Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : प्रेम, पैसा आणि यश मिळणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांवर प्रेमाचा वर्षाव होईल. तर काहींचे अच्छे दिन सुरु होतील.

Anjali Potdar

पंचांग

मंगळवार,९ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी-पंचमी १४|२९

रास-कर्क २६|२३ नं.सिंह

नक्षत्र-आश्लेषा

योग-ऐंद्र

करण-तैतिल

दिनविशेष-१५ प.चांगला

मेष - प्रेम केलं आहे तर त्यासाठी टिकवण्यासाठी काही खर्चही करायला लागेल. आज आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी खर्च होईल. धनसंचायाच्या थोडे मागेच पडाल. व्यवहार जपण्यास साठी अनेक गोष्टी कराल.

वृषभ - घराची डागडुजी, त्याच्यावर पैसा खर्च करणे किंवा एखादा जुने घर घेण्याचा विचारात असाल तर त्या गोष्टी आज तुमच्याकडून पूर्ण होतील. भावंडांचे याच्यासाठी वेगळी मदत होईल.

मिथुन - प्रवासासाठी खर्च होईल. नाती जपण्यासाठी आज विशेष तुमची धडपड असेल. नव्याने गुंतवणूक, धनसंचय यासाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक जिव्हाळा असेल.

कर्क - जितके स्वतःला जवळ कराल तेवढे आज आनंदी रहाल. आपल्यातील नवी कला, काव्य याचे प्रकटीकरण होईल. एक वेगळा आत्मविश्वास आज घेऊन तुम्ही इतरांपुढे वावराल.

सिंह - महत्वाचे ऐवज आणि जिन्नस आज सांभाळणे गरजेचे आहे. मौल्यवान गोष्टी गहाळ होण्याची शक्यता आहे.खर्च वाढता राहील.मनस्तापही त्याचबरोबर वाढेल.

कन्या - सून आणि जावई यांच्या प्रेमात तर आज काहीतरी वेगळे कराल. नातेसंबंधात आनंद लाभेल. जुन्या गुंतवणूक मधून फायदा होणार आहे .शक्तीने नाही तरी बुद्धीने आज कामे कराल.

तूळ - कामासाठी भरपूर प्रवास होतील. सहकाऱ्यांच्या मनात तुमच्याबद्दल आपलेपणा असेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन आघाडीवर रहाल. कामात वाढ होईल. दिवस चांगला आहे.

वृश्चिक - एकीहाती काम करणे आपल्याला कायमच आवडते. आज मनासारखी कामे होतील. त्याचबरोबर तीर्थयात्रेला सुद्धा जाण्याचे योग आहेत. प्रवासातून फायदा आहे. कामातून यश सहज मिळेल.

धनु - काहीतरी वैचित्र्य आपल्या राशीमध्ये कधीतरी दिसते." अर्धा घोडा अर्धा माणूस" अशा चिन्हामुळे स्वभाव ओळखणे कठीण असते. आज लहरीपणा टाळणे गरजेचे आहे. स्वमग्न होऊन काम केल्यास त्याला गती येईल. मृत्यू भय राहील.

मकर - "जोडी तुझी माझी" असा काहीसा दिवस आहे. संसारामध्ये एकमेकांची इच्छा पूर्ण करण्यामध्ये मुशगुल असाल. सामंजस्याने कामे होतील. व्यवसायामध्ये प्रगतीचे योग आहेत.

कुंभ - जोडीदाराचे म्हणणे मान्य करण्यासाठी, त्यांच्यावर पैसा खर्च होईल. नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण होतील. तुम्हाला पुढाकार घेऊन ते मिटवावे लागतील. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. काळजी घ्या.

मीन - दत्त उपासना आज करणे योग्य राहील. देवाकडे काही मागता अनेक गोष्टी आज मिळतील. लॉटरी, रेस, शेअर्समध्ये भरभक्कम फायदा होईल. आपल्या प्रियजनांकडून प्रेमाचा वर्षाव होईल. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

SCROLL FOR NEXT