Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : दत्तगुरूंची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या हातात पैसा खेळता राहणार

Thursday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांवर दत्तगुरूंची कृपा होणार आहे. तर काहींच्या हातात पैसा खेळता राहण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

पंचांग

गुरुवार,२० नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी- अमावास्या १२|१७

रास-वृश्चिक

नक्षत्र-विशाखा

योग-शोभन

करण-नागकरण

दिनविशेष-अमावस्या वर्ज्य

मेष - काहीतरी गुढत्व घेऊन आलेला आजचा दिवस आहे. वेगळ्या काहीतरी गोष्टी मनात येतील. वेगळे वाचन, उत्खनन यामध्ये दिवस व्यस्त राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ- संसारामध्ये गोडी गुलाबी ने राहण्याचा प्रयत्न अशी दोघांच्याकडून कृती राहील. आनंदी दिवस घालवण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे व्यवसायांमध्ये सुद्धा प्रगतीपथावर असला. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात हे लक्षात घ्या.

मिथुन - जरी आपण ठरवले तरी तशाच गोष्टी होतात असं नाही. आजच्या दिवसामध्ये अडचणी या ठरलेल्या आहेत. पण तुमच्या पद्धतीने त्यावर मात कराल. फुफुसाशी निगडित आजार होतील. तब्येतीची काळजी घ्या.

कर्क - प्रेमामध्ये जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होतील. आपलेपण वाटून प्रेम वृद्धिंगत होईल. संततीकडूनही चांगल्या बातम्या कानावर येतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती आहे. अजून काय हवे. दिवस चांगला आहे.

सिंह - घर खरेदी, वाहन खरेदी यासाठी दिवस उत्तम आहे. मनातील गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेगळे पंचांग बघण्याची आज गरज नाही. सगळ्या गोष्टी सहज होतील. "सुख आले दारी" असा दिवस आहे.

कन्या - आपली मुळात वक्तृत्व उत्तम असणारी रास आहे. समोरच्याला आपलेसे करण्यासाठी एखाद्या छानसे व्यासपीठ लाभेल. जवळचे प्रवास होतील. कामांमध्ये आपल्या लोकांच्याकडून वाहवा होईल.

तुळ - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. विनाकारण काही गोष्टी डोके वर काढतील. पण कुटुंबीयांच्या साथीमुळे पुढे जाल. पैशाची आवक जावक चांगली आहे.

वृश्चिक - अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज तुमच्याकडून सहज होतील. कामाला एक वेगळा हुरूप आणि छटा येईल. सकारात्मकता आणि प्रभाव या दोन्ही गोष्टींमुळे आज तुमचे व्यक्तिमत्व उजळून येईल.

धनु - खर्चच खर्च. होऊ दे खर्च. असा काहीसा दिवस आहे. हात आखडता घेऊन चालणारच नाही. पण आपली दोलायमान अवस्था टाळा. विनाकारण कटकटी वाढण्याची शक्यता आहे. तशी मानसिकता भक्कम करा.

मकर - जवळचे मित्र मैत्रिणी यांबरोबर आनंदाचे दिवस घालवाल. विविध लाभ होतील. गुंतवणुकीमधून फायदा आहे. दिवस चांगला आहे.

कुंभ - कामाचे वेगळे प्रशस्तीपत्र आज आपल्याला मिळेल. वरिष्ठांच्या कडून शाबासकीची थाप ठरलेली आहे. कामा निमित्त प्रवास होतील. त्यावेळी काही संशोधनात्मक गोष्टीमधून पुढे जाल.

मीन - दत्तगुरूंची कृपा आज आपल्यावर राहणार आहे. मानसिकता सात्विक आणि चांगली राहील. एक वेगळ्या प्रकारचे समाधान आज लाभेल. देवदर्शनाचे योग आहेत. नातवंड सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

Suraj Chavan New House: गुलीगत स्टारचं अलिशान घर, डोळे दिपवणारं इंटेरिअर

Maharashtra Live News Update: बिहारच्या यशाचं अभिनंदन करण्यासाठी अमित शहांची भेट - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT