Sunday Horoscope In Marathi  Saam tv
राशिभविष्य

Thurday Horoscope : महत्त्वाची कामे पुढे ढकला; ५ राशींच्या लोकांना संभावतोय हितशत्रूंचा त्रास

Thurday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना महत्त्वाची कामे पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल. तर काहींना हितशत्रूंचा त्रास संभावतोय.

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,२५ सप्टेंबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष,विनायक चतुर्थी.

तिथी-तृतीया ०७|०७

रास- तुला

नक्षत्र-स्वाती

योग-वैधृति

करण-गरज

दिनविशेष-वैधृति वर्ज्य

मेष - भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व मुळातच चांगले आहे पण त्याचा प्रभाव आज इतरांवर चांगला पडेल. कामांशी निगडित नव्याने ऊर्जा येईल.

वृषभ - हितशत्रूंचा त्रास संभवण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलणे योग्य राहील. तब्येतीच्या तक्रारी भेडसावतील.

मिथुन - वैचारिक परिवर्तनाचा आज दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुसंवाद साधाल. नव्याने काही गोष्टी करण्यासाठी पुढे पाऊल टाकाल. शेअर्स मध्ये पैसा मिळेल .

कर्क - आत्मविश्वास वाढता राहील. आरोग्य ही उत्तम राहील कौटुंबिक जिव्हाळा आणि प्रेम याच्यामध्ये वृद्धी होण्याचा आजचा दिवस आहे .काळजी नसावी.

सिंह - आत्मविश्वास वाढता राहणार आहे. आरोग्य सुध्दा उत्तम राहील. जवळच्या प्रवासातून मोठा फायदा संभवतो आहे.भावंड सौख्य चांगले आहे.

कन्या - एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. व्यवसायामध्ये वाढ होईल. जबाबदारी ना पाठ फिरवून पुढे न जाता त्याच्याशी दोन हात कराल.

तूळ - जीवनामध्ये जे ठरवाल ते आज होईल. नव्या दिशा,नवे मार्ग सापडतील. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. मन प्रसन्न राहील. दिवस चांगला आहे .

वृश्चिक - काही ना कामाचा ताण आणि दगदग आज जाणवेल. वाहने चालवताना जपून चालवावी .तब्येतीची काळजी आणि खबरदारी घेणे आज गरजेचे आहे.

धनु - हाती घेतलेल्या कामांमध्ये सुयश मिळणार आहे. मनोबल उत्तम राहील. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" असा काहीसा आजचा दिवस आहे. त्याचा आनंद लुटा.

मकर - तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणार आहेत. मान सन्मान, पद ,पैसा, प्रतिष्ठा सर्व गोष्टींनी पूर्णत्वाकडे जाणारा आजचा दिवस आहे.

कुंभ - एखादी महत्त्वाची वार्ता कानी येईल. नव्याने हितसंबंध निर्माण होतील. शिवाची उपासना आपल्या आयुष्यातील अडचणीतून मार्ग काढण्यासाठी महत्त्वाची ठरेल.

मीन- खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. वेळ आणि पैसा वाया जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र अशाच गोष्टींमुळे आध्यात्मिक प्रगती कडे वाटचाल होईल. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT