Tuesday Horoscope Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : भाग्याची दारे उघडणार, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार

Tuesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांसाठी भाग्याची दारे उघडणार आहेत. तर काहींचा दिवस चांगला जाणार आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

मंगळवार,३० सप्टेंबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष,दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास,एकरात्रोत्सोतसवारंभ.

तिथी-अष्टमी १८|०७

नक्षत्र-पूर्वाषाढा

योग-शोभन

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - विद्यार्थ्यांना दिवस चांगल्या संधी घेऊन आलेल्या आहे. भाग्याची दारे सहज उघडतील. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. अध्यात्मिक उन्नतीसाठी दिवस चांगला आहे. आज दुर्गाष्टमी देवी उपासना फलदायी ठरेल.

वृषभ - सरकारी कामांमध्ये व्यत्यय येण्याचा संभव आहे. महत्त्वाची कामे दुपारनंतर केलेली बरी पडतील. जोडीदाराच्या कुटुंबीयांकडून धन लाभाची शक्यता आहे.

मिथुन - केलेल्या कष्टाची आज जोरकस फळे मिळणार आहेत. भागीदारी व्यवसायामध्ये फायदाच फायदा होईल. कोर्टाच्या कामांमध्ये मनासारखे निकाल आज आपल्या बाजूने लागणार आहेत.

कर्क - मानासिकता सांभाळून पुढे जावे लागेल. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. आपल्या महत्त्वाचे ऐवज सांभाळणे आज गरजेचे आहे. नोकरीच्या ठिकाणी मात्र मात्र बदलीचा योग संभावतो आहे.

सिंह - नव्या कल्पनाने दिवस भारलेला असेल. आपली प्रतिभा वाढेल. प्रेमामध्ये काही वचने द्याल. गुलाबी रंग देणारा असाच दिवस आहे. धनयोग सुद्धा उत्तम आहेत.

कन्या - जेवढे झोपेल तेवढेच कामे आज करणे गरजेचे आहे. घरातील लोकांच्या सहकार्याने पुढे जाल. नवीन घर आणि गाडी खरेदी करण्यासाठी विचार करत असाल तर आज सकारात्मक पावले उचलायला हरकत नाही.

तूळ - बहिणीची माया आणि प्रेम लाभेल. एखादी गोष्टीची जबाबदारी घेऊन झपाटलेल्या प्रमाणे कामे कराल. स्वतःची अस्मिता आज ओळखून वागाल. प्रभावी असे व्यक्तिमत्व आज आपले राहील.

वृश्चिक - अनेक गोष्टी एकट्याला आज कराव्या लागतील. कुटुंबीयांशी सल्ला मसलात करून पैशाची निगडित व्यवहार आज कराल. वडीलोपार्जित प्रॉपर्टीच्या वाटण्यांशी निगडित गोष्टी आज पार पडतील.

धनु - अपेक्षित अशा घटना आज दिवसभरात घडणार आहेत. आनंदामध्ये भर पडेल. सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे रहाल. लोकांच्यात ऊठबस होईल. आपले विचार इतरांना ठामपणे सांगण्याची ताकत आज तुमच्यात असेल. दिवस आनंदी आहे.

मकर - नको असलेल्या गोष्टी वेळीच बाजूला सारलेल्या बरे असतात. मग ते नाते असो मानसिकता असो. आज काही गोष्टींचा व्यय होण्याचा संभव आहे. मनस्वास्थ्य जपावे लागेल.

कुंभ- मैत्रीच्या गाठी घट्ट होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा अपेक्षिताचा प्रतिसाद मिळाल्यामुळे दिवस आनंदी आहे. विविध लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन - जे ठरवाल ते करालच असा दिवस आहे. प्रवास घडतील. राजकारण, समाजकारणामध्ये प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अव्वल बाजी मारण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT