Rashi Bhavishya 2nd December 2025 : मंगळवार, २ डिसेंबर २०२५ हा दिवस अनेक राशींसाठी नव्या आशा घेऊन येत आहे. नोकरी-व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशीला यश मिळेल आणि कोणाला सावध राहावे लागेल. प्रेम आणि आरोग्याच्या बाबतीत नशीब तुम्हाला साथ देईल का? मंगळवारचा (2 December 2025 Horoscope) दिवस तुमच्यासाठी समाधानाचा असेल की संघर्षाचा असेल? याबाबत जाणून घेऊयात... (tuesday horoscope in marathi)
मेष (aajche rashi bhavishya Mesh) -
मेष राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस साधारण राहील. तुम्हाला नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधावा लागेल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी नवे मार्ग शोधाल. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
वृषभ -(aajche rashi bhavishya Vrishabh)
दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि शांततेने होईल. मित्रांसोबत फिरायला जाण्याची योजना आखाल. आरोग्यात चढ-उतार राहतील. शक्यतो तेलकट-तळलेले पदार्थ टाळा. सकाळी अडलेली काही कामे संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील. अनावश्यक बोलणं टाळावे.
मिथुन (aajche rashi bhavishya Mithun)
मंगळवारी तुम्हाला अति प्रमाणात काम असेल, त्यामुळे तुम्ही व्यस्त राहाल. पैशाची स्थिती चांगली राहील. नातेवाइकांच्या घरी मेजवानीचा आनंद घ्याल. नवीन काहीतरी करण्याचा विचार कराल.
कर्क (aajche rashi bhavishya Kark)
मंगळवारचा दिवस उत्तम राहणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणाहून बोलावणे येऊ शकते. गरज पडल्यास जवळच्या व्यक्तीकडून पैशांची मदत होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह (aajche rashi bhavishya Singh)
मनात सकारात्मक ऊर्जा कायम राहील. घरातील सुख-सोयी वाढतील. गरजूची मदत कराल. इव्हेंट मॅनेजमेंट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवे संधी मिळतील.
कन्या (aajche rashi bhavishya Kanya)
मंगळवारचा दिवस बदलांनी भरलेला असेल. कौटुंबिक व्यवसायात बदल हवे असल्यास वडिलांशी बोलणी कराल. राजकारणात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी दबाव आणि घरी भांडणे यामुळे तणाव येऊ शकतो.
तुळ (aajche rashi bhavishya Tula)-
मंगळवारचा दिवस अनुकूल असेल. आई-वडिलांशी मनातील गोष्टी सांगाल. भावंडांचा पाठिंबा मिळेल. फोनवरून चांगली बातमी येईल. पैशाची चणचण दूर होईल.
वृश्चिक (aajche rashi bhavishya Vrischik)
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. हवामान बदलामुळे आरोग्यात थोडी तक्रार होऊ शकते. बोलताना संयम ठेवा. नोकरी-व्यवसायात नवे संधी येतील. कुटुंबात प्रेम वाढेल. लेखकांना आनंदाची बातमी मिळेल.
धनु (aajche rashi bhavishya Dhanu)
आजचा दिवस उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो. नात्यांमधील कटूता दूर होईल. भांडणे टाळा. बाहेर जाण्याचा बेत आखाल.
मकर - (aajche rashi bhavishya Makar)
मकर राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस सरासरी राहील. नकारात्मक विचारांमुळे त्रास होऊ शकतो. आनंदाचा माहौल आणण्यासाठी स्वतःला सकारात्मक ठेवा. अडकलेला पैसा परत मिळू शकेल.
कुंभ (aajche rashi bhavishya kumbh)
दिवस सामान्य जाऊ शकतो. थोरल्यांचा आशीर्वाद मिळेल. मान-सन्मान वाढेल. चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. विशेषत: खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन (aajche rashi bhavishya Meed)
मनात नवे उत्साह आणि उमंग राहील. सर्व कामे मन लावून कराल. नवीन अनुभव येतील. मानसिक तणाव दूर होईल. वाद टाळा. नातेवाईक येण्याने घरात आनंदाचे वातावरण राहील.
Disclaimer: वरती दिलेली माहिती फक्त पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची आम्ही कोणताही हमी घेत नाही किंवा खात्री देत नाही. कोणतीही माहिती किंवा उपाय अमलात आणण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.