आमदाराच्या मुलाच्या घराबाहेर आढळला मोलकरणीचा मृतदेह, शरीर अन् चेहऱ्यावर जखमा; नेमकं काय घडलं?

Young Girl Death: काँग्रेस आमदाराच्या मुलाच्या बंगल्याबाहेर २० वर्षीय मुलगी मृत अवस्थेत सापडली. आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, चेहऱ्यावर जखमांच्या खुणा.
Madhya pradesh Shocking Death
Madhya pradesh Shocking DeathSaam tv news
Published On
Summary
  • काँग्रेस आमदाराच्या मुलाच्या बंगल्याबाहेर २० वर्षीय मुलगी मृत अवस्थेत सापडली.

  • आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, चेहऱ्यावर जखमांच्या खुणा.

  • मुलगी ‘मोलकरीण नव्हे, मुलीसारखी’ असल्याचं अभियंत सिंह गौर यांनी स्पष्ट केलं.

  • पोलिस तपास सुरू, पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून पुढील निष्कर्ष काढले जाणार.

मध्यप्रदेशच्या टिकमगड जिल्ह्यातील खरगापूर गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काँग्रेस आमदाराच्या मुलाच्या बंगल्याबाहेर एका २० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. बंगल्याच्या मागील भागात आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह आढळला. मृत तरूणीच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा होत्या. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनने मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. तसेच तपास सुरू आहे.

सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काँग्रेस आमदार चंदा सिंह गौर यांचे पुत्र अभियंत सिंह गौर यांच्या बंगल्याबाहेर मुलीचा मृतदेह सापडला. याबाबत अभियंत सिंह गौर यांना या घटनेबाबत माहिती विचारण्यात आली. त्यांनी सांगितलं की, 'घटनेच्या दिवशी मी जिल्हा मुख्यालयाबाहेर दिल्लीत होतो. माझी पत्नी आणि १७ वर्षांचा मुलगा घरी होते. त्यांनी फोनवरून यासंदर्भात माहिती दिली.'

Madhya pradesh Shocking Death
मुंबईत मनोज जरांगे दाखल होण्याआधीच भाजपकडून बॅनरबाजी, देवेंद्र फडणवीसांचा फोटो अन्.. नेमकं काय लिहिलंय?

'घटनेच्या दुसऱ्या दिवशी मी घरी पोहोचलो. तरूणीनं आत्महत्येचं पाऊल का उचललं? तिनं आयुष्य का संपवलं? याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तिच्याकडे ना फोन होता, ना कधी नाराज असलायची. घरात कायम आनंदात असायची. ती ५ वर्षांची असल्यापासून आमच्यासोबत होती. ती मोलकरीण नव्हती. तर ती मुलीसारखी होती. आम्ही तिच्या लग्नासाठी जोडीदारही शोधत होतो, असं अभियंत म्हणाले.

मृत सपनाचे वडील भोला रायकवार हे उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील बेलाटल येथील रहिवासी आहेत. घटनेनंतर घटनास्थळी तरूणीची आई आली. पण तिनं पोलिसांना अद्याप कोणताही जबाब दिलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि मृतांच्या कुटुंबियांच्या जबाबांवरून शोध घेतला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Madhya pradesh Shocking Death
गणेश मिरवणुकीत भयंकर घडलं! नाचण्यावरून वाद, भररस्त्यात चाकूनं तरूणावर सपासप वार, कोल्हापूर हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com