
उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी जिल्हा मजिस्टेटने शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शाळेतील शिक्षकांची ऑनलाईन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये असं काही घडलं की ज्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. बैठकीमध्ये सर्व अधिकारी आणि शिक्षकांनी हजेरी लावली. सगळे जण लक्ष देऊन पाहत होते. त्यावेळी अचानक स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ प्ले झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर डीएम यांनी सायबर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले.
महाराजगंजचे जिल्हा मजिस्टेटने शिक्षण विभगातील समस्या जाणून घेण्यासाठी सोमवारी ऑनलाईन मिटिंग बोलावली होती. या मिटिंगला शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षक यांना सहभागी राहण्याचे आदेश दिले होते. सांगितल्याप्रमाणे सर्वजण या मिटिंगला उपस्थित राहिले. या मिटींगमध्ये अनेक महिला अधिकारी देखील सहभागी होत्या. ऑनलाईन मिटिंगदरम्यान डीएम सर्व शाळांमध्ये असलेल्या समस्या जाणून घेत होते.
ऑनलाइन मिटिंग सुरू असताना अचानक गुगल मीटवर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पॉर्न व्हिडीओ प्लकेला. हा व्हिडीओ प्ले होताच डीएमची नजर स्क्रीनवर गेली. त्यांनी तात्काळ ही मिटिंग बंद केली आणि पोलिस अधीक्षकांना या प्रकरणी सायबर पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले. या मिटिंगमध्ये पॉर्न व्हिडीओ प्ले झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मिटिंगमध्ये उपस्थित राहिलेल्या महिला अधिकारी अवस्थ झाल्या आणि त्या मिटिंगमधून निघून गेल्या.
मिटिंग संपल्यानंतर या प्रकरणी महिला बीएसए अधिकाऱ्याच्या आदेशानंतर बीईओने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. सध्या सायबर पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. टेक्निकल टीमची मदत घेत तपास केला जात आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.