Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

Opposition Demands Election Postponement : मतदार यादीत मोठ्या प्रमाणात विसंगती आहे, असा आरोप विरोधकांनी केलाय. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
Raj Thackeray and Uddhav Thackeray demand postponement of elections, alleging voter list irregularities and Election Commission negligence.
Raj Thackeray and Uddhav Thackeray demand postponement of elections, alleging voter list irregularities and Election Commission negligence.saam tv
Published On
Summary
  • मतदार यादीत झालेल्या घोळावरून विरोधक आक्रमक

  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली आहे.

  • विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव

राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी थेट निवडणुका स्थगित करण्याची मागणी केलीय.. मात्र विरोधक निवडणूक आयोगाविरोधात कसे आक्रमक झालेत आणि मतदारयाद्यांची विरोधकांनी कशी चिरफाड केलीय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. ऐकलंत! मतदारयाद्यातील घोळावरुन विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाला खिंडीत घेरलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तर थेट निवडणूकच रद्द करण्याची मागणी केलीय.

राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीत मोठा घोळ समोर आणलाय आणि तीच मतदारयादी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार असल्याने जयंत पाटलांनी थेट मतदारयादीतील गोंधळच समोर आणून मतदारयाद्यांची पोलखोल केलीय. तर वेळेत तक्रार करुनही आयोगाने दखलच घेतली नसल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलाय.

एवढंच नव्हे तर भाजपला मदतीच्या चोरवाटा बंद केल्यानं आयोग उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.. तर सदोष निवडणूक घेण्याऐवजी थेट सिलेक्शन करुन टाका, असा टोलाच ठाकरेंनी लगावलाय.

एक नागरिक एक मत हे या देशाच्या लोकशाहीचं मुलभूत तत्व आहे. मात्र आता एकाच व्यक्तीचे अनेक एपिक नंबर आणि मतदारयाद्यात नाव असेल तर हा लोकशाहीच्या मुळ तत्वावरच हल्ला आहे.. त्यामुळं आता विरोधी पक्षांच्या एकजुटीनंतर निवडणूक आयोग दोन पावलं मागे जात मतदारयाद्यातील घोळ दुरुस्त करणार की निवडणूका घेण्याचा रेटा कायम ठेवणार... यावरच विरोधी पक्षाची भूमिका ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com