Maharashtra Live News Update: नागपूरातील इंदमार कंपनीचं एमआरओ अदानी समुहाने केलं खरेदी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५, मतचोरीविरोधात राहुल गांधींसह विरोधक आक्रमक, महाराष्ट्रात पावसाचे कमबॅक, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

नागपूरातील इंदमार कंपनीचं एमआरओ अदानी समुहाने केलं खरेदी

- नागपूरातील इंदमार कंपनीचं एमआरओ अदानी समुहाने केलं खरेदी

- अदानी डिफेन्स सिस्टीम ॲंड टेक्नॅालॅाजीज कंपनी चालवणार इंदमार एमआरओ

- मिहानमध्ये ३० एकर क्षेत्रात हा प्रकल्प विस्तारलेला आहे

- इथे १० हॅंगर आणि १५ विमानं ठेवण्याची सुविधा आहेत

- या कंपनीकडून भारत आणि जगातील प्रमुख देशांना सेवा पुरवली जातेय

जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोणार तालुक्यात भव्य दुचाकी रॅली

निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा, निसर्गावर प्रेम करणारा आणि त्याचे संरक्षण, संवर्धन करणारा आदिवासी समाज शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो.. महाराष्ट्रातील आदिवासी जमाती निसर्गपूजा, तसेच हिंदू धर्मातील सण- उत्सव साजरे करण्याची परंपरा पाळतात.. जात पंचायत त्यांच्या सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवते तर विवाह संस्थेला विशेष महत्त्व असते.. अशा या समाजाला विकास प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या परंपरा, संस्कृती, हक्कांचे जतन करण्यासाठी दरवर्षी ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा केला जातो.. यंदा या दिनानिमित्त बिरसा मुंडा क्रांती दलाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष भगवान कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन लोणार तालुक्यात करण्यात आले होते .. दरम्यान लोणार तालुक्यातल्या आदिवासी गाव असलेल्या रायगाव येथून रॅलीला सुरुवात होऊन ही रॅली आदिवासी गावा यागावातून दुचाकी रॅली काढण्यात आलीय..

चिखली तालुक्यात अतिवृष्टी आणि हुमणी अळीमुळे ५ हजार ७५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान..

चिखली तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसानात अधिक भर पडली असून या दोन्ही आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे .. त्यानुसार तालुक्यातील तब्बल ५ हजार ७५७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे समोर आलेय.. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, हुमणी अळीमुळे २ हजार ९९३.२१ हेक्टर तसेच अतिवृष्टीमुळे २ हजार ७६४ हेक्टर असे एकूण ५ हजार ७५७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे... त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून आता शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची अपेक्षा आहे ..

वसई विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा आज सकाळपासून ठप्प

वसई विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा आज सकाळपासून ठप्प आहे

गणपतीचा उत्सव जवळ आला असला तरी चालक आणि कंडक्टर यांना पालिकेच्या ठेकेदाराने अद्याप पगार दिला नसल्याच्या रागातून सेवा बंद केली असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या 36 मार्गावर परिवहन सेवा चालू होती.

मात्र सकाळपासूनच सेवा अचानक बंद केल्यामुळे नागरिकांची तसेच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली.

जोपर्यंत पगार दिला जात नाही तोपर्यंत परिवहन सेवा बंद राहणार असा निर्धार परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग

सोलापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहतायत

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावचा पूल ही पाण्याखाली गेलाय

या पुलावरून दोन तरुण दुचाकी घेऊन जातं असताना पाण्याचा प्रवाह लक्षत न आल्याने दुचाकी वाहून जातं होती.

मात्र आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकीला अडवल्याने वाहून जाणारी दुचाकी वाचलीय.

नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाची एकत्रित बैठक

* नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाची एकत्रित बैठक

* दुपारी साडेबारा वाजता मनसे कार्यालयात बैठकीच आयोजन

* दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयात झाली होती दोन्ही पक्षाचा पदाधिकाऱ्यांची बैठक

* दोन्ही पक्षांकडून शहरात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चाच्या नियोजनाबाबत होणार चर्चा

* दोन्ही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी बैठकीला राहणार उपस्थित

* मोर्चाची तारीख आणि वेळ ठरण्याची शक्यता

अकोल्यात बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू

नदीच्या साचलेल्या पाण्यात बुडणाऱ्या बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू झालाय. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या गाडेगांव येथील आस नदीच्या पात्रात ही घडली.. संजय सदाशिव वानखडे असं मृत व्यक्तीच नाव आहे. ते भुमिहीन शेतमजूर असुन त्यांनी उदारनिर्वाहासाठी बकऱ्या पाळल्या. नदिकाठी बकऱ्या चरण्यासाठी ते गेले असता, एक बकरी नदीच्या काठावरुन खाली कोसळली... डोळ्यादेखत आपली बकरी पाण्यात पडलेली बघुन ते बकरीला वाचवण्यासाठी नदी पात्रात उतरले गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वानखडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रसिद्ध रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू

श्रींचे दर्शन घेताना अंगभर कपडे घालण्याचे भाविकांना आवाहन

गणपतीपुळे मंदिर देवस्थान कमिटीकडून मंदिर परिसरात लावले बोर्ड

गणपतीपुळे मंदिर देवस्थान कडून वस्त्र संहितेची सक्ती नाही

मात्र भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसे कपडे घालावेत असं भाविकांना आवाहन

राज्यात सध्या अनेक मंदिरात दर्शन घेत असताना वस्त्रसंहिता लागू

त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी सुद्धा वस्त्र संहिता लागू होण्याची शक्यता

जामखेड गावावर पसरली शोककळा नंदीबैल श्यामच्या जाण्याने गावकऱ्यांचा अश्रूंनी निरोप

वाशिम जिल्ह्यातील जामखेड गाव आज दुःखात बुडालंय वर्षानुवर्षे गावातील श्री जागृत हनुमान संस्थान मंदिराला सोडलेला भक्तांचं प्रेम जिंकणारा लाडका नंदीबैल ‘श्याम’अखेर गावकऱ्यांना सोडून निघून गेला

- आगामी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग

- आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ३१ प्रभागांसाठी प्रारूप रचना निवडणूक आयोगाकडे सादर

- येत्या २२ ऑगस्टला प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा केला जाणार प्रसिद्ध

- २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना मांडता येणार

- २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच १२२ सदस्य संख्या असलेले ४ सदस्य संख्या असलेले २९ आणि ३ सदस्यांचे २ अशी ३१ प्रभागांची रचना

- हरकती आणि सूचनांवरील अभ्यासानंतर ९ ते १५ सप्टेंबर दरम्यान अंतिम आराखडा नगरविकास विभागाला केला जाणार सादर

पुण्यात सावरकर चौक परिसरात रात्री एका महिलेने कॅनलमध्ये उडी मारली. तत्काळ बचाव करून तिला पाण्यातून सुस्थितीत बाहेर काढण्यात आले. या महिलेने पाण्यात उडी का मारली त्याच कारण मात्र कळू शकले नाही

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना वैभवी देशमुख हिने बांधली राखी कुणबी प्रमाणपत्र मनोज जरांगे यांच्या हस्ते स्वीकारले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मसाजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली आहे देशमुख कुटुंबीयांना कुणबी प्रमाणपत्र मिळाला असून ते मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हस्ते स्वीकारले आहे यावेळी वैभवी देशमुख सह धनंजय देशमुख व देशमुख कुटुंबीय उपस्थित होते यावेळी संतोष देशमुख यांच्या तपासावर देखील चर्चा झाली न्यायालय कामकाजामध्ये आत्तापर्यंत काय कार्यवाही झाली त्याचबरोबर प्रकरण कुठपर्यंत आला आहे या संदर्भातही मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाली.

टेट निकालाबाबत राज्य परीक्षा परिषदेकडून प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्टीकरण लवकर निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न

राज्यात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे त्याचे स्पष्टीकरण राज्य परीक्षा परिषदेने दिलेला आहे

व्यावसायिक परीक्षेच्या निकालाबाबत ची माहिती एकत्रित करण्यास वेळ लागत असल्याने निकालाला वेळ लागला असल्याचे परिपत्रक परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी काढला आहे

राज्यात दोन ते सहा जून दरम्यान दोन लाखाच्या वर उमेदवाराने ही परीक्षा दिली आहे आणि ते निकालाच्या प्रतीक्षेत आहेत

लवकरच निकाल परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल आवश्यक माहिती प्राप्त होत नसल्याने उशीर झाल्याची माहिती.

जळगाव जिल्ह्यात गुरुवारपर्यंत पावसाची चिन्हे नाहीत,  शेतकरी चिंतातूर ढगाळ वातावरण कायम

जळगाव, शहरासह जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. अजून काही दिवस पाऊस न झाल्यास जिल्हा दुष्काळाच्या छायेत जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. जिल्ह्यात मंगळवारपासून ते येत्या गुरुवारपर्यंत ढगाळ वातावरणासह ऊन सावली राहील, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. १४ व १५ ऑगस्टला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे संकेत आहेत.

जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. मात्र, आता पुन्हा आठ ते दहा दिवसांपासून पावसाची ओढ आहे. शेतात पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहेत. उडीद व मूग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. त्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. जर आता दोन-चार दिवसांत पाऊस न आल्यास ही पिके जळतील, अशी बिकटस्थिती आहे.

नागपूर पोलिस लाईन टाकळी आणि गोरेवाडा कृत्रिम विसर्जन जलकुंडाची आयुक्तांनी केली पाहणी

- पोलिस लाईन टाकळी आणि गोरेवाडा कृत्रिम विसर्जन जलकुंडाची आयुक्तांनी केली पाहणी

- शिल्लक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे डॉ. अभिजीत चौधंरी यांचे निर्देश

- पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे कृत्रिम विसर्जन जलकुंड तयार करण्यात आले आहे.

- यात पोलिस लाईन टाकळी तलाव आणि गोरेवाडा विसर्जन ठिकाण यांचा समावेश आहे.

- पोलिस लाईन टाकळी येथील कृत्रिम विसर्जन जलकुंड ही 24 बाय 10 मीटर अशी लांब तसेच साडे चार मीटर अशी खोल तयार करण्यात आली आहे.

- या विसर्जन जलकुंडमध्ये मोठ्या गणेश मूर्ती विसर्जित करता येणार आहे. या जलकुंड परिसरात सरंक्षण भिंत, हिरवळ विषयक कामे, स्वच्छतागह, सिक्युरिटी व स्टोअर रुम, पाईप कलव्हर्ट, विद्युतीकरण व प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- प्रकल्पाअंतर्गत विसर्जन कुंडाचे विसर्जनाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक कामे पूर्ण झाली आहे. तर येथील पंप हाऊस, स्टोअर रुम व सिक्युरीटी रुमची कामे अंतिम टप्प्यात आहे.

- विशेष म्हणजे, यंदा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनसाठी गोरेवाडा, कोराडी, कच्छीवीसा येथे सोय करण्यात आली आहे. तर सोनेगाव, गांधीबाग तलाव परिसरासह विविध ४१५ ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार केले जाणार आहेत.

सातिवली येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा

पालघर_पालघरच्या सातिवली येथे स्मशानभूमी जवळ तयार केलेली बाहुली , शेंदूर , तांदूळ , काही लिंबू आणि अघोरी पूजेच साहित्य आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . सातिवलीच्या स्मशानभूमी जवळ दोन दिवसांपूर्वी हे सगळं साहित्य आणि झालेली पूजा दिसून आल्याने सध्या ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण आहे. अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्याच्या हेतूने अघोरी पूजा करण्यात आल्याचा आरोप सध्या ग्रामस्थांकडून करण्यात येतोय . अघोरी पूजा करताना एक भोंदू बाबा काही ग्रामस्थांना दिसला असून यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या भोंदू बाबांनी तेथून पळ काढला . मात्र यानंतर स्थानिकांनी मनोर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय .

मुरूडच्या विजय चौलकर यांना राष्ट्रपती भवनचे आमंत्रण

स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष कार्यक्रमासाठी मुरूड येथील विजय चौलकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ते पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी आहेत. देशभरातून दहा लाभार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली असून त्यापैकी विजय चौलकर हे महाराष्ट्रातून एकमेव आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील मॉडेल लाभार्थी म्हणून ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. रंगकाम करून कुटुंबाचा उदर निर्वाह करणारे चौलकर यांना पंतप्रधान आवास योजनेतून त्यांच्या स्वप्नांचे घर मिळाले आहे.

यवतमाळात 709 प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या

यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या सुरू आहेत.आतापर्यंत संवर्ग एक आणि तीन मधील मिळून 709 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून या बदल्यांमध्ये संवर्ग एकच्या 353 संवर्ग दोन 191 आणि संवर्ग तीन च्या 159 शिक्षकांचा समावेश आहे आता संवर्ग चार मधील शिक्षकांचे पोर्टलवर अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली आहे गेल्या आठ ते दहा दिवसात संवर्ग चार मधील शिक्षकांच्या बदल्या होणार आहे त्यानंतर प्रत्यक्षात कार्यमुक्तीला सुरुवात होणार आहे.

अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

रत्नागिरी - अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

पहाटे 3.30 वाजल्यापासून श्रींचं दर्शन सुरू

त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळेत मोठी गर्दी

या वर्षातील एकमेव अंगारकी चतुर्थीचा योग श्रावण महीन्यात

दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था

नारळबागेत 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर व रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था

रात्री 10.30 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार

लाखों भाविक दर्शनासाठी गणपतीपुळ्यात दाखल

ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

धाराशिवच्या उमरगा-लोहारा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरसभेत महायुतीत प्रवेशाची खुली ऑफर दिली. लोहारा तालुक्यातील करजखेडा येथे जलसंपदा विभागाच्या कामाच्या उद्घाटनावेळी ही घटना घडली.प्रवीण स्वामी यांनी मतदारसंघातील कामाची मागणी केली असता,“पाणी कुठल्या वळणावर आहे हे तुम्हालाही कळलं पाहिजे…पाणी तर आम्हीच देणार,”असे म्हणत विखे पाटील यांनी उपस्थितांना हात वर करून स्वामींना निर्णय घेण्याचे आवाहन केले.या वक्तव्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात आज वाहतुकीत बदल

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात आज वाहतुकीत बदल*

अंगारकी चतुर्थी निमित्त पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल

पुण्यातील आप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकापर्यंत जाणारा रस्ता बंद

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता पोलिसांचा निर्णय

आज बाजीराव रोड,शिवाजी रोड वाहतुकीसाठी राहणार बंद

*वाहतुकीसाठी असलेले पर्यायी रस्ते कुठले*

पुरम चौकातून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जे एम रोड मार्गे पुढे जावं

शिवाजी रोड वरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रोड मार्गाचा वापर करावा

आप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com