
अवघ्या ४ दिवसांनी नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. २०२५ हे वर्ष ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाचं मानलं जातंय. याचं कारण म्हणजे, या वर्षात अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. यामध्ये मंगळ, ग्रहांचा सेनापती, ठराविक काळानंतर राशी बदलतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ सुमारे ४५ दिवसांनी आपली राशी बदलतो.
राशीप्रमाणे मंगळ ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर नक्षत्र देखील बदलतो. ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडतो. 2025 मध्ये म्हणजेच 12 जानेवारी रोजी रात्री 11:52 वाजता पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळाने गुरूच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.
पुनर्वसू हे २७ नक्षत्रांपैकी सातवे नक्षत्र असून या नक्षत्राचा स्वामी गुरू आहे. गुरू आणि मंगळ हे एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. मात्र या तरीही मंगळाच्या या नक्षत्र गोचरचा काही राशींच्या व्यक्तींवर चांगला आणि सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगल्या परिणामांना सामोरं जावं लागणार आहे.
मंगळ पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार असून या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळू शकणार आहे. अनावश्यक खर्चापासून तुम्ही वाचू शकता.
या राशीच्या लोकांसाठी पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणारा मंगळ लाभ देणार आहे. या राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे.
मंगळ पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार असून या राशीच्या लोकांना करिअरमध्ये बरेच फायदे मिळणार आहेत. या राशीच्या लोकांना पदोन्नतीसह उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला मोठा नफा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे. कामाच्या ठिकणी तुमचं भरपूर कौतुक होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.