Zodiac signs' fate saam tv
राशिभविष्य

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Lalita Panchami auspicious yog: नवरात्रीच्या (Navratri) पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते. हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या वर्षी ललिता पंचमीला एक शुभ योग (Lalita Panchami auspicious yoga) जुळून येत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • आज ललिता पंचमी, धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची

  • अभिजित मुहूर्त आणि शुभ योग आहेत

  • राहुकाल, यमगंड – अशुभ काळ

आज शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ आहे. आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून हा दिवस धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या तिथीला “ललिता पंचमी” म्हणून ओळखलं जातं. नवरात्रोत्सवाच्या काळातील ही पंचमी देवीची उपासना आणि स्तोत्रपठणासाठी विशेष मानली जाते.

शुक्रवारी ही तिथी आल्यामुळे घरगुती आणि सामाजिक कार्यांसाठीही शुभ वातावरण निर्माण होतं. आज सूर्योदय साधारण सकाळी ६:१७ वाजता झाला आणि सूर्यास्त सायंकाळी ६:१८ वाजता होईल. आज विशाखा नक्षत्र रात्री १०:०९ पर्यंत असून त्यानंतर अनूराधा नक्षत्राचा आरंभ होईल. चंद्र आज तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

राहुकाल, यमगंड आणि गुलिककाल यासारखे काही काळ अशुभ मानले गेले आहेत. मात्र अभिजित मुहूर्त, सर्वार्थसिद्धि योग आणि रवियोग यामुळे आजचा दिवस कार्यसिद्धीसाठी उत्तम ठरणारा आहे. धार्मिक कार्य, पूजेसाठी, व्यापार व्यवहार किंवा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचे शुभ मुहूर्त अत्यंत अनुकूल मानले जात आहेत.

आजचं पंचांग

  • तिथी: आश्विन शुक्ल पंचमी

  • वार: शुक्रवार

  • नक्षत्र: विशाखा रात्री १०:०९ पर्यंत, त्यानंतर अनूराधा

  • चंद्र राशी: तूळ ते वृश्चिक

  • सूर्योदय: सकाळी ६:१७

  • सूर्यास्त: सायंकाळी ६:१८

  • राहुकाल: सकाळी १०:४८ ते १२:१८

  • यमगंड काल: दुपारी ३:१६ ते ४:४६

  • गुलिक काल: सकाळी ७:५० ते ९:१९

  • अभिजित मुहूर्त: ११:५४ ते १२:४१

  • योग: रवियोग आणि सर्वार्थसिद्धि योग (विशेष शुभ)

कोणत्या चार राशींसाठी आजचा दिवस शुभ आहे?

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेषतः फलदायी आहे. व्यावसायिक व्यवहार यशस्वी होणार आहे. या काळात तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. नवीन करार किंवा करिअरमध्ये बदल यशस्वी ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. प्रवासातूनही लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना आज आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय लाभदायी ठरतील. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल, तर व्यवसायिक क्षेत्रात नवीन प्रकल्प हाताशी येतील. सामाजिक मान-प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या कार्याचे कौतुक होईल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात प्रगती होईल. वैवाहिक आणि प्रेमसंबंध अधिक गोड होतील. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्थैर्य आणि प्रगतीचा आहे. गुंतवणूक आणि व्यवहारातून चांगला फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विरोधक शांत राहणार आहेत. तुम्हाला वैवाहिक जीवनात समाधान मिळू शकतं.

मीन

मीन राशीच्या लोकांना आज मानसिक समाधान मिळणार आहे. कलाक्षेत्र, अध्यापन किंवा संशोधनाशी संबंधित लोकांना विशेष यश मिळू शकतं. अचानक धनलाभाची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं कौतुक मिळणार आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे.

आज कोणती तिथी आहे?

आश्विन शुक्ल पंचमी – ललिता पंचमी.

आजचे शुभ मुहूर्त कधी आहेत?

अभिजित मुहूर्त ११:५४ ते १२:४१.

कोणते अशुभ काळ टाळावेत?

राहुकाल, यमगंड आणि गुलिककाल.

कोणत्या राशींसाठी दिवस शुभ आहे?

मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मीन.

आज कोणते योग आहेत?

रवियोग आणि सर्वार्थसिद्धि योग.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT