horoscope  Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : जिद्द आणि चिकाटी वाढणार; ५ राशींच्या लोकांच्या अंगावर महत्त्वाची जबाबदारी पडणार

Thursday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना जिद्ध आणि चिकाटी वाढेल. तर काहींना महत्त्वाची जबाबदारी पेलावी लागेल. वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,२८ ऑगस्ट२०२५,भाद्रपद शुक्लपक्ष,ऋषीपंचमी,जैन ,संवत्सरी.

तिथी-पंचमी १७|५७

रास-तुला

नक्षत्र-चित्रा

योग- शुक्ल

करण-बालव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - भागीदारी व्यवसायामध्ये सुयश मिळण्याचा आजचा दिवस आहे. आपण आपल्या मतांविषयी विशेष आग्रही रहाल.

वृषभ - हितशत्रूंवर मात करून पुढे जाल. काही जणांचा मात्रा आज मनोरंजनाकडे कल राहील. दिवस संमिश्र राहील.

मिथुन - मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. वैचारिक परिवर्तन होईल. नव्या नव्या गोष्टी यांना आज वाटा मिळणार आहे.

कर्क - प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे सुद्धा मार्गी लागणार आहेत. दिवस चांगला आहे.

सिंह -जिद्द आणि चिकाटी वाढती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडण्याची शक्यता आहे. त्यामधून योग्य पद्धतीने निभाव लागेल.

कन्या - कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आज दिवस आहे. आर्थिक प्रमाण सुद्धा समाधानकारक राहील. दिवस चांगला आहे.

तूळ - तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी साधण्याचा आजचा दिवस आहे. केलेल्या कामाबद्दल गौरव होईल. अर्थात प्रसिद्धी सुद्धा मिळेल. उत्साह आणि उमेद वाढेल.

वृश्चिक - काहींचा अध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे मात्र रखडण्याची दाट शक्यता आहे. मनस्थिती सांभाळावी लागेल. उद्रेक होऊ देऊ नका.

धनु - महत्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान मिळण्याचा आजचा दिवस आहे.

मकर - तुमच्या कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान, प्रसिद्धी लाभणार आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन कामे कराल.

कुंभ - तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणार आहेत. विशेषत्वाने गुरुकृपा आज आपल्यावर होईल. दिवस चांगला आहे.

मीन - वाहने जपून चालविणे आज गरजेचे आहे. प्रवास शक्यतो टाळले तर अजून बरे राहील. तब्येत जपावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar on High Alert : हायअलर्ट ! नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसले जैश ए मोहम्मदचे ३ दहशतवादी, नावं आणि फोटोही केले शेअर

Zp School : शिक्षक नसल्याने शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; शिक्षकांची चार पदे रिक्त

Genelia Deshmukh: याच नजरेत वेडा झाला रितेश देशमुख

Cyber Crime : CBI अधिकारी बोलतोय..., गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली, आजोंबांना १ कोटींचा गंडा

आमदाराच्या मुलाच्या घराबाहेर आढळला मोलकरणीचा मृतदेह, शरीर अन् चेहऱ्यावर जखमा; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT