गुरुवार,१६ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष.
तिथी-दशमी १०|३६
नक्षत्र-आश्लेषा
रास-कर्क १२|४२ नं. सिंह
योग-शुभ
करण-विष्टीकरण
दिनविशेष-११ नं. चांगला
मेष - कामानिमित्त प्रवासाला जाण्याचे योग आहेत. मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने मन प्रफुल्लीत राहील. नव्याने काही गोष्टीच्या योजना केल्या असल्यास त्या अमलात येतील.
वृषभ- गुरुकृपा लाभून पुढे जाण्याचे योग आहेत. एखादी महत्त्वाची घटना घडेल आणि नवीन जबाबदारी अंगावर येऊन पडेल. जुने रखडलेले पत्र व्यवहार आज मार्गी लागणार आहेत.
मिथुन - व्यवसायामध्ये अडीअडचणी आल्या तरी सुद्धा नवीन तंत्र आणि मंत्र आज अमलात आणणार आहात. कुटुंबीयांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्यामुळे कामाला हुरूप येईल.
कर्क - रखडलेली कामे आज मार्गे लागणार आहेत. एकूणच मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल वाढणाऱ्या घटना घडल्यामुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहील. दिवस चांगला आहे.
सिंह - "करायला गेलो एक, झालं एक". अशा काही गोष्टी आज होण्याची शक्यता आहे. आपल्या वस्तू गहाळ होणार नाहीत ना याची सुद्धा दक्षता घ्या. हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे.
कन्या - पैसा हा आपल्या दृष्टीने आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. हिशोबी असणारी आपली रास आहे. मात्र आज आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील उत्साह आणि उमेद वाढेल.
तुळ - कष्ट आणि मेहनतीला आपली रास कधीही मागे पडत नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचा गौरव होईल. प्रतिष्ठा लाभेल. नव्याने प्रसिद्धी मिळेल. नवीन नवीन संधी सुद्धा येतील.
वृश्चिक- काही महत्त्वाच्या गोष्टी आयुष्यात लवकरच चांगल्या घडणार आहेत. ज्याची वाट पाहत आहात अशा आनंद वार्ता आज कानी येतील. त्यामुळे मन आशावादी होऊन पुढे जाण्यासाठी तयार राहील.
धनु - कोणाचेही सहकार्याची आज अपेक्षा करूच नका. "आपण भले आपले काम भले" हाच फंडा आजमवाल तर बरे राहील. खर्चाचे प्रमाणही वाढते राहील. काळजी घ्या.
मकर - भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभण्याचा आज दिवस आहे. दैनंदिन कामे सुद्धा मार्गी लागतील. वैवाहिक जोडीदाराचा सुद्धा याला हातभार मिळेल. दिवस संमिश्र आहे.
कुंभ - काहींना आरोग्याच्या तक्रारी आज जाणवतील .कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये अडचणी आणि संकटे जरी असतील तरी यातून सुखरूप बाहेर पडाल.
मीन - संतती सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. क्रीडा क्षेत्रामध्ये, कलाक्षेत्रात प्रगती होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.