गुरुवार,११ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,भरणी श्राध्द, पंचमी श्राध्द.
तिथी-चतुर्थी १२|४६
रास-मेष
नक्षत्र-अश्विनी
योग-ध्रुव
करण-बालव
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - आपल्या राशीला मुळातच ऊर्जा आणि धाडस खूप आहे. आज वेगळे काहीतरी करण्याच्या मार्गावर असाल. अवघड गोष्टी सोप्या होतील. दिवस सकारात्मक आहे.
वृषभ - विनाकारण खर्च वाढतील. या हाताने घ्यावे आणि हाताने द्यावे असा दिवस आहे. अर्थातच "आला गेला मनोगते". प्रेमामध्ये सुद्धा अपयश संभवते आहे काळजी घ्यावी.
मिथुन- सून जावयांच्या बरोबर आनंदाचे क्षण व्यक्तित कराल. प्रेमाला नव्याने आकार येईल. दोघांच्या संगनमताने नवी स्वप्ने रंगवाल. धनलाभ चांगले आहेत.
कर्क- धावपळीचा दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विविध वाहनातून प्रवास करण्याचे योग आज आहेत. भावनिकतेला बाजूला ठेवून कार्यक्षम राहणे आज गरजेचे आहे. आपले कोण परके कोण ओळखून पुढे चला.
सिंह- रवी उपासना आज उत्तम ठरणार आहे. दानधर्म आणि उदारता वाढती राहील." केल्याने होत आहे रे" असा काहीसा दिवस आहे.जिद्दीने पेटून उठाल आणि यश मिळवाल.
कन्या - संशय आत्मा अशी आपली असणारी रास आहे. आपल्याच स्वभावामुळे काही वेळेला एकटेपण येते. आज अनेक कामे एकट्याचा जीवावर करावे लागतील. अपयशाचे तमा न बाळगता पुढे जा.
तूळ - वैशा वर्णाची असणारी आपली रास आहे. कामासाठी भटकंती वाढेल आणि व्यापार उदीम चांगले होतील. व्यावसायिक जोडीदाराबरोबर नव्या संकल्पना रुजवाल.
वृश्चिक - तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. किडनीशी निगडित आजार होतील. नोकरीमध्ये धावपळीचा दिवस आहे. महत्त्वाचे ऐवज आज सांभाळा.
धनु - सद्गुरु कृपा आपल्यावर आज विशेष राहणार आहे. शेअर्स, रेस याच्यामध्ये पैसा मिळेल. नव्या नव्या संकल्पनेने आपले प्रज्ञा वैभव वाढेल. संतती पासून सुख मिळेल.
मकर - जुन्या गोष्टी नव्याने करण्याचा आज अट्टाहास राहील घरामध्ये काही खरेदी होईल. सर्व सुखाच्या दृष्टीने दिवस आज चांगला आहे. पण कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.
कुंभ - जवळच्या प्रवासातून फायदा आहे. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. स्वतःवरचा आत्मविश्वास आज वाढेल. संशोधनात्मक कार्यात गती आणि प्रगती आहे. दिवस चांगला आहे.
मीन - "याचसाठी केला होता अट्टाहास खास "असा दिवस आहे. धनाची चलती अबाधित राहील. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल. जोडीदाराच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.