच्या साठी कायदा केल्याचे सांगतात

पावसामुळे सोमवारी दिवसभरात नागपूर शहरात विविध ठिकाणी आठ झाडांची पडझड झाली

- जाटतरोडी, तेलंखेडी,कन्नमवार चौक,सिव्हिल लाईन्स,पंचशील चौक आणि गिट्टीखदान परिसरात झाडे पडली

- झाड पडल्याच्या सूचना मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले

- ज्यानंतर पडलेल्या झाडांच्या फांद्या छाटून रस्ता मोकळा करण्यात आला

वाशिम जिल्ह्यातून बच्चू कडूंची दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेची मेंढपाळाच्या वेशात सुरुवात

अँकर: आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बच्चू कडूंनी मेंढपाळाच्या वेशात खांद्यावर घोंगडी घेत हातात काठी घेऊन मेंढपाळाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आज दुसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यातून बच्चू कडूंनी पदयात्रेला सुरुवात केली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी काढलेल्या सातबारा कोरा कोरा पायदळ यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून,बच्चू कडूंची पदयात्रा आज वाशिम जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

आज वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार मुक्काम केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील लोही,तरनोळी गावातून जात मानकी येथे बच्चू कडूंच्या यात्रेचा दुसरा मुक्काम राहणार आहे.

बोईसर आगारातून नाशिककडे जाणाऱ्या बस मध्ये पावसाचे पाणी थेट प्रवाशाच्या अंगावर

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसची दुरावस्था दिवसेंदिवस समोर येत असून यातच पालघर मधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . बोईसर आगारातून नाशिककडे जाणाऱ्या बस मध्ये पावसाचे पाणी थेट आत मध्ये गळत असल्याने प्रवाशाला चक्क बसमध्ये छत्री घेऊन बसावा लागला आहे . बोईसर आगारांमधून निघणारी ही बस नाशिक कडे जात असताना मोखाड्याजवळ अचानक पाऊस बसमधील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याच पाहायला मिळालं.

Nashik: गंगापूर धरणातून सध्या 6336 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरूच

- नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून आत्तापर्यंत जवळपास 20 TMC पाणी जायकवाडीकडे रवाना

- तर सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 7 धरणं 100 टक्के भरली

- नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा देखील 61 टक्क्यांवर

- भावली, भाम, हरणबारी , वालदेवी, आळंदी, भोजपूर, केळझर धरणं 100 टक्के भरली

- धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम, गंगापूर धरणातून आणखी पाणी सोडलं जाण्याची शक्यता

नाशिक जिल्हा परिषदेत महिला सीईओ असतानाही महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उघड

मागील दोन टर्मपासून नाशिक जिल्हा परिषदेवर महिला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना देखील जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचं समोर आलंय. जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ करत असल्याच्या तक्रारी विशाखा समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. एक-दोन नव्हे तर चक्क ३० महिलांनी याबाबत विशाखा समितीकडे तक्रार केलीय. हा अधिकारी प्रदीर्घ काळापासून नाशिक जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे. परिणामी त्याच्यावर कुणीही कारवाई करण्यास धजत नाही, अस चित्र आहे. आता पुराव्यासह काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विशाखा समितीकडे याचा तपास देण्यात आलाय.

सोलापुरात 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरातील एका 21 वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.सतीश भाऊसाहेब चौगुले असे मृत तरुणाचे नाव आहे.

सतीशने अज्ञात कारणास्तव हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सतीशने आत्महत्या का केली,याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

उष्णतेमुळे हिमलिंग वेळेपूर्वीच लुप्त होण्याचा धोका

अमरनाथ गुहे मध्ये स्वयंभू असलेलं महादेवाचे बर्फाचे शिवलिंग लवकर लुप्त होण्याचा धोका निर्माण झालाय. यंदा अमरनाथ यात्रेत भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे नव्हे तर प्रचंड उष्णतेमुळे हिमलिंगाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. कारण यावेळी उष्णतेमुळे हिमलिंग वेळेपूर्वीच गायब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यंदा 22 फुटांचे शिवलिंग तयार झालं होतं मात्र उष्णतेमुळे एक चतुर्थांश राहिले आहे. दोन महिन्यांपूर्वी हिमलिंगाची उंची 20 ते 22 फूट होती मात्र आता ती चार ते पाच फुटांवर आली आहे. यंदा कश्मीर मध्ये पाऊस झालेला नाही तसेच तिथे तापमान सुद्धा 35 डिग्री अंशाच्या वर पाहायला मिळतं. यामुळेच उष्णतेच्या प्रभावामुळे हिमलिंग वेळेपूर्वीच लुप्त होण्याचा धोका निर्माण झालाय.

महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी  सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

वसई विरार मधील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पहाटे तीन वाजता पोलिसांनी घरातून उचलले. मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार मधील पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे.

पालघर लोकसभा अध्यक्ष जयंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल पाटील, वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना वसई, विरार, नालासोपारा पोलिसांनी घरातून उचलून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे..

महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू असल्याच्या भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत

वैभववाडी खांबाळे येथे रिक्षा झाडावर आदळली. सहा जण गंभीर जखमी, पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश

वैभववाडी खांबाळे येथे रिक्षा झाडाला आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात सोनाळी येथील एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले आहेत. यात पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जोरदार धडकली. यात गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. रिक्षातील सहाजन जखमी झाले असून पाच वर्षांच्या एका लहान मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले आहे.

तुळजाभवानी विकास आराखडा,९ व ११ जुलैला बाधित मालमत्तांचे होणार आर्थीक सर्वेक्षण

तुळजाभवानी मंदीर विकास आराखड्यासाठी संपादित करण्यात येणाऱ्या खासगी मालमत्तांचे ९ व ११ जुलै दरम्यान प्रत्यक्ष जागेवर आर्थीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.यासाठी बाधीत मालमत्तांचे पाच विभाग करण्यात आले असुन पाच पथके स्थापली आहेत.सर्वेक्षणास नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केल आहे.तुळजापुरातील भविष्यातील वाढती भाविक संख्या विचारात घेत तुळजाभवानी मंदीर विकास आराखडा तयार केला आहे.यामध्ये घाटशिळ रोड वाहनतळ,हाडको मैदान,आराधवाडी येथे भाविक सुवीधा केंद्र,रामदरा तलावात बोटींग,१०८ फुटी उंच शिल्प व बगीचा आदी कामे प्रस्तावित आहेत.१८६६ कोटींच्या तुळजाभवानी मंदीर विकास आराखड्याला शासनाने मंजुरी दिल्यानंतर विकास आराखड्याच्या अमंलबजावणी गती आली आहे.

चिंब करणाऱ्या पावसाने मराठवाड्यावर मात्र वक्रदृष्टी दाखवली

चिंब करणाऱ्या पावसाने मराठवाड्यावर मात्र वक्रदृष्टी दाखवलीय. जून महिन्यात वार्षिक सरासरी 160 मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ 79 मिलिमीटरम्हणजे 50 टक्केच पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात साधारण 85 टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. लातूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातील काही भाग, नांदेड परभणी आणि हिंगोलीमधील काही तालुके अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सरासरीच्या तुलनेने आजवर 20.9 मि.मी. पाऊस झाला आहे. जुलैच्या सकाळपर्यंत 5.6 मि.मी. पावसाची नोंद जिल्हा झाली आहे. मागील वर्षी 217 मि.मी. पाऊस झाला होता. 123 टक्के ते प्रमाण होते. यावर्षी छत्रपती संभाजीनगर वगळता कुठल्याही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये 46 टक्के जलसाठा आहे. जायकवाडी प्रकल्पात 55 टक्के जलसाठा जुलै महिन्यातच झाला, एवढी एकच समाधानाची बाब सध्या आहे. विष्णुपुरी प्रकल्पात सध्या 23 टक्के जलसाठा आहे.

मारहाणीचा बदला म्हणून कुरुंदवाड मध्ये खून

कुरुंदवाड इथं मारहाणीचा बदला घेण्यासाठी अक्षय चव्हाण या तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणाची कुरुंदवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी काही तासाच्या आतच खून प्रकरणी तिघा संशयीतांना अटक केली आहे. यश काळे, अमन दानवाडे आणि श्रीजय बडसकर अशी तिघा संशयितांची नावे आहेत. खुनामागे अन्य कोणती कारणे आहेत का? याचा पोलीस तपास करत आहेत.

कोल्हापूर - किरकोळ कारणातून खून

किरकोळ कारणावरून शिवीगाळ केल्याबद्दल दगड आणि बॅटने मारहाण करीत 7 जणांनी गांधीनगर इथं एका तरुणाचा खून केला. आशुतोष आवळे असं मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने तपास करत पळून जाण्याचा प्रयत्न असलेल्या सर्व संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना अटक केली असून या गुन्ह्यात तीन अल्पवयींनाही ताब्यात घेतल्याची माहिती गांधीनगर पोलिसांनी दिलेली आहे.

जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात 2 चोरट्यांनी दुकान फोडले; 33 हजारांचा मुद्देमाल केला लंपास

जालना शहरातील भोकरद नाका परिसरातील दोन दुकानात चोरट्यांनी चोरी केली आहे.चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.जालना शहरातील भोकरदन नाका पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या 2 दुकाना चोरट्यांनी फोडल्याचा घटना समोर आल्या.यामध्ये 33 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून दुकानाचे शटर उचकटून हे चोरटे आत शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.दरम्यान या प्रकरणी व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

उजनी धरणातून 10 हजार क्युसेक विसर्ग सोडणार

उजनी धरणात येणार्या विसर्ग वाढला आहे. त्यामुळे धरण सुमारे 88 टक्के भरले आहे. पूर नियंत्रणासाठी आज सकाळी 10 वाजले पासून पुन्हा भिमा नदी पात्रात 10 हजार क्युसेक इतका विसर्ग सोडला जाणार आहे.मध्यंतरी आषाढी यात्रेमुळे भीमा नदी पात्रातील विसर्ग पूर्ण बंद केला‌ होता. दरम्यान पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने धरणात 20 हजाराहून विसर्ग येत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू केला जाणार . नदी काठच्या गावातील नागरिक सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अमरावती शहरात बॉम्ब असल्याची केवळ अफवाच

अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसर मध्ये बॉम्ब आहे, असा फोन अमरावती शहराच्या कंट्रोल रूम पोलिसांना आला त्यामुळे लागलीच बॉम्ब असल्याच्या बातमीने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली,एका अज्ञात इसमाने पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून सरोज टॉकीज परिसरामध्ये बॉम्ब असल्याचा फोन होता,त्यामुळे अमरावती शहर पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली,घटनास्थळी बॉम्ब शोध पथकाने शोध मोहीम सुरू केली मात्र त्या ठिकाणी काहीच आढळून आले नाही.. यावेळी घटनास्थळी एसिपी, सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक व श्वानपथकाने पाहणी कसून पाहणी केली आणी सरोज टॉकीज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, मात्र सर्वत्र शोधाशोध केली या ठिकाणी काही मिळून आलेलं नाही, परंतु या फोनमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती, तर ज्या नंबर वरून फोन आला तो नंबर आता बंद असून त्या इसमाचा शोध अमरावती शहर पोलीस घेत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले

धाराशिव जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्यामुळे गत काही दिवसांपासून संथ वाटचाल करत असलेल्या पावसाला पुन्हा एखदा गती आली आहे.धाराशिव जिल्ह्यात सोमवारी दुपारी पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती परंतु आता जिल्ह्यात दि.8 ते 10 जुलै पर्यंत हलका पाऊस पडेल त्यानंतर 11 ते 16 जुलै पर्यंत खंड राहणार त्यानंतर पुन्हा 18 ते 26 जुलै पर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक सुरज जाधव यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवारांनी केलेल्या गद्दारीची जयंत पाटील यांनी शरद पवारांना करून दिली आठवण

निवडणूकीतील पराभवावर बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवार यांनी केलेल्या गद्दारीची आठवण शरद पवार यांना करून दिली. संघटनेमध्ये लोकांपेक्षा आपल्याच लोकांवर लक्ष ठेवण्याची वेळ आता आली असल्याच सांगताना कार्यकर्त्यांमध्ये एक नासका आंबा आला की तो सर्वांना बघडवतो अस उदाहण देखील जयंत पाटील यांनी या वेळी दिल.

Maharashtra Live News Update : अकरावीच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी १७ जुलैला होणार जाहीर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशातील दुसऱ्या फेरी सोमवारी जाहीर केली आहे

यानुसार, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या प्रवेश फेरीतील प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्जाचा भाग एकमध्ये दुरुस्ती करणे, विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करता येणार आहे

नियमित फेरी एकमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवेश आणि पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे

याच वेळी कोट्याअंतर्गत प्रवेश प्रकिया सुरू असणार आहे.

पुणे महापालिकेच्या तिजोरीत १४०० कोटीचा कर जमा

गेले दोन महिने निवासी मिळकतकरावर ५ ते १० टक्के सवलत देण्यात आली होत

अखेरच्या दिवशी सायंकाळी सात पर्यंत ७ लाख ७५ हजार १४० मिळकतधारकांनी १४११ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत

गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३ हजार ३७६ नागरिकांनी कर भरणा केलेला नाही

महापालिकेला अपेक्षित उत्पन्नाला लागली आहोटी

गेल्यावर्षी ७ जुलैपर्यंत ७ लाख ७८ हजार ५१६ नागरिकांनी १ हजार ४१५ कोटी ६५ लाख रुपयांचा कर जमा केला होता

यंदाच्या वर्षी सायंकाळी सातपर्यंत १ हजार ४११ कोटी रुपये जमा झाले आहे

महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणातील आरोपीकडून न्यायालयाचा अपमान

आरोपीने न्यायालयात असभ्य भाषा वापरून केला न्यायलाचा अवमान

न्यायालयाचा अवमान करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने एक हजार रुपये दंड आणि सात दिवस कारावासाची सुनावली शिक्षा

सूरज आनंद शुक्ला असे पुतळ्याची विटंबना आणि न्यायालयाचा अवमान करणाऱ्या आरोपीचे नाव आहे

रविवारी पुणे रेल्वे स्थानकात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर चढून त्याने धारदार हत्याराने पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला

मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला लगेच ताब्यात घेतले.

शुक्लाला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्यास ‘पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? किंवा तुम्हाला काही सांगायचे आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने न्यायालयाचा अपमान होईल अशी भाषा केली

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गेल्या वर्षी च्या तुलनेत तीन पट पाणीसाठा जास्त

चार ही धरणे मिळून ६७ टक्के पाणीसाठा

गेल्या वर्षी आजच्या तारखेला २३ टक्के पाणीसाठा होता

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच

सकाळी खडकवासला धरणातून ४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

खडकवासला, वरसगाव ,पानशेत आणि टेमघर या चार धरणात एकूण ६६ टक्के पाणीसाठा

तर पुणे शहराचा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट

कुठल्या धरणात किती पाणीसाठा

खडकवासला: ६२.१७ टक्के

पानशेत: ६५.८९ टक्के

वरसगाव: ७१.२८ टक्के

टेमघर: ५८.६० टक्के

एकूण पाणीसाठा: ६७.०८ टक्के

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील मत्स्यव्यावसायिकांचा शनिवारी सन्मान सोहळा

राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विषयक विविध योजनांची जनजागृती कार्यक्रम

पुणे व छत्रपती संभाजीनगर द्विविभागस्तरीय मत्स्यव्यावसायिकांचा सन्मान सोहळा

१२ जुलै रोजी पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला सोहळा

मत्स्यबीज उत्पादन, मासेमारी, मत्स्यशेती, केज कल्चर, बायोफ्लॉक कल्चर, शोभिवंत मत्स्यव्यवसाय, नाविन्यपूर्ण मत्स्यउद्योजक, रिव्हर रँन्चिग, मत्स्यपर्यटन प्रचार-प्रसार या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे आदींना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यात येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com