मंगळवार,१२ ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष,
अंगारक चतुर्थी.
तिथी-तृतीया ०८|४१
नक्षत्र-पूर्वाभाद्रपदा
योग-सुकर्मा
करण-विष्टीकरण
दिनविशेष-९ नं. चांगला
मेष - आज अंगारकी चतुर्थी आहे. विशेष गणेश उपासना आपल्या राशीला अत्यंत फलदायी ठरणार आहे. विनाकारण खर्चही वाढतील. मनस्वास्थ चांगले राहण्यासाठी विशेष प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवावे .
वृषभ- गोष्टी तोडायला सोप्या असतात.जोडण्यासाठी अनेक वर्ष आपण खर्ची घातलेले असतात. हे नंतर लक्षात येते. जुन्या आठवणी, जुने नातेवाईक पुन्हा नव्याने जोडण्याचा आजचा दिवस आहे. अनेक प्रकारचे लाभ होतील .
मिथुन- वक्तृत्वाची कारक असणारी आपली रास बोलून अनेक नव्या गोष्टी आपण व्यवसायामध्ये समाविष्ट कराल. नव्या बैठका होतील. अनेक नवी कामे आज मिळणार आहेत. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार आहे .
कर्क - शिव उपासना फलदायी ठरेल. अंगारकीची विशेष उपासना सुद्धा आज करावी. तीर्थक्षेत्री भेटी होतील. दानधर्माकडे विशेष कल वाढेल. मनाजोगत्या घटना घडल्यामुळे दिवस चांगला जाईल.
सिंह - सरकारी कामांमध्ये अपयश संभवते आहे. विनाकारण कामात अडथळे आणि विघ्न आज दिसते आहे.एकट्याला बरीच कामे पुढे होऊन करावी लागतील. काळजी घ्या.
कन्या - नको तिथे बुद्धीचा कीस काढण्यात काही अर्थ नसतो. काही गोष्टी म्हणा बुद्धीपेक्षा मनाने घेणे जास्त बरे ठरते. आज जोडीदाराला आपल्याला आपल्या जोडीदाराला काय वाटतं हे मनाने जाणाल तर दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये चांगली प्रगती आज होईल.
तूळ - नको असलेल्या गोष्टी मागे लागणार आहेत. काही केल्या त्याचा ससेमीरा संपणार नाही. आपलेच लोक पाठीत खंजीर खूपसतात असेही भावना होईल. भावनिक तेला बळी न पडताच निर्णय घेणे योग्य राहील.
वृश्चिक- अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष गणेश उपासना, कुलदेवतेचे उपासना आज आपल्याला फलदायी ठरणार आहे. पैशाचे निगडित नवी-नवीन सोर्स निर्माण होतील. संततीकडून चांगल्या बातम्या येतील. क्रीडा क्षेत्रात छान प्रगती होईल .
धनु - एखादा निर्णय घेताना खूप वेळेला आपल्याला विचार करावा लागतो. एका निर्णयाप्रत येऊ शकत नाही. आज आईची यासाठी मदत होईल. कुठलाही निर्णय घेताना प्रगती कशात होईल हे बघून तसे करावे. वाहन सौख्य उत्तम आहे.
मकर - भावंडांशी अबोला संभवतो आहे.कदाचित अनेक जबाबदारी आज एकट्याला खांद्यावर घेऊन पुढे जावे लागेल. जिद्द आणि चिकाटीने पेटून उठाल. दिवस चांगला आहे.
कुंभ - पैशाचे महत्व आज जाणवेल. दोन पैसे कमी असेल तर आपल्याला कोणीही आपल्याला मदत करत नाही. गुंतवणुकीच्या दृष्टीने व्यवस्थित पावले उचलाल. मोठ्या गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.
सहभोजनाचे योग येतील.
मीन - आपले आरोग्य आज उत्तम राहील. सकारात्मकता वाढेल.जवळच्या लोकांच्या कडून काहीतरी उत्साह पूर्ण गोष्टी तुम्ही अवगत कराल. दैवी उपासनेमुळे अडचणीतून मार्ग काढाल. दिवस चांगला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.