Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: आठवड्यात 'या' राशींना शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईलच जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्यात, तुमच्यासाठी काय शुभ किंवा अशुभ असू शकते, याची माहिती दिली जाते. यामुळे तुमच्या जीवनात काय घडण्याची शक्यता आहे, हे जाणून घेतल्याने तुम्हाला अधिक तयारी करण्यास मदत होते.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

राशीतील शुक्राचा प्रवेश मन आनंदी, उत्साही ठेवणारा असून, तरुणांचे विवाह जमण्यासाठी अनुकूल काळ सुरू आहे. भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होईल.

वृषभ

व्ययातील शुक्राचे भ्रमण मोठे प्रवास करण्यासाठी अनुकूल असून, उंची वस्तू, वाहन, वस्त्र, अलंकार यांच्या खरेदीसाठी खर्च होतील. नोकरीमध्ये चांगले बदल होईल.

मिथुन

लाभ स्थानातील शुक्र मोठे लाभ मिळवून देणारा असून, नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईल. षष्ठात होणारी पौर्णिमा आरोग्य बिघडविणारी आहे.

कर्क

दशमातील शुक्राचे भ्रमण नोकरी व्यवसायात उत्साह वाढविणारे असून, वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण होतील. घरात उंची वस्तू, वाहन यांची खरेदी होईल.

सिंह

तृतीयेतील चंद्र-शुक्र योग प्रवास, सहली, मनोरंजनाचा आनंद देणारी असून, नातेवाइक, भावंडांबरोबर वेळ घालवाल. पदवी, पुरस्कार, प्रसिद्धी मिळेल.

कन्या

अष्टमातील शुक्र कौटुंबिक, आर्थिक समस्या निर्माण करणारा असून, घरातील स्त्री वर्गाची काळजी घ्यावी लागेल. मात्र, वारसा हक्काच्या कामात यश मिळेल.

तूळ

सप्तमातील शुक्राचे भ्रमण तरुणांचे विवाह जमविण्यासाठी अनुकूल आहे. सप्ताहाची सुरुवात आनंदी, उत्साह वाढविणारी असून, धनस्थानात होणारी पौर्णिमा मोठे लाभ देणारी राहील.

वृश्चिक

षष्ठातील शुक्राचे भ्रमण नोकरीमध्ये अनुकूल बदल घडविणारी असून, मोठे पद-प्रमोशन मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात दबदबा वाढेल.

धनू

पंचमातील शुक्राचे भ्रमण तरुणांना मनासारखा जोडीदार मिळविण्यासाठी अनुकूल राहील, प्रेमप्रकरणात यश मिळेल. शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईल.

मकर

दशमातील चंद्र-शुक्र योग उद्योगधंद्यात मोठा फायदा देणारा राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादित कराल. घर-जागेच्या कामात यश मिळेल.

कुंभ

तृतीयातील शुक्राचे भ्रमण छोटे प्रवास, सहली घडविणारे असून, भावंडे-नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळेल.

मीन

धनस्थानातील शुक्राचे भ्रमण कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करणारे असून, उत्पन्नात मोठे वाढ होईल. वारसा हक्काच्या कामातून लाभ मिळतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamins: वेळीच व्हा सावध! व्हिटॅमिन्सच्या गोळ्या रोज घेणं ठरेल घातक; डॉक्टरांनी सांगितल्या 'या' मर्यादा, आताच घ्या जाणून

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

MHADA Lottery: खुशखबर! म्हाडाची २००० घरांची लॉटरी! कल्याण-ठाण्यात मिळणार हक्काचे घर; या दिवशी करता येणार अर्ज

Hrithik Roshan Birthday : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार किडची संपत्ती किती? जगतोय लग्जरी लाइफस्टाइल

BMC ELection : 'व्होट बँक' की शहरावर कब्जा? मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय ओळख पुसण्याचा डाव

SCROLL FOR NEXT