Shadashtak Yog saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog 2024: मंगळ-शनीचा अशुभ षडाष्टक योग 4 राशींसाठी ठरणार लकी; नवीन नोकरीची संधी, येईल दुप्पट वेगाने पैसा

Shadashtak Yog 2024: मंगळ ग्रहाने शनिसोबत षडाष्टक योग तयार केला आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्याच सुखाचे क्षण येणार आहेत. तर काही राशींना लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे राजयोग तयार होतात. 20 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रहांचा सेनापती कर्क राशीत आला आहे. यामुळे मंगळ ग्रहाने शनिसोबत षडाष्टक योग तयार केला आहे. हा योग अत्यंत अशुभ मानला जात असला तरी काही राशींना याचे सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, 23 जानेवारी 2025 पर्यंत मंगळ कर्क राशीत राहणार आहे. यामुळे निर्माण झालेल्या षडाष्टक योगामुळे मोठी उलथापालथ होणार आहे. यामुळे अनेकांच्या आयुष्यात चढ-उतारही येतील. मात्र यावेळी काही राशींच्या आयुष्याच सुखाचे क्षण येणार आहेत. तर काही राशींना लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना या काळात फायदा होणार आहे. यावेळी तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण कराल. नोकरदार लोकांना गुंतवणुकीद्वारे चांगला नफा मिळू शकतो. प्रत्येक आव्हानावर मात करून विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात.

मिथुन रास

मंगळच्या राशी परिवर्तनामुळे षडाष्टक योग मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला राहणार आहे. या काळात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. नवीन नोकरीचा शोध संपणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे. तुम्हाला गुप्त शत्रूंवरही विजय मिळवता येणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे. हे लोक लॉटरी जिंकू शकणार आहेत. करिअरमध्ये उच्च उद्दिष्टं साध्य होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. या काळात तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहेत.

कुंभ रास

मंगळाच्या गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमचं सगळीकडे कौतुक होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! कार ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT