Shocking News : डे-केअरमधील भयंकर कृत्य, चिमुकलीचा चावा घेतला, भिंतीवर मारून जमिनीवर फेकले, थरकाप उडवणारा व्हिडिओ

Baby Care Taker Service Uttar Pradesh: नोएडातील सेक्टर १३७ मधील डे केअर सेंटरमध्ये १५ महिन्यांच्या चिमुकलीवर अमानुष वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Uttar Pradesh news
Uttar Pradesh news Saam Tv
Published On
Summary
  • नोएडातील सेक्टर १३७ मधील डे केअर सेंटरमध्ये १५ महिन्यांच्या चिमुकलीवर अमानुष वागणूक

  • मोलकरणीने मुलीला चापट मारून जमिनीवर फेकले, प्लास्टिकच्या पट्ट्याने मारले आणि चावा घेतला

  • सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेची पुष्टी, आरोपी मोलकरीण ताब्यात

  • मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये भीती व संताप, कठोर नियमांची मागणी

तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना 'डे केअर'मध्ये ठेवत असाल तर सतर्क राहा आणि ही बातमी वाचा. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सेक्टर १३७ मधील पारस टिएरा सोसायटीमधील एका डे केअर सेंटरमध्ये केवळ १५ महिन्यांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार आणि अमानुष वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात डे केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या मोलकरणीवर मुलीला चापट मारून जमिनीवर फेकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने मुलीला प्लास्टिकच्या पट्ट्याने मारहाण केली आणि चावा घेतल्याचेही समोर आले आहे. या अमानुष वर्तणुकीमुळे चिमुकलीला गंभीर दुखापत झाली असून, तिच्या आईने त्वरित पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

कुटुंबीयांनी सांगितले की, चिमुकलीच्या शरीरावर चाव्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान या जखमा चाव्याच्या असल्याचे पुष्टीकरण केले. याशिवाय चिमुकलीला चापट मारणे, जमिनीवर फेकणे आणि प्लास्टिकच्या पट्ट्याने मारणे हे प्रकार देखील झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा पुरावा म्हणून डे केअर सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोलकरीण चिमुकलीला जमिनीवर जोरात फेकताना दिसत आहे. या वेळी ती चिमुकली मोठ्याने रडताना आढळून आली, मात्र डे केअरच्या प्रमुखाने हस्तक्षेप करण्याऐवजी संपूर्ण घटनेदरम्यान निष्क्रिय भूमिका घेतली.

तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की या प्रकारानंतर मोलकरीण आणि डे केअरच्या प्रमुखाने कुटुंबीयांविरुद्ध अपशब्दांचा वापर केला. पोलिसांनी हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेत तात्काळ कारवाई केली असून, आरोपी मोलकरणीला ताब्यात घेतले आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

Uttar Pradesh news
Uttar Pradesh : कुत्रा चावल्यामुळे मृत्यू, राज्यस्तरीय कब्बड्डीपटूने गमावला जीव | VIDEO

या घटनेमुळे नोएडामध्येच नव्हे तर संपूर्ण शहरात डे केअर सेंटरच्या सुरक्षिततेबद्दल आणि मुलांच्या काळजीबाबतच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पालक आपल्या मुलांना विश्वासाने डे केअरमध्ये सोपवतात, मात्र अशा घटना त्या विश्वासाला तडा देतात. मुलांच्या सुरक्षेसाठी अशा संस्थांवर कठोर देखरेख आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com