Maharashtra Live News Update: नरेश मस्के भाजपची चाकरी करतात, काँग्रेस खासदाराची टीका

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२५, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मनसेची बैठक, ओबीसी आरक्षण वाद, मनोज जरांगे पाटील, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Solapur: सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे झाले हाल

सोलापूर -

सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे झाले हाल

सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी मित्र नगर शेळगी परिसरात केली पाहणी

महापालिकेच्या भोगलं कारभाराचा सोलापूरकरांना भोगावा लागतोय त्रास

Amravati: अमरावतीत विदर्भाच्या राजाचे आज विसर्जन, राजकमल चौकात होणार महाआरतीला

अमरावती -

अमरावतीत विदर्भाच्या राजाचे आज विसर्जन

अमरावती शहरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा विदर्भाचा राजा गणपती बाप्पा.

दुपारी 2 वाजता निघणार विसर्जन मिरवणूक

रात्री 7.30 वाजता राजकमल चौकात महाआरतीला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार

ढोल-ताश्यांचा निनाद, कलात्मक देखावे, विविध प्रकारच्या झाक्या, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो भाविकांचा सहभाग असणार

विदर्भाच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला पश्चिम विदर्भातील भक्तांची असणार उपस्थिती

Solapur: अक्कलकोट तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, नदी- नाले तुडुंब

सोलापूर -

- अक्कलकोट तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, नदी- नाले तुडुंब

- अक्कलकोट तालुक्यातील वागदरी ते शिरशी गावाला जोडणारा वाहतुकीचा पूर्णपणे बंद

- त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक झाली विस्कळीत

- बोरगाव ते घोळसगाव नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद

- बोरी नदीच्या पुलावर तीन ते चार फुटापर्यंत पाणी

- तालुका प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा

Nashik: नाशिक महापालिकेची कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकीत

नाशिक -

- नाशिक महापालिकेची कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकीत

- महापालिकेनं बजावल्या साडे तीन लाख थकबाकीदारांना नोटीसा

- महापालिकेच्या पथकांकडून घरोघरी मोहीम, कारवाईचा इशारा

- सध्या शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांकडे ३४७ कोटींचा दंड थकीत

- ३४७ कोटींचा थकीत दंड वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न

Amravati: नरेश मस्के भाजपची चाकरी करतात, काँग्रेस खासदाराची टीका

अमरावती -

काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची खासदार नरेश मस्के यांच्यावर टीका

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे मते फुटली असा आरोप केला होता खासदार नरेश म्हस्के यांनी

नरेश मस्के भाजपची चाकरी करतात.. भाजपकडून वाह...वाह.. मिळवण्यासाठी त्यांचे हे वक्तव्य

इंडिया आघाडी कडे स्पष्ट बहुमत नव्हतं जिंकेल अशी स्थिती नव्हती

Solapur: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

सोलापूर -

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

सोलापूर शहरातील सखल भागात शिरले पाणी

सोलापूर शहरातील जुना विडी घराकुल परिसरात अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन झाले विस्कळीत

या सोबतच अक्कलकोट रोड परिसरातील पंजावणी मार्केट,होटगी रोड तलाव परिसरात ही शिरले पाणी

हवामान खात्याने या अगोदरच सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा दिला होता इशारा

Pune: राज्यात पावसाचा ब्रेक संपतोय? पुढील आठवड्यात परतीचा मान्सून धडकणार

पुणे -

राज्यात पावसाचा ब्रेक संपतोय?

पुढील आठवड्यात परतीचा मान्सून धडकणार

मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे.

पुढील दोन दिवस कोकण-गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, पुढील आठवाड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याचा अंदाज आहे.

Pune: आयुष कोमकर हत्या प्रकरण, आंदेकर टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई

पुणे -

आयुष कोमकर हत्या प्रकरण

हत्या करणाऱ्या आंदेकर टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई

आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई

Nagpur: कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचा आदेश रद्द

नागपूर -

- कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचा आदेश रद्द

- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिलासा

- कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेस नेते सुनील केदार गटाच्या ताब्यात आहे

Dharashiv: धाराशिवमध्ये मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत

धाराशिव जिल्ह्यात कुणबी मराठा - कुणबी आणि कुणबी -मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत

सक्षम अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत

 Pune: पुण्यात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, दीड वर्षात 40 हजारांहून अधिक नागरिक जखमी

पुणे -

दीड वर्षात तब्बल चाळीस हजाराहून नागरिक जखमी

मोकाट कुत्र्यांचा उपद्रव नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या दीड वर्षांत तब्बल चाळीस हजारांहून अधिक नागरिकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याची धक्कादायक माहिती महापालिकेकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com