Hasta Nakshatra rashi social media
राशिभविष्य

Hasta Nakshatra Traits : हस्त नक्षत्रात कन्या राशीच्या व्यक्तींबद्दल आहेत खास गोष्टी, वाचा संपूर्ण माहिती

Nakshatra Personality : हस्त नक्षत्र व्यक्ती बुध्दीमान, कलाप्रेमी, धार्मिक असून त्यांच्यावर चंद्र-बुधाचा प्रभाव असतो. व्यवसायात यशस्वी पण आरोग्याच्या समस्या जसे गॅस, बद्धकोष्ठता यांचा त्रास होतो.

Sakshi Sunil Jadhav

हस्त नक्षत्र -

हस्त नक्षत्र चंद्राच्या अमलाखाली येणारे नक्षत्र आहे. या नक्षत्राच्या व्यक्ती कर्मयोगी, धार्मिक कार्य तत्पर, अभिमानी, तसेच सिद्धांत व वेद यांची आवड आणि उत्तम जाण असणारे, उत्तम कार्यकर्ता, विद्वान, बुद्धिमान, व्यवहार कुशल, आनंदी, सदाचारी, ईश्वर भक्त, रसिक, हौशी, कलाप्रिय, विनायशील, निर्वसनी असतात.

पण काही कारणाने बिघडले तर मात्र निष्काळजी, निर्दयी, भांडणामध्ये हात घाई करण्यापर्यंत वेळ आणतात. कपट आणि लबाडपणामुळे दुःख होते. स्वतःच्या दोषामुळे साधारण जीवन आणि वृथा अभिमानामुळे दुःखास कारणीभूत होतात.यांची शरीर प्रकृती पाहिली असता बुद्धी आणि सौंदर्य हे चांगल्या प्रकारचे असते. बांधा उंच, प्रमाणशीर, रोगप्रतिकारशक्ती मध्यम, शौर्य, धैर्य, धाडस, पराक्रमशूरता अधिकार लालसा हे गुण मध्यम असतात. स्त्रियांच्या दृष्टीने सौंदर्य, बुद्धी, कला या दृष्टीने छान असते. प्रौढ वयातही या स्त्रिया तरुण दिसतात. या स्त्रिया सुंदर लाजतात. स्वच्छता टापटीतपणा कलासक्त प्रवृत्ती असते.

नोकरी व्यवसाय -

चंद्र आणि बुधाचा प्रभाव आहे त्यामुळे वाणिज्य विभाग, सेल्समन, प्रेस कारागीर, चित्रकार, राजदूत, संदेशवाहक, खेळसामग्री, विक्रेते, कंपोझिटर, बांधकाम संबंधी नोकरी किंवा व्यवसाय, शाई व्यवसाय, रंगव्यवसाय, जाहिराती प्रचारक, व्याख्याते, कलाकार, तलाव - नाले बांधकामाशी संबंध, पाईपलाईन टाकणे, स्वच्छतेचे काम करणारे, पोस्ट, एजन्सी, साहित्यकार इत्यादी.

रोग आजार -

या नक्षत्राची प्रतिकारशक्ती मध्यम असते. वात प्रकृती असल्यामुळे वायूविकार, पोटात गॅस धरणे, अंतरव्रण, बद्धकोष्ठता, श्वासात अडथळे, कातडी सैल पडणे, अमिबिक, जुलाब, फोबिया, हिस्टेरिया, टाइफाइड या रोगांचा सामना करावा लागतो. त्वचेचे काही विकार असू शकतात. तोंड येणे विटामिन बी ची कमतरता. या व्यक्ती उगाचच औषधे घेत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT