Shukra Ast saam tv
राशिभविष्य

Venus Transit 2025: सिंगल लोकांची प्रतिक्षा अखेर संपणार; शुक्राच्या डबल गोचरमुळे या राशींना मनासारखा पार्टनर मिळणार

Shukra Nakshatra Parivartan 2025: आनंद, समृद्धी, संपत्ती, प्रेम यांचा कारक शुक्र ग्रह मानला जातो. यावेळी ग्रह शुक्र जूनमध्ये दोन वेळा त्याच्या स्थितीमध्ये बदल करणार आहे. हे बदल ३ राशींच्या लोकांना मालामाल करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, काही ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यामध्ये काही ग्रह राशीसोबत नक्षत्रामध्येही बदल करणार आहे. यावेळी सध्या शुक्र मेष राशीत आहे. जूनमध्ये शुक्र दोनदा आपलं नक्षत्र बदलणार आहे.

शुक्र पहिल्यांदा १३ जून रोजी, आपल्या नक्षत्रात भ्रमण करेल आणि भरणी नक्षत्रात प्रवेश करेल आणि त्यानंतर २६ जून रोजी, तो पुन्हा आपल्या नक्षत्रात भ्रमण करेल आणि कृतिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी शुक्राच्या डबल नक्षत्र गोचरचा काही राशींना लाभ मिळू शकणार आहे.

वृषभ रास

शुक्राच्या नक्षत्रातील बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळू शकणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती निश्चित आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. या काळात समाजात तुमचा आदर वाढणार आहे. प्रेम जीवन चांगले राहील.

सिंह रास

जूनमध्ये सिंह राशीच्या लोकांनाही फायदा होणार आहे. यावेळी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तणावातून मुक्तता मिळू शकणार आहे.

तूळ रास

शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे आणि शुक्र दोनदा नक्षत्र गोचर केल्याने या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला आयुष्यात सुखसोयी मिळू शकणार आहेत. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT