Zp School : शिक्षक नसल्याने शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; शिक्षकांची चार पदे रिक्त

Nashik News : पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांची पट संख्या चांगली असतांना देखील शाळेतील चार शिक्षकांची पद रिक्त आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा पद भरण्याची मागणी केली आहे
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

नाशिक : जिल्हा परिषद शाळांची अवस्था वाईट आहे. शाळेला विद्यार्थी संख्या नाही तर काही ठिकाणी शिक्षकच नसल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारे नाशिकच्या परधाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असताना ती अद्याप भरली गेलेली नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषद शाळेत धडक देत शाळेला थेट कुलूप ठोकले आहे. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. 

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील परधाडी येथिल जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या कमी आहे. विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. अशात शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. असाच प्रकार परधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही वर्षांपासून पाहण्यास मिळत आहे. 

Nashik News
Satara Crime : कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावले; साताऱ्यात भररस्त्यावरील घटनेने खळबळ

शिक्षकांची चार पद रिक्त 

जिल्हा परिषदेच्या शाळेत चार पदे रिक्त असल्याने ते अद्याप भरले गेल्या नसल्याने परधाडीच्या ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. परधाडी येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगले पध्दतीचे शिक्षण मिळत असल्याने या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांची पट संख्या चांगली असतांना देखील शाळेतील चार शिक्षकांची पद रिक्त आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा पद भरण्याची मागणी केली आहे. 

Nashik News
Wardha Rain : दोन तासाच्या पावसात शेती गेली खरडून; कापूस, सोयाबीनसह संत्रा बागांचे नुकसान

एकाच शिक्षकावर भार 

दरम्यान शाळेतील चार शिक्षकांची पदे रिक्त असल्याने त्याचा भार अन्य एका शिक्षकावर येऊन पडतो. अर्थात पहिली ते सातवीपर्यतचे वर्ग त्याला सांभाळावे लागतात. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अखेर शाळेला रिक्त पदांवर शिक्षक नेमावा; या मागणीसाठी संतप्त पालकांनी आज शाळेला कुलूप ठोकत शिक्षक देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com