Sakshi Sunil Jadhav
आज अंगारकी चतुर्थी आहे. विशेष गणेश उपासना आपल्या राशीला अत्यंत फलदायी ठरणार आहे. विनाकारण खर्चही वाढतील.
गोष्टी तोडायला सोप्या असतात.जोडण्यासाठी अनेक वर्ष आपण खर्ची घातलेले असतात. हे नंतर लक्षात येते.
वक्तृत्वाची कारक असणारी आपली रास बोलून अनेक नव्या गोष्टी आपण व्यवसायामध्ये समाविष्ट कराल. नव्या बैठका होतील.
शिव उपासना फलदायी ठरेल. अंगारकीची विशेष उपासना सुद्धा आज करावी. तीर्थक्षेत्री भेटी होतील.
सरकारी कामांमध्ये अपयश संभवते आहे. विनाकारण कामात अडथळे आणि विघ्न आज दिसते आहे. काळजी घ्या.
नको तिथे बुद्धीचा कीस काढण्यात काही अर्थ नसतो. काही गोष्टी म्हणा बुद्धीपेक्षा मनाने घेणे जास्त बरे ठरते.
नको असलेल्या गोष्टी मागे लागणार आहेत. काही केल्या त्याचा ससेमीरा संपणार नाही. आपलेच लोक पाठीत खंजीर खूपसतात असेही भावना होईल.
अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष गणेश उपासना, कुलदेवतेचे उपासना आज आपल्याला फलदायी ठरणार आहे.
एखादा निर्णय घेताना खूप वेळेला आपल्याला विचार करावा लागतो. एका निर्णयाप्रत येऊ शकत नाही.
भावंडांशी अबोला संभवतो आहे.कदाचित अनेक जबाबदारी आज एकट्याला खांद्यावर घेऊन पुढे जावे लागेल.
पैशाचे महत्व आज जाणवेल. दोन पैसे कमी असेल तर आपल्याला कोणीही आपल्याला मदत करत नाही.
आपले आरोग्य आज उत्तम राहील. सकारात्मकता वाढेल.जवळच्या लोकांच्या कडून काहीतरी उत्साह पूर्ण गोष्टी तुम्ही अवगत कराल.