Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : पैशांचं मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांची लॉटरी लागणार

Thursday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या हाती पैशांचं घबाड लागणार. तर काही लोकांवर पैशांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

पंचांग

गुरुवार,४ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष शुक्लपक्ष,श्री दत्तात्रेय जयंती.

तिथी-चतुर्दशी ०८|३८

पौर्णिमा २८|४४

रास-वृषभ

नक्षत्र-कृत्तिका

योग-शिव

करण-वणिज

दिनविशेष-क्षयतिथी

मेष - धनसंचय यासाठी गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तिखट, मसालेदार पदार्थ खाण्याची विशेष आवड आज जोपासली जाईल. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र काळजी घ्यावी.

वृषभ - आपल्यातले चांगले गुण बाहेर काढून त्यावर विशेष काम आज तुम्ही कराल. स्वमग्न असा दिवस असेल. कला, मनोरंजन क्षेत्रामध्ये मन रमेल. आरोग्यदायी असाच दिवस आहे.

मिथुन - ठरवले होईल असे काही आज वाटत नाही. विनाकारण कटकटी, त्रास वाढतील. सावधगिरीने पावले उचलावी लागतील. दिवस संमिश्र आहे.

कर्क - मैत्रीचे बंध दृढ होतील. जुन्या ओळखीतून, परिचयातून लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. काही गुंतवणूक केली असेल तर त्याची चांगली फलिte आज मिळतील. दिवस समाधानी आहे.

सिंह - आपल्या राशीला मुळातच डाम डौल, दिखावा करण्याची आवड आहे. काही गोष्टी पुढाकार घेऊन आज कराल आणि त्याचे योग्य तो मान आपल्या पदराचा पडेल. कर्म प्रधानता असेल.

कन्या - विष्णू उपासना विशेष फलदायी ठरणार आहे. प्रवासाला दिवस चांगला आहे. काही मोठ्या प्रवासाचे भारतामध्ये नियोजन करणार असाल तर ते योग्य ठरेल. तीर्थक्षेत्र भेटी होतील.

तुळ - अचानक धनलाभ,मोठा काहीतरी पैसा हाती येण्याची शक्यता आहे. कोणत्याही विषयातले गुढत्व वाढेल. गुप्तधना विषयीच आकर्षण विशेष वृद्धिंगत होईल.

वृश्चिक - आयुष्य हा ऊन पावसाचा खेळ आहे. हे आज जाणवेल. संसारामध्ये चांगल्या वाईट गोष्टीतून आज मार्ग काढावा लागेल. पण जोडीदाराची उत्तम साथ मिळाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल.

धनु - जेवढी नाती जपायला जातो आपण तितकाच नात्यामधून त्रास होतो. काही वेळा मन स्वतःमध्ये असणे आहे जास्त बरे असं वाटेल. आज अडचणी गाढून, एकट्यालाच मात काढून पुढे जावे लागेल. दत्त भक्तीत रममाण व्हाल.

मकर - शंकराची उपासना करावी उत्तम फलित त्याचे आज तुम्हाला मिळतील. शेअर्स, लॉटरी, रेस यामध्ये पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना दिवस अनुकूल आहे.दत्त जयंती चे विशेष फल आपली वाट पाहत आहे.

कुंभ - जागा खरेदी - विक्री मधून धनलाभ संभवत आहे. शेतीची कामे मार्गी लागतील. विशेष फायद्याचा आजचा दिवस आहे.एकूण सर्व सुखी आज आपल्या दाराशी असतील.

मीन - बहिणीची विशेष माया,प्रेम आज लाभेल. काही मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर येतील. पण भावंडांचे सौख्य असल्यामुळे ते खंबीरपणे पेलाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार मार्गी लागतील. दत्त जयंती आपल्या राशीला सुवार्ता घेऊन येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव; युद्धविराम प्रस्तावावर चर्चा होणार की तणाव वाढणार?

नसरापूर घटनेचा SIT करणार तपास; नराधमाला फाशी द्या, नागरिकांची मागणी

Nagpur Heatstroke: महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?

Maharashtra News Live Update: राजूर घाटात भीषण वनवा; अजिंठा पर्वतरांगेतील जंगलाला आग

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT