Trigrahi Yog 2025: saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog: मीन राशीत बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम, प्रत्येक कामात मिळणार यश

Trigrahi Yog 2025: मीन राशीमध्ये त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे. मे महिन्यात या राजयोगाची निर्मिती होणार असून काही राशींच्या व्यक्तींना चांगला परिणाम मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या वर्षीचा मार्च महिना हा ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाचा होता. या महिन्यात मीन राशीमध्ये अनेक ग्रह एकत्र आले होते. येत्या काळात म्हणजेच मे महिन्यात देखील असाच ग्रहांचा मेळा भरणार आहे. मीन राशीमध्ये हा त्रिग्रही योग तयार होणार आहे.

वैदिक पंचांगानुसार, ग्रहांचा युवराज बुध ग्रह ७ मे रोजी मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामध्ये ७ मे रोजी मीन मीन राशीमधये शुक्र, शनी आणि राहूची उपस्थिती तशीच राहणार आहे. १८ मे पर्यंत हा योग बनणार आहे. त्यानंतर राहु मीन राशीतून बाहेर पडून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

कुंभ रास

त्रिग्रही राजयोग या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशींच्या साडेसातीचा टप्पा आता संपु्ष्टात येणार आहेत. तुमची प्रलंबित कामं पु्न्हा सुरळीत होणार आहेत. शारीरिक समस्यांपासून तुमची मुक्ती होणार आहे.

वृषभ रास

या राशींच्या लोकांसाठी त्रिग्रही योग अनुकूल असणारआहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार आहेत. तुमचे अडकलेले पैसे लवकरच तुमच्या हाती येणार आहेत. नवी नोकरी किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसमधून भरपूर नफा मिळू शकतो.

धनु रास

या राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. जर तुमच्या कामात अडथळे येत असतील तर ते आता दूर होणार आहे. तुम्हाला यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. वैवाहिक जीवनात नव्याने आनंद येणार आहे. अविवाहितांसाठी काहीतरी चांगली बातमी समोर येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

Crime News : नागपूर हादरलं! ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या, झुडपात आढळला मृतदेह

PAK vs UAE: आधी नकार आता होकार; आशिया कपमध्ये पाकिस्तानचा ड्रामा; उशिराने सुरू होणार थरारक सामना

Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

SCROLL FOR NEXT