Lakshmi Narayan Rajyog saam tv
राशिभविष्य

Lakshmi Narayan Yog 2026: मे महिन्यात बनणार लक्ष्मी नारायण राजयोग , या ४ राशींच्या नशीबात येणार आनंद

Lakshmi Narayan Rajyog 2026 effects on zodiac signs: २९ मे रोजी शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे मिथुन, कन्या आणि तूळ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिक स्थिती आणि जीवनात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दर महिन्याला प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे काही खास राजयोग तयार होत असतात. असाच येत्या काळात एक राजयोग तयार होणार आहे.

जेव्हा शुक्र आणि बुध एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो. हा राजयोग २९ मे रोजी घडणार आहे. १४ मे रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल आणि २९ मे रोजी बुध याच राशीत प्रवेश करून या दोन ग्रहांमध्ये युती घडवून आणेल. यामुळे काही राशींचं आयुष्य उजळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

शुक्र आणि बुध यांची युती मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळणार आहे. यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तुम्ही नवीन प्रकल्पांवर काम करणार आहात.

कन्या रास

कन्या राशीसाठी, शुक्र आणि बुध यांच्या युतीने तयार झालेला लक्ष्मी-नारायण राजयोग अत्यंत चमत्कारिक ठरणार आहे. नोकरीतील पदोन्नतीसोबतच, भरघोस कमाईचीही शक्यता आहे. जुनी कर्जे फेडली जाणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठीही लक्ष्मी नारायण राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. व्यवसायात भरीव नफा मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. विविध मार्गांनी धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT